Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 28
खासगी कंपन्यांचा सहभाग 13 जिल्ह्यांत 30 हजार हेक्‍टरवर पेरणी करणार नगर  - मका उत्पादनवाढीसाठी कृषी विभाग व वेगवेगळ्या तीन खासगी कंपनीच्या सहभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये "मूल्य साखळी विकास प्रकल्प' राबविण्यात येणार आहे. सुमारे तीस हजार हेक्‍टरवर दीडशे प्रकल्पांतून मक्‍याची पेरणी केली जाणार आहे. दोनशे हेक्‍टरचा एक प्रकल्प आहे औरंगाबाद, जळगाव, पुणे, नगर, नाशिक, बुलडाणा, सांगली, जालना, धुळे, नंदुरबार, सातारा, सोलापूर व उस्मानाबाद या तेरा जिल्ह्यांत या वर्षी "मूल्यसाखळी विकास प्रकल्प' राबविण्यात येणार आहे. प्रति हेक्‍टरवर चार हजार रुपये खर्च केला जाईल. प्रकल्पाला सहकार्य करणारी कंपनी प्रकल्पातील प्रति हेक्‍टरला वीस किलो बियाण्यांचा पुरवठा करणार असून, कृषी विभागाकडून खतांचा पुरवठा होणार आहे. बागायती बरोबरच कोरडवाहू क्षेत्रात हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. प्रकल्पांतून उत्पादित झालेल्या मालाच्या खरेदीसाठीही संबंधित कंपनीचा पुढाकार असणार आहे. प्रकल्पातील सहभागी शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे प्रती हेक्‍टरला जिवाणू खते, सूक्ष्म मूलद्रव्य, तणनाशके दिली जातील.
Thursday, June 06, 2013 AT 04:45 AM (IST)
भेंडा, जि. नगर  - दीनमित्र ग्रामीण वाचनालयाच्यावतीने नेवासा तालुक्‍यात रेन वॉटर हार्वेस्टिंग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. 14 मेपासून तालुक्‍यासह हे अभियान राबविले जात असून, आता अभियानाची व्याप्ती जिल्हाभर वाढवली जाणार आहे, असे वाचनालयाचे अध्यक्ष सुखदेव फुलारी यांनी सांगितले. अभियानात नागरिकांना बोअरचे पुनर्भरण करणे, विहिरीचे पुनर्भरण करणे, जमिनीची धूप थांबविणे, जमिनीतील पाण्याची जलपातळी वाढविणे, पिण्यासाठी व वापरासाठी पाणीसाठा निर्माण करणे अशा विविध विषयासंबंधी मोफत मार्गदर्शन करण्यात येत आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी संपर्क  - 9423749275, 9921918747.
Tuesday, May 28, 2013 AT 04:00 AM (IST)
कोपरगाव, जि. नगर - येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध उद्योगपती, ज्येष्ठ नागरिक, सेवामंचचे संस्थापक अध्यक्ष भागचंद धनराज ठोळे (86) यांचे नुकतेच पुणे येथील केईएम रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात तीन मुले, एक मुलगी, नातू, पणतू असा परिवार आहे. महाराष्ट्र राज्य खते, बियाणे, कीडनाशके वितरक संघटनेचे अध्यक्ष कैलासचंद्र तसेच प्रकाश, मुनीष ठोळे यांचे ते वडील होत. कै. भागचंद ठोळे यांच्या पार्थिवावर कोपरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कै. भागचंद यांनी कोपरगाव मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष, कोपरगाव पीपल्स बॅंक, श्रीमान गोकुळचंद विद्यालय, औद्योगिक वसाहत, महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, श्री गजपंथ सिद्धक्षेत्र म्हसरूळ आदी संस्थांमध्ये विश्‍वस्त म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला होता. बहुआयामी, आदर्श उद्योगपती, ज्येष्ठांची काळजी घेणारा नागरिक, सर्वसामान्यांचे दु:ख जाणणारे नेतृत्व भागचंद ठोळे होते, अशा शब्दांत खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अशोक काळे, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी श्रद्धांजली वाहिली.
Monday, May 27, 2013 AT 05:15 AM (IST)
नगर  - खरीप हंगामाचे जिल्ह्यात अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना मागणीनुसार खते, बी- बियाणे व कीटकनाशके यांचा वेळेवर पुरवठा करण्याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे आदेश पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी रविवारी (ता. 19) दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्ह्यातील खरीप हंगामाचा आढावा पालकमंत्री पाचपुते यांनी घेतला, त्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबासाहेब तांबे, समाजकल्याण समितीचे सभापती शाहूराव घुटे, जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार, पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता आदी उपस्थित होते. श्री. पाचपुते म्हणाले, ""खरीप हंगामाच्या नियोजनासाठी तालुकास्तरावर बैठका घेतल्याने सूक्ष्मपणे नियोजन झाले आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पर्जन्यमानही चांगले होणार आहे. खते, बी- बियाणे यांचे वाटप शेतकऱ्यांना गटामार्फत करण्याचे सरकारचे धोरण आहे, त्यासाठी जिल्ह्यात 11 हजार गट तयार करण्यात आले आहेत.
Tuesday, May 21, 2013 AT 04:45 AM (IST)
नगर (प्रतिनिधी) ः नगर बाजार समितीत शुक्रवारी (ता. 17) ज्वारीची 75 क्विंटलची आवक झाली. ज्वारीला 1500 ते 2000 व सरासरी 1750 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. गूळडागाची आवकेत मंदी होती. गूळडागाची 613 क्‍विंटलची आवक होऊन 2800 ते 3350 व 3087 रुपयांचा सरासरी दर मिळाला. नगर बाजार समितीत सध्या गेल्या महिन्याभरापासून भुसारसह भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. उन्हाळ्याची स्थिती असल्याने आवकेत मंदी आहे. शुक्रवारी बाजरीची 50 क्विंटलची आवक झाली. बाजरीला 1600 ते 1851 व 1725 रुपयांचा सरासरी दर मिळाला. काबुली हरभऱ्याची सात क्‍विंटल आवक झाली. काबुली चण्याला 4400 ते 5250 व 4825 चा सरासरी दर मिळाला. जाड्या हरभऱ्याची 70 क्विंटलची आवक झाली. जाड्या हरभऱ्याला 3450 ते 4000 हजार व 3725 चा सरासरी दर मिळाला. गावरान हरभऱ्याची 30 क्विंटलची आवक होऊन 3125 ते 3375 व सरासरी 3250 चा दर मिळाला. चिंचेची 36 क्विंटलची आवक झाली. चिंचेला 4575 ते 5200 व 4887 चा सरासरी दर मिळाला. चवळीची एक क्विंटलची आवक झाली व पाच हजार चारशे रुपयांचा कमाल व किमान दर मिळाला.
Sunday, May 19, 2013 AT 12:00 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: