Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 249
एक लाख हेक्‍टरला मिळणार लाभ 42,300 हेक्‍टरवर प्रात्यक्षिके 71 हजार हेक्‍टरला अनुदानावर निविष्ठा पुणे  - राज्याच्या तुलनेत निम्म्याहून कमी भात उत्पादकता असलेल्या नाशिक, पुणे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांत यंदा "राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना' अंतर्गत भात उत्पादकतावाढ अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येकी शंभर हेक्‍टरचे बाबनिहाय 288 प्रकल्प, सघन पद्धतीच्या प्रात्यक्षिकांचे 100 व संकरित तंत्रज्ञानाचे 35 असे एकूण 423 प्रकल्प स्वतंत्रपणे राबवायचे आहेत. यासाठी 26 कोटी 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत 13 हजार 500 हेक्‍टरवर भात उत्पादकतावाढ प्रात्यक्षिके उभारण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त सुमारे 71 हजार हेक्‍टर क्षेत्रासाठी सुधारित व संकरित बियाणे, खते, कीडनाशके, यंत्रे आदी निविष्ठांचा 50 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे. प्रकल्प क्षेत्रातील भात पिकासाठी 100 टक्के अनुदानातून निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. तर प्रकल्पाबाहेरील क्षेत्राला निविष्ठांसाठी प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात येणार आहे.
Wednesday, June 19, 2013 AT 05:30 AM (IST)
कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे  - अरबी समुद्रात किनारपट्टीलगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने दमदार पाऊस पडत आहे. गेल्या चोवीस तासांत कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. विदर्भात पावसाचा जोर कमी झाला असला, तरी अनेक ठिकाणी संततधार पाऊस पडत आहे. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या हलक्‍या सरी पडत असून, शेतकरी अद्याप जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. घाटमाथ्यावर चांगला पाऊस पडत आहे. हवामान खात्याने गुरुवार (ता. 20) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला असून, कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, मंगळवार (ता. 18) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नैर्ऋत्य मॉन्सून वारे (मॉन्सून) कोकणात सक्रिय होते, त्यामुळे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला.
Wednesday, June 19, 2013 AT 05:30 AM (IST)
कृषी विभाग : पाच टक्के पेरण्या सरासरी 101 टक्के पाऊस पुणे  - यंदा मॉन्सूनच्या वेळेवर आगमनामुळे कोकण, विदर्भासह राज्याच्या विविध भागांत शेती कामांना वेग आला आहे. राज्यात यंदा 134.69 लाख हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र असून, सोमवार (ता. 17)अखेर राज्यात ऊस वगळता सुमारे सहा लाख हेक्‍टर (पाच टक्के), तर ऊस पिकासह 11.76 लाख हेक्‍टरवर, म्हणजेच 8.2 टक्के पेरणी झाली आहे. राज्यात सरासरीच्या 101 टक्के पाऊस झाला असल्याची माहिती कृषी आयुक्‍तालयाने दिली आहे. राज्यात यंदा ऊस पिकाचे क्षेत्र वगळून 134.69 लाख हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र आहे. ऊस पिकासह 143.84 लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. यंदा राज्यात मॉन्सूनचे वेळेच्या अगोदर आगमन होऊन बहुतांश ठिकाणी जोरदार बरसल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. राज्यात कोकण, कोल्हापूर, पुणे व नागपूर विभागांत भात रोपवाटिका तयार करण्याची कामे सुरू आहेत. तर विदर्भात कापसाची पेरणी प्रगतिपथावर आहे. राज्यातील इतर विभागांत पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असून खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, व सोयाबीन पिकांची पेरणी प्रगतिपथावर आहे.
Wednesday, June 19, 2013 AT 05:00 AM (IST)
जुलै- ऑगस्टमध्ये अंमलबजावणी शेतकरी गट, ग्रामपंचायतींच्या सहभागातून होणार उद्दिष्ट साध्य पुणे  - राज्यातील सुमारे पाच लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्र व्यापणाऱ्या आणि पीक उत्पादनघटीस कारणीभूत ठरणाऱ्या गाजर गवताच्या निर्मूलनासाठी येत्या जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यभर व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकरी गट, शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींच्या सहभागातून गाजर गवताचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकरी गाजर गवताच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेले आहेत. 1970-72 पासून गाजर गवताचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढला आहे. राज्यात हे गवत कॉंग्रेस, पांढरी फुली, चटक चांदणी या नावांनीही ओळखले जाते. शेतीच्या नुकसानीबरोबरच शेतकऱ्यांच्या आरोग्यालाही या गवतामुळे धोका पोचत असल्याने कृषी विभागाने त्याच्या निर्मूलनासाठी व्यापक पातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. असे आहे नियोजन येत्या 15 जूनपासून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती समितीची स्थापना होऊन गाजर गवत निर्मूलन मोहिमेला सुरवात होईल.
Tuesday, June 18, 2013 AT 05:30 AM (IST)
खडकवासला, जि. पुणे - पुणे व परिसरातील धरणांच्या परिसरात शनिवारी (ता. 15) मध्यरात्री सुरू झालेला पाऊस रविवारी सायंकाळपर्यंत मुसळधार पडला. परिणामी धरणांतील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली आहे. खडकवासला येथे रविवारी (ता. 16) सकाळी सहा ते दुपारी तीन या वेळेत 28 मि.मी., पानशेतला 36, वरसगाव 33 मि.मी. पाऊस पडला. खडकवासला धरणातील पाणीसाठा 0.2 टीएमसी वाढल्याची माहिती शाखा अभियंता एन. डी. गायकवाड यांनी दिली. शनिवारी (ता. 15) दिवसभर फारसा पाऊस नव्हता. शनिवारी रात्री नऊनंतर पावसाने जोर धरला. रात्रभर जोरदार पाऊस कोसळत होता. या चारही धरण क्षेत्रांतील रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील पाऊस, धरणसाठा धरण - 16 जूनचा पाऊस - एकूण पाऊस - धरणसाठा (टीएमसी) - धरणसाठा (टक्के) टेमघर - 127 - 368 - 0.05 - 1.27 वरसगाव - 126 - 382 - ... - ... पानशेत - 124 - 370 - 1.64 - 15.38 खडकवासला - 55 - 157 - 0.18 - 9.34 एकूण उपयुक्त साठा - 1.87 टीएमसी (6.41 टक्के) मागील वर्षीचा साठा - 1.56 टीएमसी (5.37 टक्के)
Monday, June 17, 2013 AT 12:45 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: