Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 126
- ऐतिहासिक चढाईने सर्व रेकॉर्ड मोडीत - पश्‍चिम विदर्भ, कोकणात पावसाची हजेरी - मराठवाडा, उत्तर- मध्य महाराष्ट्रात प्रतीक्षा पुणे - सर्वसाधारण तारखेच्या एक महिना आधीच मॉन्सूनने देश व्यापल्याची ऐतिहासिक नोंद या वर्षी झाली आहे. साधारणतः 53 वर्षांपूर्वी 21 जूनला मॉन्सूनने देश व्यापला होता. महाराष्ट्रात कोकण, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कालही कायम होता. नद्या- नाले दुथडी भरून वाहू लागल्याने पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली. काही धरणांच्या पाणीसाठ्यात आवक वाढली आहे. हतनूर (जि. जळगाव) धरणाचे सर्व दरवाजे रविवारी उघडण्यात आले. पूस (जि. यवतमाळ) प्रकल्प जून महिन्यात पहिल्यांदाच ओसंडून वाहू लागला. कोकणातील अनेक लहान- मध्यम प्रकल्पही भरले असून, पेण तालुक्‍यात सर्वाधिक 262 मिलिमीटर, तर विदर्भात आरमोरी (जि. गडचिरोली) तालुक्‍यात 211 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाडा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह सांगली, सातारा जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुणे जिल्ह्यात सर्वदूर, तर येथील धरण क्षेत्रात 100 मि.मी पेक्षा अधिक पाऊस झाला.
Monday, June 17, 2013 AT 02:30 AM (IST)
खडकवासला, जि. पुणे - पुणे व परिसरातील धरणांच्या परिसरात शनिवारी (ता. 15) मध्यरात्री सुरू झालेला पाऊस रविवारी सायंकाळपर्यंत मुसळधार पडला. परिणामी धरणांतील पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली आहे. खडकवासला येथे रविवारी (ता. 16) सकाळी सहा ते दुपारी तीन या वेळेत 28 मि.मी., पानशेतला 36, वरसगाव 33 मि.मी. पाऊस पडला. खडकवासला धरणातील पाणीसाठा 0.2 टीएमसी वाढल्याची माहिती शाखा अभियंता एन. डी. गायकवाड यांनी दिली. शनिवारी (ता. 15) दिवसभर फारसा पाऊस नव्हता. शनिवारी रात्री नऊनंतर पावसाने जोर धरला. रात्रभर जोरदार पाऊस कोसळत होता. या चारही धरण क्षेत्रांतील रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील पाऊस, धरणसाठा धरण - 16 जूनचा पाऊस - एकूण पाऊस - धरणसाठा (टीएमसी) - धरणसाठा (टक्के) टेमघर - 127 - 368 - 0.05 - 1.27 वरसगाव - 126 - 382 - ... - ... पानशेत - 124 - 370 - 1.64 - 15.38 खडकवासला - 55 - 157 - 0.18 - 9.34 एकूण उपयुक्त साठा - 1.87 टीएमसी (6.41 टक्के) मागील वर्षीचा साठा - 1.56 टीएमसी (5.37 टक्के)
Monday, June 17, 2013 AT 12:45 AM (IST)
कोल्हापूर/ सांगली - जिल्ह्यात रविवारी दुपारपर्यंत पश्‍चिम भागात हलक्‍या स्वरूपाच्या सरी होत्या. हातकणंगले, कागल, शिरोळ तालुक्‍यांत ढगाळ हवामान कायम होते. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार राधानगरीत सर्वाधिक 50 मि.मी. पाऊस झाला. राधानगरी धरणातून 400 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग वीजनिर्मितीसाठी करण्यात येत असल्याने भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण वगळता कडवी प्रकल्पातून 225 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली जिल्ह्यात ढगाळ हवामान कायम होते. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला. वारणावती येथे आठ मि.मी. पावसाची नोंद झाली. मिरज पूर्व भाग, इस्लामपूर, वाळवा, शिराळा तालुक्‍यांत पावसाने समाधानकारक हजेरी लावली. मात्र दुष्काळी तालुके अद्याप तहानलेलेच आहेत. पूर्वमोसमीचा अपवाद वगळता मोसमी पावसाने अद्यापही आटपाडी, जत तालुक्‍यात समाधानकारक हजेरी न लावल्याने पूर्व मोसमीच्या ओलीवर झालेल्या पेरण्या संकटात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. 16) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मि.मी.
Monday, June 17, 2013 AT 12:30 AM (IST)
कणकवली, जि. सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गात मृग नक्षत्राच्या तोंडावर सुरू झालेला पावसाचा जोर शनिवारी (ता. 15) कायम होता. पावसामुळे जुनाट वृक्ष कोसळून मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शनिवारी कोकण रेल्वेमार्गावरही झाड पडल्याने दोन तास रेल्वे उशिराने धावत होती. रविवारी (ता. 16) मात्र पावसाचा जोर काहीसा कमी होता. पावसाने जिल्ह्यातील नदी- नाल्यांचे नैसर्गिक स्रोत सुरू झाले आहेत. जिल्ह्यात 75 हजार हेक्‍टरवर खरीप हंगामाची पेरणी आणि लागवड होते. गेल्या दहा दिवसांत 25 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. भात पेरणीनंतर रोप लावणीच्या कामालाही काही ठिकाणी सुरवात झाली आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. 16) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला सरासरी पाऊस ः एकूण सरासरी 320.80 मि.मी., दोडामार्ग 22, सावंतवाडी 42, वेंगुर्ला 14.80, कुडाळ 45, मालवण 83, कणकवली 58, देवगड 19 आणि वैभववाडी 37 मि.मी.
Monday, June 17, 2013 AT 12:00 AM (IST)
- चार तासांत 347 मि.मी. पाऊस - शेतजमिनींचे अतोनात नुकसान - वाशीम जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांत अतिवृष्टी मंगरूळपीर, जि. वाशीम : मंगरूळपीर तालुक्‍यात शुक्रवारी (ता. 14) अवघ्या चार तासांत पडलेल्या 347 मि.मी. मुसळधार पावसाने कहर केला. नदी-नाल्यांना पूर आले, पाण्याखाली पूल गेल्याने अनेक ठिकाणची वाहतूक विस्कळित झाली. या ढगफुटीने पेरणीकरिता मशागती झालेल्या शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले. पश्‍चिम विदर्भात अनेक ठिकाणी 100 मि.मी.पेक्षा अधिक पाऊस होऊन जनजीवन विस्कळित झाले. दरम्यान, देशात शुक्रवारी (ता. 14) रात्री झालेला आणि आतापर्यंतचा एकाच ठिकाणी पडलेला हा सर्वांत मोठा पाऊस होता. यापूर्वी 13 जूनला अहेरी (जि. गडचिरोली) येथे 246 मि.मी., तर 9 जूनला चेरापुंजी (मेघालय) येथे 315 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्‍यात पावसाने शुक्रवारी रात्री हाहाकार उडवून दिला. अडाण, अरुणावती, पूर्णा, शिवणी नद्या ओसंडून वाहू लागल्या. पुलावरून पाणी वाहू लागल्याने मानोरी- मंगरूळपीर, अकोला रस्ता, कारंजा- वाशीम आदी रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले.
Sunday, June 16, 2013 AT 01:00 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: