Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 53
कृषिमंत्री शरद पवार : यशस्विनी अभियानाच्या "निर्धार' कार्यशाळेचा समारोप नाशिक (प्रतिनिधी) : पारंपरिक भ्रामक कल्पना सोडून देत व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आधुनिक विज्ञान- तंत्रज्ञानाची कास धरा आणि आत्मविश्‍वासाने जगा, असा सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महिलांना दिला. येथील सपकाळ नॉलेज हबमध्ये शुक्रवारी (ता. 14) झालेल्या यशस्विनी अभियानाच्या "निर्धार' कार्यशाळेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी श्री. पवार म्हणाले, की विकसित देशांमध्ये 50 टक्के वाटा महिलांचाच आहे, त्यासाठी भारतातही 50 टक्के आरक्षण देत त्यांच्यावर सामाजिक, आर्थिक विकासाची जबाबदारी सोपवली आहे. परिवर्तनाच्या या चळवळीतून महिलांनी इतिहास घडवावा, त्यासाठी आता पापड- लोणच्यांसारख्या पारंपरिक व्यवसायातच न अडकून पडता इलेक्‍ट्रॉनिक व इतर अत्याधुनिक व्यवसाय सुरू करावेत. मोठ्या उद्योगांना त्यांचा पुरवठा केल्यास आर्थिक फायदा नक्कीच होईल. यासाठी महिलांचे संघटन व त्यांना प्रशिक्षणाची गरज असून, यात यशस्विनीची मोठी जबाबदारी आहे. कमी ज्ञान असलेला विषय समजून घ्या, त्यातून आत्मविश्‍वासही वाढेल.
Sunday, June 16, 2013 AT 12:15 AM (IST)
नाशिक (प्रतिनिधी) : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. 15) टोमॅटो तेजीत होते. टोमॅटोची 125 क्विंटल आवक झाली. टोमॅटोच्या प्रति 20 किलो वजनाच्या क्रेटला 500 ते 750 व सरासरी 600 रुपये दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत गत सप्ताहापासून टोमॅटोची आवक घटली आहे. टोमॅटोचा हा मुख्य हंगाम नसल्याने लागवडीचे प्रमाण अत्यल्प असून, जो माल खुडणीच्या स्थितीत आहेत, त्यावरही करपा व फळकुजीचा प्रादुर्भाव झालेला आहे तसेच मागील आठवड्यापासून सातत्याने ढगाळ हवामान असल्यामुळे टोमॅटोच्या पिकांवर कीड- रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बाजार समितीत कारली, भोपळा, दोडका या वेलवर्गीय भाजीपाल्याची तसेच मेथी व कोथिंबिरीच्या आवकेत लक्षणीय घट झाली होती. शनिवारी कारल्याची सरासरी 14 किलो वजनाच्या 500 क्रेटची आवक झाली. आवकेतील घट आणि जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून वाढती मागणी यामुळे कारल्याला प्रति क्रेट 500 ते 1000 रुपये व सरासरी 700 रुपये दर होते. दोडक्‍याची प्रति 12 किलो वजनाची 100 क्रेटची आवक होऊन दोडक्‍याला प्रति क्रेट 300 ते 700 व सरासरी 400 रुपये दर होते.
Sunday, June 16, 2013 AT 12:00 AM (IST)
कृषिमंत्री शरद पवार : "ठिबक'चे अनुदान वाढविण्याचा विचार येवला, जि. नाशिक - दुष्काळ पडल्यामुळे राज्यातील गाळाने भरलेल्या अनेक बंधाऱ्यांतून गाळ काढण्याची मोहीम जोरदारपणे राबविली गेली. प्रत्येक जिल्ह्यातून कोट्यवधी ब्रास गाळ निघाला, त्यामुळे पुढील तीन ते चार वर्षे राज्यात गाळ काढण्याचे काम सुरू राहणार आहे. यामुळे पाण्याखाली येणारे क्षेत्र दुप्पट वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केला तसेच फळबागांचे क्षेत्र वाढावे याकरिता केंद्र शासन ठिबक सिंचनासाठीचे अनुदान वाढविण्याचा विचारात आहे, अशी माहितीही श्री. पवार यांनी दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांचा मतदार संघ असलेल्या येवला तालुक्‍यात विविध विकासकामांच्या कार्यक्रमांनंतर शुक्रवारी (ता. 14) आयोजित शेतकरी मेळाव्यात कृषिमंत्री पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी भुजबळ होते. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, खासदार समीर भुजबळ, हरिश्‍चंद्र चव्हाण, म्हाडाचे अध्यक्ष नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, माजी आमदार मारोतराव पवार, माणिकराव शिंदे, आमदार ए. टी.
Saturday, June 15, 2013 AT 05:30 AM (IST)
राधाकृष्ण विखे पाटील  - इतर राज्यांत द्राक्ष विक्री केंद्रे उघडण्याचा प्रयत्न नाशिक  - दरवर्षी शिवारसौद्यात द्राक्ष उत्पादकांचे पैसे घेऊन पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. यासंदर्भात येत्या हंगामापासून कडक पावले उचलण्यात येणार आहेत. द्राक्ष उत्पादक पट्ट्यात व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. देशपातळीवर द्राक्षाचे "ब्रॅंडिंग' करण्यासाठी राज्याबाहेरील बाजारपेठांत विक्री केंद्रे सुरू करण्यासंदर्भात नियोजन सुरू असल्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बाजार समित्यांच्या सक्षमीकरणाबाबत मंगळवारपासून (ता. 11) कार्यशाळेचे येथील स्प्लेंडर हॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्‌घाटनसत्रानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. विखे म्हणाले, ""वर्षभर डोळ्यांत तेल घालून द्राक्ष उत्पादक उत्पादन घेतो. मात्र, व्यापारी पळून गेला, तर शेतकरी मोठ्या संकटात सापडतो. या परिस्थितीत शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पणन खात्याकडून नियोजन करण्यात येत आहे.
Wednesday, June 12, 2013 AT 04:30 AM (IST)
कारेपूर महसूल मंडळात 66 मिलिमीटर पाऊस लातूर  - गेले चार महिने कडक उन्हाळ्याला सामोरे गेलेल्या लातूर जिल्ह्यातील बळिराजाला सोमवारी (ता. 3) रात्री झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. कारेपूर महसूल मंडळात 66 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या वर्षी कडक उन्हाळ्याला सामोरे जावे लागले आहे. दररोज 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान राहिले आहे. बळिराजालाही याचा मोठा त्रास सहन करावा लागला. जून महिन्याच्या सुरवातीपासूनच पावसाचे संकेत दिसू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक पाऊस झाला आहे. सोमवारी (ता. 3) रात्री जिल्ह्यात सरासरी 12.14 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात लातूर तालुक्‍यात 12.13, औसा 10.29, रेणापूर 35.50, उदगीर 5.43, अहमदपूर 15.33, चाकूर 13.20, जळकोट एक, निलंगा 8.88, देवणी 13.33, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यात 6.33 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कारेपूर महसूल मंडळात सर्वाधिक 65 मिलिमीटर पाऊस झाला.
Wednesday, June 05, 2013 AT 04:45 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: