Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 274
जुलै- ऑगस्टमध्ये अंमलबजावणी शेतकरी गट, ग्रामपंचायतींच्या सहभागातून होणार उद्दिष्ट साध्य पुणे  - राज्यातील सुमारे पाच लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्र व्यापणाऱ्या आणि पीक उत्पादनघटीस कारणीभूत ठरणाऱ्या गाजर गवताच्या निर्मूलनासाठी येत्या जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यभर व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट, शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींच्या सहभागातून गाजर गवताचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी गाजर गवताच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेले आहेत. 1970-72 पासून गाजर गवताचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढला आहे. राज्यात हे गवत कॉंग्रेस, पांढरी फुली, चटक चांदणी या नावांनीही ओळखले जाते. शेतीच्या नुकसानीबरोबरच शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही या गवतामुळे धोका पोचत असल्याने कृषी विभागाने त्याच्या निर्मूलनासाठी व्यापक पातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. असे आहे नियोजन येत्या 15 जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती समितीची स्थापना होऊन गाजर गवत निर्मूलन मोहिमेला सुरवात होईल.
Tuesday, June 18, 2013 AT 05:30 AM (IST)
- ऐतिहासिक चढाईने सर्व रेकॉर्ड मोडीत - पश्‍चिम विदर्भ, कोकणात पावसाची हजेरी - मराठवाडा, उत्तर- मध्य महाराष्ट्रात प्रतीक्षा पुणे - सर्वसाधारण तारखेच्या एक महिना आधीच मॉन्सूनने देश व्यापल्याची ऐतिहासिक नोंद या वर्षी झाली आहे. साधारणतः 53 वर्षांपूर्वी 21 जूनला मॉन्सूनने देश व्यापला होता. महाराष्ट्रात कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कालही कायम होता. नद्या- नाले दुथडी भरून वाहू लागल्याने पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली. काही धरणांच्या पाणीसाठ्यात आवक वाढली आहे. हतनूर (जि. जळगाव) धरणाचे सर्व दरवाजे रविवारी उघडण्यात आले. पूस (जि. यवतमाळ) प्रकल्प जून महिन्यात पहिल्यांदाच ओसंडून वाहू लागला. कोकणातील अनेक लहान- मध्यम प्रकल्पही भरले असून, पेण तालुक्‍यात सर्वाधिक 262 मिलिमीटर, तर विदर्भात आरमोरी (जि. गडचिरोली) तालुक्‍यात 211 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाडा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह सांगली, सातारा जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुणे जिल्ह्यात सर्वदूर, तर येथील धरण क्षेत्रात 100 मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाला.
Monday, June 17, 2013 AT 02:30 AM (IST)
चिकू उत्पादक महासंघाच्या प्रयत्नांना यश सापेक्ष आर्द्रतेसाठी 25 ते 50 हजारांची नुकसानभरपाई मिळणार मुंबई (वृत्तसंस्था) ः शासकीय धोरण, संशोधनाच्या दृष्टीने नेहमी डावलले गेलेल्या चिकूला अखेर हवामानाधारित पीक विमा योजना लागू झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान वगळता चिकू उत्पादक शेतकऱ्याला हेक्‍टरी केवळ तीन हजार रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. नगर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये प्रायोगिक पातळीवर ही योजना राबवून त्या अनुभवानुसार पुढील वर्षीपासून राज्यभर ही योजना लागू केली जाईल, असे कृषी विमा कंपनीने म्हटले आहे. या योजनेमध्ये सापेक्ष आर्द्रता घटक महत्त्वाचा मानला गेला आहे. सलग पाच दिवस 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता राहिली, तर हेक्‍टरी 25 हजार आणि ती सलग 10 दिवस राहिली तर हेक्‍टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
Sunday, June 16, 2013 AT 12:00 AM (IST)
- "अहेरी'त सर्वाधिक 246 मि.मी. पाऊस - नद्या-नाल्यांना पूर, अनेक मार्ग बंद पुणे  - छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे, परिणामी पूर्व विदर्भात ढगांची दाटी होऊन जोरदार वृष्टी झाली. विशेषतः गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक पाऊस अहेरी येथे 246 मि.मी. नोंदविला गेला. राज्यात आतापर्यंतचा हंगामातील पहिलाच मोठा पाऊस ठरला आहे. चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांतही पावसाने अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली. कोकणात अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळत होत्या. शुक्रवार (ता. 14) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत मॉन्सून कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात सक्रिय होता. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळित केले. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक मार्ग बंद झाले होते. कोकणातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकण, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांत पाऊस कमी प्रमाणात पडला.
Saturday, June 15, 2013 AT 06:00 AM (IST)
भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी (ता. 14) जून ते सप्टेंबर दरम्यानचा नैर्ऋत्य मॉन्सूनचा सुधारित अंदाज जाहीर केला. देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घ पल्ल्याच्या सरासरीत हा पाऊस 96 ते 104 टक्के पडेल, तसेच जुलै महिन्यात सरासरीच्या 101 टक्के व ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मॉन्सून अंदाज--------------------शक्‍यता 110 टक्‍क्‍यांहून अधिक-----------दोन टक्के 104 ते 110 टक्के--------------14 टक्के 96 ते 104 टक्के----------------47 टक्के 90 ते 96 टक्के------------------28 टक्के 90 टक्‍क्‍यांहून कमी---------------9 टक्के जुलै व ऑगस्टमधील अंदाज भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात सरासरीच्या 101 टक्के व ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Saturday, June 15, 2013 AT 05:15 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: