Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 4
मालवण, जि. सिंधुदुर्ग : संकल्प पशुपालक मंडळ रामगड, गोठणे व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने रामगड येथे शेतकरी मेळावा झाला. मेळाव्याचे उद्‌घाटन पंचायत समिती सदस्य सौ. सीमा परुळेकर यांच्या हस्ते झाले. पशुधन विकास अधिकारी डॉ. यू. जी. कदम यांनी दुधाळ जनावरांच्या आरोग्याची काळजी यासंबंधी मार्गदर्शन केले. डॉ. एस. वाय. देसाई यांनी पशुपालनाचे शेतीसाठी असलेले महत्त्व सांगितले. डॉ. एस. डी. सावंत यांनी दुग्ध उत्पादन व सकस चारा याविषयी माहिती दिली. सरपंच संदीप जिकमडे, गोठणे सरपंच बाबू परब, उपसरपंच ज्ञानदेव जाधव, सौ. संजना घाडीगावकर, गुरुदास मालंडकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tuesday, April 30, 2013 AT 04:00 AM (IST)
नितीन गडकरी  - दाभोळेतील आंबा फळप्रक्रिया प्रकल्पाचे उद्‌घाटन देवगड, जि. सिंधुदुर्ग  - देश स्वतंत्र होऊन 65 वर्षे झाली तरी देशासमोरचे प्रश्‍न आजही कायम आहेत. रस्ते, शौचालय, पाणी, शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा आजही तोकड्याच आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रोटी, कपडा, मकान या गोष्टी मिळतील त्या वेळीच देशाचे चित्र बदलले असे म्हणता येईल. सध्या मात्र आपला "देश धनवान आणि जनता गरीब आहे', अशी टीका भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दाभोळे (ता. देवगड) येथे केली. येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने दाभोळे-पोखरबांव येथे नव्याने उभारलेल्या आंबा फळप्रक्रिया प्रकल्पाचे उद्‌घाटन शनिवारी श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. श्री. गडकरी म्हणाले, ""राजकारण हे विकासकारण झाले पाहिजे. सामान्य माणसाचे, गरिबांचे अश्रू पुसण्याचे काम केले तर कटआऊट उभारावे लागणार नाहीत. समाजकारण, विकासकारण केले तर मते मागत फिरण्याचीही गरज भासणार नाही. प्रामाणिक जनसेवेतून नेतृत्व उभे राहते. चांगल्या गोष्टीची सुरवात करणारे काही मोजकेच लोक असतात.
Monday, April 29, 2013 AT 04:00 AM (IST)
आमदार विजय सावंत यांची माहिती : दोन वर्षांत प्रकल्प होणार कार्यान्वित कणकवली, जि. सिंधुदुर्ग - अडीच हजार मेट्रिक टन प्रतिदिनी गाळपक्षमता असलेला सिंधुदुर्गातील पहिल्या साखर कारखान्याला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. तालुक्‍यातील शिडवणे येथे येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प सुरू होणार आहे. यात चाळीस टक्‍के शेअर्स शेतकऱ्यांसाठी असतील. तसेच साखर उत्पादनाबरोबर वीजनिर्मिती, इथेनॉल आदी प्रक्रिया होणार असल्याची माहिती आमदार विजय सावंत यांनी बुधवारी (ता.20) दिली. याबाबत आमदार सावंत म्हणाले, की कारखान्याची गाळपक्षमता हंगामामध्ये पाच लाख मेट्रिक टन एवढी आहे. दररोज अडीच हजार मेट्रिक टन उसावर प्रक्रिया होणार आहे. सिंधुदुर्गात सध्या एक ते दीड लाख टन उसाचे उत्पादन होत आहे. मात्र ते पारंपरिक पद्धतीने घेतले जाते. नव्या तंत्रानुसार ते उत्पादन पाच ते सात लाख मेट्रिक टनांपर्यंत जाणार आहे. त्यासाठीचे बियाणे, तांत्रिक मार्गदर्शन व इतर आनुषंगिक बाबी कारखान्याच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. नव्या कारखान्याचे नाव विजय सावंत शुगर ऍण्ड ऍग्रो इंडस्ट्री असून शिडवणे येथील शंभर एकर जागेत त्याची उभारणी होणार आहे.
Friday, February 22, 2013 AT 03:00 AM (IST)
वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग  - जिल्हा परिषद कृषी समितीच्या शनिवारी (ता. 2) येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत 2013-14 च्या एक कोटी 94 लाख खर्चाच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. कृषी समितीची सर्वसाधारण सभा येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात कृषी समिती सभापती मधुसुदन बांदिवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सदस्य विभावरी खोत, समीर नाईक, राजेंद्र प्रभुदेसाई, दिलीप रावराणे, योगिता परब, सोनाली घाडीगावकर, कृषी विकास अधिकारी श्री. म्हेत्रे, जिल्हा कृषी अधिकारी जनार्दन फाले, मोहीम अधिकारी श्री. गंगाई उपस्थित होते. जिल्ह्यात आंबा, काजू बागांना आग लागून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी सूचना या वेळी दिलीप रावराणे यांनी मांडली. शेतकऱ्यांचे नुकसानीचे स्वरूप पाहून कमीत कमी पाच व जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यासंदर्भात तरतूद करण्याचे या वेळी ठरविण्यात आले.
Monday, February 04, 2013 AT 03:45 AM (IST)
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: