Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 261
- उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी चिंतेत - शेतीतील नापिकीने आर्थिक संकट उस्मानाबाद जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या वीस कि.मी. अंतरावर तेर नावाचं गाव. शेतीवरच गावची अर्थव्यवस्था आधारलेली. गावचं अर्थकारण तसं चांगलं, पण यंदाच्या दुष्काळानं सारी घडी विसकटली. गणेश फुंदे तब्बल वीस हजार लोकसंख्येचं तेर गाव दुष्काळाशी लढतंय. एकरपासून ते थेट चाळीस एकरापर्यंतचे शेतकरी गावात आहेत. यंदा ते सर्वच चिंतेत आहेत. साऱ्यांची चिंता एकच, पुढं कसं व्हईल शेतीचं अन्‌ आपलं. गावातील व्यवहार थंडावलेत. सकाळी नऊ वाजता तेर बसस्थानकावर वर्दळ दिसली. वर्दळीतून कुणी पाण्यासाठी, तरी कुणी जनावरांसाठी चारा घेऊन जात होते. एवढ्यात पायजमा अन्‌ पांढरा शर्ट घातलेले एक शेतकरी घाईघाईने जाताना दिसले. त्यांना थोडंसं थांबवलं. तुम्ही इथलेच का, असं विचारलं अन्‌ त्यांनी आपली परवडच सांगायला सुरवात केली. अर्जुन भागवत पवार नाव आहे बघा माझं. सव्वा एकर शेती... बॅंक पैसं देत न्हाई... पंधरा वरसापासून सावकाराकडून व्याजानं पैसं घेऊन पेरतूय. शेतीत पिकलं ते विकून जमंल तेव्हढं सावकाराचं देणं चुकतं केलं तरी पुरं कर्ज काई फिटत न्हाई. आख्खं सालच मजुरी कराव लागती.
Tuesday, May 21, 2013 AT 04:30 AM (IST)
- गेल्या वीस वर्षांपासून भाडेपट्ट्याने दरवर्षी करतात कलिंगडाची शेती - घाऊक बाजार आणि स्थानिक बाजारातील विक्री यांचा घातला मेळ कोकणामध्ये तीनही हंगामांत व्यावसायिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. सौंदळ (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील शेतकरी जाकीर मुल्ला हे स्वतःची शेती करतानाच गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक शेती भाड्याने घेऊन त्यात कलिंगडाची लागवड करत आहेत. फळांची प्रतवारी करून बाजारपेठेचे योग्य नियोजन त्यांनी केले आहे. राजगोपाल मयेकर व्यवसायानिमित्त इचलकरंजी येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सौंदळ (ता. राजापूर) गावात जाकीर मुल्ला यांचे वडील चांद मुल्ला हे स्थायिक झाले. त्यांनी साठच्या दशकात पहिल्यांदा ऊस लागवड केली तसेच भुईमूग व विविध पिके घेत पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती संस्कृती येथे रुजविण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे त्यांना ऊसवाले मुल्ला म्हणूनच ओळखले जाई. जाकीर यांनीही काही वर्षे मुंबईत नोकरी केल्यानंतर 20 वर्षांपूर्वी आपली शेती सांभाळायचे ठरवले. मुल्ला कुटुंबीयांकडे सात एकर 12 गुंठे क्षेत्र असून, ऊस आणि भाजीपाला लागवड केली जाते.
Tuesday, May 21, 2013 AT 03:45 AM (IST)
लातूर जिल्ह्यातील सूरज देशमुख यांची प्रेरणादायी शेती लातूर जिल्ह्यातील सूरज देशमुख यांनी शेतीत काहीही अनुभव नसतानाही आपली वडिलोपार्जित शेती मोठ्या जिद्दीने विकसित केली आहे. त्यात नगदी पिकांचे काटेकोर नियोजन करीत, नव्या गोष्टी शिकत व आर्थिक घडी सुयोग्यपणे बसवत आत्मविश्‍वासाने विकासाची दमदार पावले टाकण्यास सुरवात केली आहे. रमेश चिल्ले शेतीत समस्या प्रचंड असतात. मात्र त्यातील प्रतिकूल गोष्टींवर मात करून आपली सुमारे 48 एकर शेती बालाजी ऊर्फ सूरज विठ्ठलराव देशमुख यांनी चांगल्या प्रकारे विकसित केली आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्‍यातील आंबेगाव येथे त्यांची शेती आहे. आर्किटेक्‍चरचे शिक्षण घेत असताना तांत्रिक कारणांमुळे त्यांना ते शिक्षण अर्धवट सोडावे लागले. वडिलांचे लहानपणीच निधन झालेले. कुटुंबात आई व पाच बहिणींची जबाबदारी होती. सूरज यांना शेतीचा काहीच अनुभव नव्हता. त्यामुळे चुलत्यांनी त्यांना मदत केली. दोन वर्षे पुण्यात नोकरी केल्यावर आईजवळ राहण्याची गरज ओळखून सूरज लातूरमध्ये आले. मित्र, पाहुण्यांकडील शेती, त्यातील प्रयोग त्यांनी पाहिले.
Monday, May 20, 2013 AT 04:45 AM (IST)
* बागा जळालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही * खरीप, रब्बी गेला, पेरणीची सोय नाही * कर्ज देणार का नाही, कुणालाच माहिती नाही औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाची वाढती तीव्रता लक्षात घेत प्रशासनाकडून आणि मुंबईतील बैठकीतून शासकीय पातळीवरून दुष्काळग्रस्तांसाठी मदत सुरू असल्याचं कायम सांगण्यात येत असलं तरी बागांचं सरपण झालं, अद्याप अनुदान नाही, गावं तहानलेलं, टॅंकर येत नाही. टॅंकर आला की गावात जीवघेणा प्रवास सुरू होतो. खरीप, रब्बी नुकसानीच अजून काहीच नाही, खरिपाच्या बी भरणाची सोय नाही, एक नाही तर डझनभर समस्यांचा पाढाच गावागावांत वाचला जात होता. सांजखेडा, ता. औरंगाबाद अंदाजे दोन हजार लोकसंख्येचं गाव. गावात मोसंबीच्या बागांचे 75 टक्‍के क्षेत्र असलं तरी यंदाच्या दुष्काळानं सारं जळाल्याचं सांगण्यात आला. पंधरा हजाराची मदतही इथं काही शेतकऱ्यांना मिळाली नाही, असं शेतकऱ्यांनी सांगितलं. गणेश फुंदे पोटच्या लेकरागत जपलेल्या बागा डोळ्यांदेखत जळाल्या अन्‌ बागांचं सरपण झालं. बागांच्या लाकडाचे ढीग घराघरांपुढं ठेवलेत, उरल्यासुरल्या बागाही अखेरच्या घटकेत आहेत.
Monday, May 20, 2013 AT 04:30 AM (IST)
उसाचं ऐश्‍वर्यसंपन्न आगार अशी ओळख असलेल्या पैठण तालुक्‍यातील गावं कधी नव्हे एवढी दुष्काळानं होरपळून निघाली आहेत. गावशिवारात तासन्‌ तास चालणारा मोटारपंप आता पूर्णपणे बंद पडला आहे. गोदाकाठचं हिरवेगार शिवार वाळून गेलं असून, गावागावांत पाण्याच्या शोधात फक्‍त कूपनलिका खोदाईचे काम सुरू आहे. गावात घरागणिक कूपनलिका खोदून पाण्याचा शोध घेतला जात असला तरी खोलवर घेतलेल्या कूपनलिका फक्‍त धुराडाच टाकत असल्याने पाणी गेलं तरी कुठं असा प्रश्‍न गावांना पडला आहे. कूपनलिकांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या गावांना टॅंकरचीच वाट पाहावी लागत असून, सर्वाधिक 123 टॅंकरही जायकवाडी धरणाचं वैभव समजलं जाणाऱ्या पैठण तालुक्‍यात आहेत हे विशेष. गोदाकाठचं हिरवं शिवार दुष्काळानं वाळून गेलं. उपलब्ध पाण्यावर ऊस जगवू, असा विचार करून उसाची लागवड केली खरी, पण पाणी बंद झाले अन्‌ ऊस मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. उसाचं आगार समजल्या जाणाऱ्या गावात भरलेला ऊस नजरेत येत नाही. गावात शिवारात कुठेही फिरलं तर नजरेत येतं ते फक्‍त पाण्याचं दुर्भिक्ष. जायकवाडीच्या कुशीतल्या गावांची तहान टॅंकरवरच भागवली जाते.
Sunday, May 19, 2013 AT 12:30 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: