Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 11
अकोला  - आदर्श गाव विकास योजनेअंतर्गत राज्यातील 50 गावांमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमांसाठी चार कोटी 80 लाखांच्या निधीला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यापैकी तीन कोटी रुपयांचे निधी तत्काळ उपलब्ध करण्यात आला आहे. हा निधी गेल्या वर्षी योजनेत निवड झालेल्या गावांमध्ये सुरू असलेल्या कामांसाठी व चालू वर्षात निवड होणाऱ्या गावांच्या प्रशिक्षणासाठी खर्च करण्यात येणार असल्याचे योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले. लोकसहभागातून ग्रामविकास या संकल्पनेवर आदर्श गाव योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना या गावांमध्ये राबविण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने शासनाच्या 12 निरनिराळ्या विभागांच्या 59 योजनांचा समावेश आहे. त्यापैकी पाणलोट क्षेत्र विकासाची कामे गाभा क्षेत्र म्हणून आणि इतर विभागांची कामे बिगर गाभा क्षेत्र म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 100 गावे निवडण्यात आली आहेत.
Tuesday, May 28, 2013 AT 05:00 AM (IST)
"एलबीटी'प्रश्‍नी पणन संचालकांचा आदेश अकोला  - स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी)विरोधी आंदोलनामुळे बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी बंद पाळला, तर बाजार समितीने त्यांच्यावर कारवाई करावी. याकामी बाजार समितीने कुचराई केल्यास थेट बाजार समित्यांवर कारवाई करावी, असे निर्देश पणन संचालकांनी दिले आहेत. याबाबतचा लेखी आदेश सर्व बाजार समित्यांना पाठविला आहे. "एलबीटी'च्या अंमलबजावणीबाबत राज्य शासन आग्रही आहे. परंतु या करप्रणालीमुळे भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचा आरोप करीत व्यापाऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. राज्यात औरंगाबाद वगळता एकाही महापालिकास्तरावर "एलबीटी'चे स्वागत झाले नाही. औरंगाबादेत महापालिका आयुक्‍त हर्षदीप कांबळे यांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांच्या मनातील "एलबीटी'बाबतचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न झाले. पुणे, नागपूर, मुंबईत व्यापाऱ्यांनी या करप्रणालीविरोधात बंदचे हत्यार उपसले आहे. अकोल्यात या करप्रणालीच्या संदर्भाने प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर निर्णय झाला नाही. दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या बंदमुळे सामान्य जनता वेठीस धरली जात आहे.
Saturday, May 18, 2013 AT 05:45 AM (IST)
अकोला  - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात "आत्मा'द्वारे कृषी तंत्रज्ञान सहजगत्या उपलब्ध होणार असल्याने पीक उत्पादकतेत वाढीचा हेतू साध्य होईल, असा विश्‍वास वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी व्यक्‍त केला. वाशीम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात "आत्मा' कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार सुभाष झनक, आमदार प्रकाश डहाके, वाशीम जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, आत्मा संचालक कृष्णराव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, कृषी सभापती रमेश शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी अशोक अमानकार, मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी संदीप महाजन, कृषी विकास अधिकारी सूर्यवंशी उपस्थित होते. आत्मा प्रकल्प संचालक विजय चवाळे यांनी प्रास्ताविकातून "आत्मा'च्या कामकाजाची माहिती दिली. "आत्मा'अंतर्गत पणनविषयक सुधारणा या बाबी अंतर्भूत असल्याने शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळून जास्तीचा नफा मिळण्याची संधी उपलब्ध झाल्याचे मत जिल्हाधिकारी श्री. कुळकर्णी यांनी व्यक्‍त केले. सूत्रसंचालन धनंजय वाघ यांनी केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर यांनी आभार मानले.
Wednesday, May 08, 2013 AT 02:45 AM (IST)
अकोला- स्थानिक बाजार समितीत गुरुवारी (ता. 2) गव्हाची 461 क्‍विंटल आवक झाली. गव्हाला 1650 ते 2025 रुपये प्रति क्‍विंटल दर होता. गव्हास सरासरी दर 1840 रुपये प्रति क्‍विंटल होता. बाजार समितीत हरभरा वगळता इतर शेतीमालाची आवक जेमतेम होती. ज्वारीची 68 क्‍विंटल आवक झाली. ज्वारीस 1180 ते 1220 रुपये, तर सरासरी 1195 रुपये प्रति क्‍विंटल दर होता. मुगाची केवळ सहा क्‍विंटल आवक होती. मुगास 5300 ते 5500 व सरासरी 5400 रुपये प्रति क्‍विंटल दर होता. तुरीची 740 क्‍विंटल आवक झाली, त्यास 4200 ते 4465 व सरासरी 4435 रुपये प्रति क्‍विंटल दर होता. हरभऱ्याची 1147 क्‍विंटल आवक होती, त्यास 3150 ते 3300 रुपये प्रति क्‍विंटल दर होता. पांढऱ्या हरभऱ्याचे सरासरी दर 3940 रुपये प्रति क्‍विंटल होते. याची 145 क्‍विंटल आवक नोंदविली गेली. सोयाबीनची 292 क्‍विंटल आवक झाली, त्यास 3730 ते 3770 रुपये प्रति क्‍विंटल व सरासरी 3750 रुपये प्रति क्‍विंटल दर होते.
Friday, May 03, 2013 AT 12:00 AM (IST)
अकोला  - वाशीम येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात आयोजित धान्य महोत्सवात पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना एक लाख 29 हजार सहाशे रुपये किमतीच्या शेतीमालाची विक्री केली. आज (सोमवार) या महोत्सवाची सांगता होत आहे. शनिवारी (ता. 20) अमरावतीचे विभागीय आयुक्‍त धनराज बनसोड यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. या वेळी ते म्हणाले, की शेतकरी ते ग्राहक संकल्पनेतून भरविण्यात येणाऱ्या धान्य महोत्सवाद्वारे शेतकरीहित जपले असल्यामुळे अशा उपक्रमांची वारंवारता वाढविण्याची गरज आहे. उद्‌घाटन सोहळ्याला वाशीमचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, नगराध्यक्षा रेखाताई शर्मा, कृषी सभापती रमेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई चौधरी, "आत्मा' प्रकल्प संचालक विजय चवाळे, उपसंचालक अरुण वाघमारे, उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर उपस्थित होते. श्री. बनसोड पुढे म्हणाले, ""शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजार समिती अथवा खासगी व्यापाऱ्यांद्वारे खरेदी करण्यात आल्यास समाधानकारक दर मिळत नाही.
Tuesday, April 23, 2013 AT 04:15 AM (IST)
1 2 3
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: