Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 8
विदर्भात उष्णतेची लाट उच्चांकी पातळीवर लाट अधिक तीव्र होण्याचा इशारा पुणे - विदर्भातील उष्णतेच्या लाटेने गेल्या अनेक वर्षांपासूनची तापमानाची कमाल पातळी ओलांडली आहे. गुरुवारी (ता. 23) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत चंद्रपूरमध्ये देशातील सर्वाधिक 48.2 अंश सेल्सिअस, तर अमरावतीत 48 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. उष्णतेची ही लाट येत्या रविवारपर्यंत (ता. 26) अधिक तीव्र होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून विदर्भातील कमाल तापमानात सातत्याने वाढ सुरू आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत या लाटेने उच्चांक गाठला. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये ही लाट कायम होती. विदर्भाबरोबरच मराठवाड्यातही काही ठिकाणी उष्णतेची लाट असून ती अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील बाष्पयुक्त ढगांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे रविवारी सकाळपर्यंत कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कर्नाटक व केरळच्या किनारी भागातही पावसाचा अंदाज आहे.
Friday, May 24, 2013 AT 04:45 AM (IST)
पावसाचाही अंदाज चक्रीवादळाचा प्रभाव पुणे  - उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ हवामानात वाढ झाल्याने शनिवारी सकाळपर्यंत विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गडगडाटी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. याबरोबरच विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचाही इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अमरावती येथे सर्वांत जास्त 44 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. शनिवारी सकाळपर्यंत विदर्भात कमाल तापमानात एक- दोन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी (ता. 16) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)  - मुंबई 34.9, अलिबाग 34.9, रत्नागिरी 33, पणजी 34, डहाणू 34.5, भिरा 38.5, पुणे 36.6, नगर 40.9, जळगाव 43.4, कोल्हापूर 34.8, महाबळेश्‍वर 29.3, मालेगाव 42.4, नाशिक 36.9, सातारा 36.8, सोलापूर 40.6, औरंगाबाद 39.9, परभणी 42, अकोला 43.2, अमरावती 44, ब्रह्मपुरी 43.
Friday, May 17, 2013 AT 05:00 AM (IST)
विदर्भ उष्णतेच्या लाटेवर, नागपुरात पारा 47 अंशांवर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र पुणे  - विदर्भातील उष्णतेची लाट कायम आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नागपूरमध्ये देशात सर्वाधिक 46.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुसरीकडे उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून, शनिवारी (ता. 11) या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी उंचावलेला कमाल तापमानाचा पारा किमान येत्या रविवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीहून अधिक आहे. याबरोबरच विदर्भापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेच्या खालच्या थरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. शुक्रवारी (ता. 10) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)  - मुंबई 34.5, अलिबाग 34.3, रत्नागिरी 34, डहाणू 34.1, भिरा 40, पुणे 37.8, नगर 41.3, कोल्हापूर 38.3, महाबळेश्‍वर 31.7, मालेगाव 43, नाशिक 37.4, सांगली 40.2, सातारा 41.4, सोलापूर 43.
Saturday, May 11, 2013 AT 03:15 AM (IST)
सर्वत्र पारा 45 अंशांपार मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही तापमान वाढ पुणे -विदर्भात सर्वत्र कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होऊन उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. संपूर्ण विदर्भात कमाल तापमान 46 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. उष्णतेची लाट शुक्रवारी (ता. 10) कायम राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नागपूर येथे देशात सर्वाधिक 46.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. संपूर्ण मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीहून लक्षणीय वाढ, तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली. गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. राज्याच्या उर्वरित भागात हवामान मुख्यतः कोरडे होते. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. शनिवारपर्यंत (ता.11) या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची चिन्हे आहेत. मध्य प्रदेशपासून, विदर्भ, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
Friday, May 10, 2013 AT 03:45 AM (IST)
पुणे  - विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत चंद्रपूरमध्ये देशातील सर्वाधिक 45.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. उर्वरित महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीच्या आसपास आहे. हवामान खात्याने मंगळवारी सकाळपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भातील कमी दाबाचा पट्टा कायम असून, अरबी समुद्रात अल्प प्रमाणात ढगाळ हवामान आहे. राज्यातही काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळलेले राहण्याची शक्‍यता आहे. रविवारी (ता. 5) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये  - मुंबई 34, अलिबाग 34.6, रत्नागिरी 33.2, पणजी 33.6, डहाणू 34.2, भिरा 39.5, पुणे 37.1, नगर 40.9, जळगाव 42.6, कोल्हापूर 37, महाबळेश्‍वर 30, मालेगाव 43,5, नाशिक 36.7, सांगली 39.2, सातारा 37.2, सोलापूर 42.2, औरंगाबाद 40, परभणी 43.1, नांदेड 43.5, अकोला 43.
Monday, May 06, 2013 AT 03:45 AM (IST)
1 2
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: