Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 157
सातारा  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 19) वांगी, टोमॅटो तेजीत होते. वांग्याची सहा क्विंटल आवक झाली. वांग्यास प्रति दहा किलोस 250 ते 300 रुपये दर होता. टोमॅटोची पाच क्विंटल आवक झाली. टोमॅटोस प्रति दहा किलोस 300 ते 350 रुपये दर होता. गत रविवारच्या (ता. 16) तुलनेत वांगी व टोमॅटोस प्रति दहा किलो मागे 50 रुपयांची दरवाढ झाली होती, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत ओल्या भुईमूग शेंगेच्या आवकेत वाढ झाली असून, इतर सर्व भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. भुईमूग शेंगेची 10 क्विंटल आवक होऊन प्रति दहा किलोस 120 ते 200 रुपये दर होता. गवारीची एक क्विंटल आवक होऊन प्रति दहा किलोस 350 ते 450 रुपये दर होता. गवारीस दहा किलो मागे शंभर रुपयांची दरवाढ झाली होती. पालेभाज्यांमध्ये मेथीची 700 जुड्यांची आवक होऊन प्रति शेकड्यास एक हजार ते 1200 रुपये दर होता. मेथीची 1300 जुड्यांची आवक झाली होती. फळांमध्ये आंब्याची 70 पाटी (प्रति पाटी चार डझन) आवक होऊन आंब्यास 300 ते 600 रुपये दर होता.
Thursday, June 20, 2013 AT 04:45 AM (IST)
-मुंबई  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. 17) कांद्याची 4900 क्विंटल आवक झाली. कांद्यास किमान 1250 ते कमाल 1700 व सरासरी 1475 रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत लसणाची 800 क्विंटल आवक होऊन 2000 ते 3500 व सरासरी 2750 रुपये प्रतिक्विंटल दर होते. बटाट्याची 12400 क्विंटल आवक होऊन 1050 ते कमाल 1250 व सरासरी 1150 रुपये प्रतिक्विंटल दर होते. राज्यातील अनेक भागांतील पावसाचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारांवर झाला होता. भाजीपाल्यांमध्ये भेंडी, दुधी, भोपळा, चवळी शेंग, पडवळ, शेवगा शेंग, शिराळी, सुरणाचे दरात तेजी होती. सोमवारी 550 क्विंटल वाटाण्याची आवक झाली. 10 किलोच्या वाटण्यास 500 रुपये दर होता. टोमॅटोचे प्रति 10 किलोचे दर 260 रुपयांपर्यंत होते. ज्वाला मिरचीची 2710 क्विंटल आवक होऊन सरासरी 10 किलोस 300 रुपयांपर्यंत दर होता. फळ बाजारातील तेजी टिकून असली तरी आंब्याचा हंगाम आता संपला आहे. मुंबई मार्केटमध्ये मिक्‍स प्रकारातील 5483 क्विंटल आंब्याची आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी दर 3600 होता.
Wednesday, June 19, 2013 AT 05:30 AM (IST)
जनावरांच्या अंगावरील तसेच गोठ्यातील घागऱ्या गोचिडांच्या नियंत्रणासाठी नीमतेल, करंज तेलाच्या द्रावणाचा वापर करता येतो. यामुळे जनावरांना उपाय होत नाही. जैविक गोचीडनाशकांची फवारणी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी. डॉ. बाबासाहेब नरळदकर जनावरांच्या शरीरावर आढळणाऱ्या घागऱ्या गोचिडांच्या नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो, हे पशुवैद्यक महाविद्यालयामधील परजीवीशास्त्र विभागामध्ये केलेल्या संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. घागऱ्या गोचिडास इंग्रजीमध्ये (बुफीलस्‌ मायक्रोप्लस) असे नाव आहे. हा गोचीड बाल्यावस्थेमध्ये मोहरीएवढा दिसतो, तर रक्त पिऊन पिऊन चिंचोक्‍यासारख्या आकाराचा बनतो. म्हणून यास ग्रामीण भागामध्ये घागऱ्या गोचीड असे म्हणतात. घागऱ्या गोचिडाचे जीवनचक्र - 1) नर व मादी गोचीड  - जनावरांचे रक्त पितात 2) गोठ्यात व पडकावर जमिनीवर पूर्ण होणारा जीवनचक्राचा भाग  - मादी गोचीड रक्त शोषण केल्यानंतर पडक, गोठा येथे सांधीकपारी, दावणीखाली साधारणपणे 4000 ते 4400 अंडी घालते. ही अंडी तपकिरी रंगाची "द्राक्षाच्या घोसा'सारखी दिसतात.
Tuesday, June 18, 2013 AT 05:45 AM (IST)
फळभाज्यांची आवक घटली वांगी, गवार, भेंडी तेजीत औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचे दर तेजीत राहिले. टोमॅटोला 1200 ते 2500 रुपये, तर सरासरी 1850 रुपये प्रति क्‍विंटल दर राहिले. या वेळी नारायणगाव, नगर भागातून टोमॅटोची 850 क्‍विंटल आवक झाली. मे महिन्यानंतर टोमॅटोचे दर स्थिर होते परंतु मराठवाड्यातील बाजारपेठेतून टोमॅटोला मागणी वाढल्याने दरात तेजी राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील बहुतांश भागात पाऊस नसल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेतील फळभाज्यांच्या आवकेवर झाला आहे. विशेषतः बाजार समितीत येणाऱ्या फळभाज्यांची 50 टक्‍के आवक होत आहे. बाजार समितीत हिरव्या मिरचीसोबतच फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, गवार, भेंडी, ढोबळी मिरची आदी भाज्यांच्या दरातील तेजी कायम होती. हिरव्या मिरचीची 350, तर ढोबळी मिरचीची 152 क्‍विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला 2000 ते 5000 रुपये, तर ढोबळी मिरचीला 2000 ते 3500 रुपये आणि फ्लॉवरला 2000 ते 4500 रुपये प्रति क्‍विंटल असा दर राहिला. महिनाभरापासून आल्याची (अद्रक) आवक घटली आहे. गत सप्ताहात आल्याची 40 क्‍विंटल आवक झाली.
Tuesday, June 18, 2013 AT 05:45 AM (IST)
नगर  - येथील बाजार समितीत गत सप्ताहात भुसारची 1425 क्विंटल आवक झाली. यात ज्वारीची सर्वाधिक 604 क्विंटल आवक झाली. ज्वारीला 1500 ते 2100 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. गावरान हरभऱ्याची 220 क्विंटल आवक झाली. गावरान हरभऱ्याला कमाल व किमान 3000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तुरीची 74 क्विंटल आवक झाली. तुरीला 3800 ते 3851 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. भाजीपाल्यात टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, काकडी, भेंडी, हिरवी मिरची, मेथी, कोथिंबिरीला मागणी राहिल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले. बाजार समितीत गेल्या काही महिन्यांपासून भुसारची आवक कमी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काहीशी आवक वाढली आहे. ज्वारीची आवक मात्र सुरवातीपासूनच चांगली राहिली. बाजरीची 291 क्विंटल आवक झाली. बाजरीला 1600 ते 1650 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. जाड हरभऱ्याची 31 क्विंटल आवक झाली. 3600 ते 3651 रुपये असा दर जाड हरभऱ्याला मिळाला. मोहरीची सहा क्विंटल आवक झाली. मोहरीला 4500 रुपये प्रति क्विंटल असा कमाल व किमान दर मिळाला. गव्हाची 72 क्विंटल आवक झाली. गव्हाला 1700 ते 2200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
Tuesday, June 18, 2013 AT 05:45 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: