Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 105
अंदमानमध्ये मॉन्सूनचे आगमन झाले आहे. या वर्षी तो इतरत्र वेळेवर येऊन सरासरी गाठेल असा अंदाज आहे. पावसाच्या प्रगतीवर व पुढील वर्षातील शेतीमालाच्या अपेक्षित उत्पादनावर यापुढील किमती अवलंबून असतील. खरीप पिकांच्या ऑक्‍टोबरनंतरच्या फ्युचर्स किमती त्या वेळचा कल दाखवतील व त्याचा उपयोग शेतकरी अशी पिके किती प्रमाणात घ्यावीत हे ठरवण्यासाठी करून घेऊ शकतील. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी आतापर्यंत गवार बी व गवार गम यांचे फ्युचर्स व्यवहार बंद होते. 14 मे पासून ते (जून, जुलै व ऑक्‍टोबर 2013 साठी) सुरू झाले आहेत. गेल्या सप्ताहात सोयाबीन, हरभरा, बटाटा व गवार बी वगळता सर्वांचे भाव वाढले (आलेख 1 बघा). आलेख 2 मध्ये स्पॉट व फ्युचर्स किमतींची तुलना करण्यात आली आहे. या तुलनेमुळे आपला माल सध्या (स्पॉट मार्केटमध्ये) विकावा की नंतर भविष्यात (हेज करून) विकावा याचा निर्णय करणे सोपे जावे. ही तुलना शेवटच्या फ्युचर्स महिन्याच्या किमतीशी केली आहे. अशीच तुलना इतर फ्युचर्स महिन्यांच्या किमतींशी करता येईल. 14 मे ते 21 मे दरम्यान  मधील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.
Friday, May 24, 2013 AT 05:15 AM (IST)
जांभळाच्या पिकलेल्या फळांमध्ये आहारमूल्ये व औषधी गुणधर्म असल्याने त्यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना वर्षभर मागणी असते. जांभूळ फळांपासून जॅम, जेली, बर्फी, टॉफी, जांभूळ पोळी, गराची पावडर, बियांची पावडर, कच्च्या फळांपासून व्हिनेगार इत्यादी पदार्थ तयार करता येतात. प्रक्रियायुक्त पदार्थांमुळे हंगाम नसतानाही फळांचा आस्वाद घेता येईल. डॉ. विष्णू गरंडे जांभूळ फळ नाजूक असल्याने दोन दिवसांपेक्षा अधिक साठवणक्षमता मिळत नाही मात्र त्यावर प्रक्रिया करून पदार्थ बनविल्यास वर्षभर जांभळाचा स्वाद मिळवणे शक्‍य होते. विविध पदार्थ बनविण्याच्या पद्धती  - 1) जॅम  - जांभळाच्या पिकलेल्या फळांपासून चांगल्या प्रतीचा जॅम तयार करता येतो. - पिकलेल्या व स्वच्छ धुतलेल्या जांभळाच्या फळांपासून बिया वेगळ्या करून फळांचा गर (लगदा) काढावा. हा गर दोन मिनिटे मिक्‍सरला किंवा पल्परला लावून घ्यावा. - पल्परमधून काढलेला हा लगदा एक मि.मी. स्टेनलेस स्टीलच्या चाळणीतून गाळून घ्यावा. - जॅम तयार करण्यासाठी फळांचा लगदा एक किलो, साखर एक किलो, सायट्रिक आम्ल 1.5 ग्रॅम (फळांच्या आम्लतेनुसार) हे घटक एकत्र मिसळून चांगले ढवळून घ्यावे.
Friday, May 24, 2013 AT 04:15 AM (IST)
पांजरापोळातून किंवा इतर ठिकाणावरून नैसर्गिकरीत्या मेलेल्या गाईंची शिंगे मिळाली तर ती वापरण्यापूर्वी त्यावरील रंग, शेंदूर वगैरे खरडून काढावा. शिंगे 12 ते 24 इंच खोल खड्ड्यात पुरून दोन ते तीन महिने मातीत ठेवावीत. त्यावर असलेले रक्त, मांस, कातडीचे अवशेष, चरबी वगैरे कुजून निघून जाईल, नंतर ती स्वच्छ करून वापरावीत. आपल्याला जेवढे खत हवे आहे, त्यापेक्षा 10 ते 15 टक्के जास्त क्षमतेची नैसर्गिक किंवा कृत्रिम शिंगे जमवून ठेवावीत. गोमय  - बी.डी. 500 बनवण्यासाठी गोमयाची गरज असते. गोमयासाठी गाय निवडताना खालील बाबी पाहाव्यात. 1. गाय दुभती असावी. 2. भाकड गाय, वांझ गाय, कालवड, खोंड, बैल यांचे शेण घेऊ नये. 3. गाय आजारी नसावी. तिला कोणतीही कृत्रिम औषधे, शक्तिवर्धके, इंजेक्‍शने वगैरे नुकतीच दिलेली किंवा चालू नसावीत. 4. बी.डी.साठी शेण घेण्याच्या 48 तास अगोदरपासून गाईंची खास काळजी घ्यायला हवी. त्यांना उत्तम प्रकारचा मिश्र हिरवा चारा द्यायला हवा. दोन- तीन दिवस अगोदर कृत्रिम खुराक बंद करून बैल घाणीतील सेंद्रिय पेंड, लसूणघास, सुबाभूळ, शेवरी, ग्लिरिसिडीया, अझोला वगैरेचे प्रमाण वाढवावे.
Thursday, May 23, 2013 AT 04:45 AM (IST)
डॉ. रामचंद्र साबळे विनोबा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे होते. त्यांचा जन्म कोकणातील रायगड जिल्ह्यात घागोडे या गावी 11 सप्टेंबर 1895 मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्‍मिणीदेवी होते. त्यांना दोन भाऊ होते, त्यांची नावे बलकोबा आणि शिवाजी अशी होती. ते दोघेही अविवाहित होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोकणात झाले. मात्र त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते गुजरातमध्ये बरोडा येथे गेले. बालपणी त्यांनी भगवतगीता, रामायण आणि महाभारताचा अभ्यास केला आणि त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. मानवी हक्कांसाठी त्यांनी विशेष कार्य केले, तेही अहिंसेच्या मार्गाने. त्यामुळेच महात्मा गांधी यांनी त्यांना 'पहिले सत्याग्रही' म्हणून घोषित केले. भूदान चळवळीवर त्यांनी भर दिला. राष्ट्रीय शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जात असे. त्याचप्रमाणे महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रभावित होऊन या कार्याची धुरा पुढे सांभाळण्याचे काम त्यांनी केले. विनोबा भावे यांनी वर्धा येथे 8 एप्रिल 1921 रोजी महात्मा गांधी आश्रमाची स्थापना केली. त्यांनी महाराष्ट्र धर्म हे मासिक सुरू केले.
Thursday, May 23, 2013 AT 04:30 AM (IST)
वातावरणातील उष्णता वाढताच जनावरांना त्याचा त्रास जाणवून ते हा अनुभव शरीराचे तापमान वाढण्याबरोबरच आहार अन्नग्रहणता कमी करून दर्शवितात. आहार कमी होण्याचा प्रतिकूल प्रभाव दुग्ध उत्पादन व कार्यक्षमतेवर पडतो. जनावरांना जास्त उष्णतेच्या त्रासापासून वाचविण्यासाठी अधिक आरामदायी वातावरण उपलब्ध करून देणे. विविध पद्धतींची आवश्‍यकता व उपलब्धतेनुसार पोषणामध्ये योग्य अवलंब केल्यास शेतकरी उन्हाळ्यापासून आपल्या जनावरांचा बचाव करून त्यांचे आरोग्य, प्रजनन, उत्पादन व कार्यक्षमता टिकविण्याबरोबरच त्यामध्ये वाढ साधू शकतात. प्रा. आर. आर. शेळके, डॉ. एस. डी. चव्हाण ग्रीष्म, उन्हाळा या काळात पशूंची प्रजनन तसेच उत्पादन क्षमता प्रभावित होते. संकरित, अधिक दूध देणाऱ्या जनावरांवर उष्णतेचा दुष्पपरिणाम जास्त प्रमाणात जाणवतो. कारण सर्वसाधारणपणे देशी जनावरांमध्ये आढळणारे, पूर्ण वाढ झालेले खांदा व पोळ हे भाग संकरित जनावरे व म्हशींमध्ये आढळत नाहीत. स्वेट ग्लॅन्ड पेशींद्वारे शरीराचे तापमान नियंत्रित करून ते वातावरणातील तापमानासोबत जुळवून घेतात.
Wednesday, May 22, 2013 AT 04:15 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: