Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 2
पुणे - राज्यातील खासगी कृषी महाविद्यालयांची गुणवत्ता तपासणी करून मानांकन देण्याचे कृषी विद्यापीठांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. महाविद्यालयांची मान्यता गेली, तरी चालेल पण दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका शासनाने घेतली आहे.  काही वर्षांपूर्वी राजकीय हस्तक्षेपातून राज्यात खिरापतीसारखी खासगी महाविद्यालये वाटली गेली. १५६ कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालये आहेत. त्यांचा दर्जा तपासण्याच्या सूचना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिल्या आहेत. आता माजी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील त्रयस्थ समितीकडून महाविद्यालयांचा दर्जा ठरविला जाईल.   ‘राज्यात काही महाविद्यालयांची अवस्था इतकी वाईट आहे, की महाराष्ट्रातील दर्जेदार कृषी शिक्षण परंपरेचे वाभाडे निघाले. त्यामुळे कृषी, शिक्षण व संशोधन परिषद किंवा कृषी विद्यापीठांनी दर्जा तपासू नये. दर्जा ठरवण्याचे काम त्रयस्थ यंत्रणेला देण्याची आग्रही मागणी माजी कुलगुरूंनी केली होती. त्याची दखल घेत नवी समिती स्थापन झाली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
Wednesday, November 09, 2016 AT 04:10 PM (IST)
पुणे - राज्याच्या कृषी आयुक्तालयातील संचालकपदाची सर्व पदे नोव्हेंबरपासून रिक्त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या आयुक्तालय पूर्णतः दुबळे झाले आहे. एकमेव असलेले पूर्णवेळ संचालक के. व्ही. देशमुख यांच्या निवृत्तीमुळे आता एकही पूर्णवेळ संचालक अस्तित्वात राहिलेला नाही. विस्तार संचालकपदावरून श्री. देशमुख निवृत्त झाल्यानंतर शासनाने पूर्णवेळ संचालक दिला नाही. त्यामुळे राज्य फलोत्पादन मंडळाचे विद्यमान संचालक डॉ. जाधव यांच्याकडे आता मृदसंधारण संचालकपदाबरोबरच ‘विस्तार’ संचालकपददेखील तात्पुरते सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  कृषी आयुक्तालयातील विस्तार, खते-बियाणे विभाग, मृदसंधारण, फलोत्पादन, प्रक्रिया व नियोजन अशी पाच पूर्णवेळ संचालकपदे रिक्त आहेत. या पदांवर पदोन्नतीने नियुक्‍त्या केल्या जातात. या नियुक्‍त्या संशयास्पदरीत्या रेंगाळल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  खते-बियाणे-कीडनाशके विभागाच्या संचालकपदाची तात्पुरती जबाबदारी आता पुणे विभागाचे कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
Tuesday, November 08, 2016 AT 01:49 PM (IST)
 
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: