Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 7
सीआयआय-मॅकेन्झीची शिफारस शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास कृषिदर 5.2 टक्‍क्‍यांवर पोचेल नवी दिल्ली  - शेतीचे अर्थकारण वाढविण्यासाठी तृणधान्य, कडधान्य पिकांपेक्षा फळे, भाजीपाला या अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या शेतीवर, प्रक्रियेवर आणि बाजार विकासावर शेतकऱ्यापासून सरकारपर्यंतच्या सर्व घटकांनी भर द्यावा, अशी शिफारस भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) केली आहे. सीआयआय आणि मॅकेन्झी अँड कंपनी या संस्थांनी तिसरा "अन्न व कृषी एकात्मिक विकास आराखडा' (एफएआयडीए) हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आंबा, केळी, बटाटा, सोयाबीन, पोल्ट्री उत्पादने ही पाच उत्पादने देशातील शिवाराचा कायापालट करण्यात अग्रभागी असतील असेही म्हटले आहे. या अहवालातील शिफारशींचा प्रभावीपणे अवलंब झाल्यास कृषी क्षेत्राचा विकासदर 5.2 ते 5.7 टक्‍क्‍यांवर जाऊ शकतो, असाही विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे. देशातील अन्न उत्पादनांच्या वाढत्या मागणीचे प्रमाण लक्षात घेता 2030 पर्यंत देशाचे कृषी उत्पन्न सुमारे अडीच पटीने वाढून 29.28 लाख कोटी रुपयांवर पोचेल.
Tuesday, April 16, 2013 AT 05:00 AM (IST)
शासनाने विविध विभागांना जारी केले परिपत्रक पुणे  - शेतीमाल विक्री व्यवस्थेतील साखळीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते. ती रोखण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. थेट शेतीमाल विक्री योजनेच्या प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध विभागांना परिपत्रकाद्वारे सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास शेतीमाल विक्री व्यवस्थेत क्रांतिकारी बदल होऊन शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यात मदत होणार आहे. शेतीमाल विक्रीच्या प्रभावी यंत्रणांचा अभाव, बाजार समित्यांमधून होणारी पिळवणूक रोखण्यासाठी पणन मंत्रालयाने शेतकऱ्यांना कुठेही शेतीमाल विक्री करण्याची परवानगी दिली. थेट शेतीमाल विक्री योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी सक्षम यंत्रणा उभारण्यासाठी पणन विभागाने विविध विभागांना परिपत्रकाद्वारे सूचना पाठविल्या आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवर समितीची स्थापना करण्यात आली आहे. कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पातळीवरील समितीची स्थापना करण्यात आली आहे.
Thursday, April 11, 2013 AT 04:00 AM (IST)
सातारा  - अजिंक्‍यतारा शेतकरी सहकारी फळे फुले व भाजीपाला खरेदी विक्री संस्था सातारा व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शनिवार (ता. 13) ते रविवार (ता.14) दरम्यान येथील भूविकास बॅंकेच्या हॉलमध्ये ज्वारी, गहू व तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शेतकरी व ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे. याबाबत वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, की थेट भाजीपाला विक्री उपक्रम संस्थेमार्फत सध्या पुण्यातील बिबवेवाडी येथे राबविण्यात येत आहे. दररोज 300 ते 400 किलो भाजीपाला येथे विकला जात असून, शेतकऱ्याला चांगला दरही मिळू लागला आहे. पुण्याच्या धरतीवरच सातारा येथेही घरपोच भाजीपाला ही संकल्पना संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला भाव मिळावा, ग्राहकांना चांगल्या उच्च प्रतीचे धान्य मिळावे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच या ज्वारी, गहू व तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
Saturday, April 06, 2013 AT 04:30 AM (IST)
लातूर - राज्याच्या कृषी व पणन विभागाच्या वतीने जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून राज्यात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पातून जिल्ह्यातील लातूर, उदगीर व अहमदपूर या तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पायाभूत सुविधांसाठी निधी मिळणार आहे. यात बाजार समित्यांकडून सादर होणाऱ्या अंदाजपत्रकानुसार हा निधी दिला जाणार आहे. या निधीमुळे बाजार समित्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. शेतकरी भाजीपाल्यासह विविध प्रकारच्या शेतीमालाचे उत्पादन घेतात मात्र त्यांना चांगली बाजारपेठ मिळत नसल्याने त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव येत नाही. मध्यस्थच चांगली कमाई करतात. या स्थितीत मध्यस्थांना बाजूला ठेवून उत्पादक शेतकऱ्यांना थेट खरेदीदारांपर्यंत पोचवून शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्याचे प्रयत्न सरकारने हाती घेतले आहेत. यासाठी खरेदीदार संस्थांचे बळकटीकरण करून त्यांना स्पर्धेसाठी सक्षम करण्यात येणार आहे. यातून सरकारने जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प हाती घेतला आहे.
Tuesday, April 02, 2013 AT 04:00 AM (IST)
सध्याच्या पोषक वातावरणात भाजीपाला पिकांवर मावा, तुडतुडे, कोळी व फुलकिडे (थ्रिप्स) या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येईल. त्यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्‍लोप्रीड (17.8 टक्के एसएल) अर्धा मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारावे. फवारणीनंतर एक आठवडा फळे वा शेंगांची तोडणी करू नये. काकडीवर्गीय पिकांत रेड पंपकीन बीटलचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायक्‍लोरव्हॉस (76 टक्के ईसी) एक मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारावे. भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कार्बेन्डाझिम (50 टक्के डब्ल्यूपी) एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे. भेंडी, वांगी व टोमॅटोमध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येईल. अळीच्या नियंत्रणासाठी सुरवातीला नुकसानग्रस्त शेंडा, फांदी व फळे अशा प्रादुर्भावग्रस्त भाग नष्ट करावेत. कामगंध सापळ्यांचा वापर करावा. 1) लसूण : लागवडीनंतर सुमारे पाच महिन्यांत लसूण काढणीस तयार होतो. काढणीस तयार होण्याच्या वेळी पाने पिवळी पडून सुकू लागतात. लसूण काढणीस तयार झाल्यावर गड्ड्याच्या मानेजवळील पातीत बारीक गाठ तयार होते. याला लसणी फुटणे असे म्हणतात.
Saturday, March 23, 2013 AT 12:30 AM (IST)
 
 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: