Last Update:
 
ऍग्रो गाईड
- प्रकाश खरात, धुळे  1) विविध क्षमता आणि प्रकारांत खवानिर्मिती यंत्र उपलब्ध आहे. यंत्रामध्ये गॅसवर चालणारे, डिझेलवर चालणारे आणि वाफेवर चालणारे, असे तीन प्रकार आहेत.  2) बहुतांशी गॅसवर चालणाऱ्या यंत्राचा जास्त वापर होतो. प्रति किलो खवा उत्पादनाच्या खर्चात मात्र यंत्रानुसार खर्च वेगवेगळा येतो.  3) खवानिर्मिती यंत्रामध्ये मोठे गोलाकार भांडे असते. क्षमतेनुसार 0.5 ते 1 एच.पी. मोटारच्या साह्याने भांडे गोल फिरते.

Saturday, October 10, 2015 AT 06:00 AM (IST)

- नरेश गावंडे, येवला, जि. नाशिक  जवस लागवडीसाठी मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करावी. लागवड ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. लागवड 45 सें.मी. x 10 सें.मी. किंवा 30 सें.मी. x 15 सें.मी. अंतराने करावी. लागवडीसाठी हेक्‍टरी 10 किलो बियाणे लागते. जिरायती पिकासाठी हेक्‍टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी पेरून द्यावे.

Saturday, October 10, 2015 AT 05:45 AM (IST)

- टी. एस. जगदाळे, माळशिरस, जि. सोलापूर  ग्लॅडिओलसच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पोयट्याची आणि चांगला निचरा असणारी जमीन फुलांचे लांब दांडे आणि कंदवाढीस उपयुक्त असते. चुनखडी, तसेच हलक्‍या बरड जमिनीत याची लागवड करू नये / टाळावी. या पिकाची लागवड खरीप तसेच रब्बी हंगामात केली जाते. सर्व लागवड एकाच वेळी न करता 15 दिवस किंवा एक महिना, असे अंतर ठेवून लागवड केल्यास फुलांची नासाडी कमी होते.

Saturday, October 10, 2015 AT 05:30 AM (IST)

- जयंत यादव, इंदापूर, जि. पुणे  - गोठा बांधताना शेतातील उंचावर असलेली कठीण व सपाट जागा निवडावी, जेणेकरून गोठ्यातील मलमूत्र, सांडपाणी याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. चाऱ्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल, याची काळजी घ्यावी.  गोठ्याचे छत योग्य उंचीवर आणि न गळणारे असावे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील, अशी व्यवस्था असावी.

Friday, October 09, 2015 AT 05:45 AM (IST)

- जी. एस. रोकडे, तळोदा, जि. नंदुरबार  मेथी लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीसाठी पुसा अर्ली बंचिंग, कसुरी या जाती निवडाव्यात. लागवड सप्टेंबर आणि फेब्रुवारी या कालावधीत करावी. लागवड तीन मीटर बाय दोन मीटरच्या सपाट वाफ्यामध्ये करावी. दोन ओळींमध्ये 15 सें.मी. अंतर ठेवावे. हेक्‍टरी 30 किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.  अळू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

Friday, October 09, 2015 AT 05:45 AM (IST)

- राजेश झाडे, हिवरा, जि. गोंदिया  लिंबूवर्गीय पिकाबाबत संशोधन नागपूर येथील राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्र येथे केले जाते. या ठिकाणी आपणास संत्रा पिकाच्या जाती, लागवड तंत्र, पीक व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड, रोगनियंत्रण तसेच काढणीपश्‍चात तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन मिळेल. अधिक माहितीसाठी केंद्राच्या तज्ज्ञांशी 0712-2500325 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 

Friday, October 09, 2015 AT 05:15 AM (IST)

- किशोर पावडे, चंदगड, जि. कोल्हापूर  1) फणसामध्ये नैसर्गिकरीत्या दोन प्रकार आढळतात एक म्हणजे कापा, तर दुसरा बरका. गरे म्हणून कापा फणसाला प्राधान्य दिले जाते. फणसामध्ये नर व संयुक्त (मादी फुले) वेगवेगळी येतात पण ती एकाच झाडावर असतात. नर फुले ही गोलसर असतात आणि हाताने स्पर्श केल्यानंतर गुळगुळीतपणा जाणवतो, तर मादी फुले लांबट असून काटेरी दिसतात.

Wednesday, October 07, 2015 AT 06:00 AM (IST)

- श्रीधर विटकर, श्रीवर्धन,जि.रायगड  चिकू चिप्स तयार करण्यासाठी चांगले पिकलेले चिकू घ्यावेत. स्टेनलेस स्टीलच्या चाकूच्या साह्याने चिकूची साल काढून घ्यावी. चिकूचे दोन भाग करून त्यातील मधला पांढरा भाग व बिया काढून घ्याव्यात. त्यानंतर चिकूचे पातळ काप करावेत. हे काप सोलर ड्रायर (वाळवणी यंत्रामध्ये) तीन दिवस वाळवावे. कडकडीत वाळवलेले चिकू चिप्स हवाबंद डब्यात भरून ठेवावेत.  चिकू पावडर करण्यासाठी कडकडीत वाळवलेले चिकू चिप्स घ्यावेत.

Wednesday, October 07, 2015 AT 05:30 AM (IST)

- व्ही. एस. जाधव, बीड.  1) शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल याप्रमाणे वळवावे. शक्‍यतोवर खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन निवडावी. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. कारण अशी जागा निवडल्यास तळी गाळाने लवकर भरतात. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे.

Wednesday, October 07, 2015 AT 05:15 AM (IST)

अवस्था ः पेरणीची पूर्वतयारी. रब्बी ज्वारीची पेरणी 15 ऑक्‍टोबरपर्यंत करता येते. पेरणीसाठी 1) हलकी जमीन ः सिलेक्‍शन-3, फुले माउली, 2) मध्यम जमीन ः फुले चित्रा, फुले माउली, मालदांडी-35-1, 3) भारी जमीन ः वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही-22, 4) बागायतीसाठी ः फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही-22 या वाणांचा वापर करावा. - ज्वारीची पेरणी 45 x 15 सें.मी. अंतरावर करावी.

Sunday, October 04, 2015 AT 12:00 AM (IST)

हिरवा चारा वर्षभर विकत घेऊन पुरवणे व्यावसायिकदृष्ट्या परवडणारे नसते. त्यासाठी वेगवेगळ्या चारापिकांच्या लागवडीचे नियोजन केल्यास चांगल्या प्रतीचा, पुरेसा चारा कमी खर्चात वर्षभर उपलब्ध होऊ शकतो. सर्वसाधारणपणे जनावरांच्या आहारात चारा 65-70 टक्के व 30-35 टक्के भाग हा पशुखाद्याचा असतो. हिरव्या चाऱ्यामध्ये जनावरांना एकदल व द्विदल अशा दोनही प्रकारचा चारा पोषकतेच्या दृष्टीने आवश्‍यक असतो.

Sunday, October 04, 2015 AT 12:00 AM (IST)

- पी. एम. माने, आजरा, जि. कोल्हापूर  निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे उत्तम प्रतीच्या दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशींमध्ये अधिक असल्याने सध्या अधिक दुग्धोत्पादनासाठी म्हशी पाळणे किफायतशीर आहे . म्हशींच्या जाती -  मुऱ्हा - उत्तर भारतात, तसेच महाराष्ट्रात ही जात आढळते. शरीरबांधा मोठा, भारदस्त व कणखर असतो. एका वेतातील दुधाचे प्रमाण 1800 ते 2000 लिटर असते. त्यात गाईच्या दुधापेक्षा स्निग्धांश जास्त असतो.

Friday, October 02, 2015 AT 06:30 AM (IST)

- एन. के. निकम, पाटण, जि. सातारा   - हरितगृहासाठी बाहेरून आणलेली माती लाल रंगाची, पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणारी असावी.  - शक्‍यतो ही माती माळरानावरील कोणतेही पीक न घेतलेली असल्यास चांगली असते.  - मातीचा सामू 5.5 ते 6.5 आणि विद्युतवाहकता (ईसी) 0.5 ते एक असावी.  - मातीची सूत्रकृमींसाठी तपासणी करून घ्यावी.

Friday, October 02, 2015 AT 06:00 AM (IST)

- विजय मोहिते, कर्जत, जि. नगर  चवळीपासून मिळणारा चारा हा हिरवागार असून, पालेदार भाग पौष्टिकतेबाबत अतिशय उत्कृष्ट असा असतो. या चाऱ्यामध्ये 13 ते 15 टक्के प्रथिने असतात. चवळीचा वाळलेला चारा मुरघास तयार करण्यासाठीही वापरला जातो. लागवडीसाठी उत्तम प्रकारे निचरा होणारी, मध्यम काळी व सुपीक जमीन चांगली असते. लागवडीपूर्वी साधारणपणे एक चांगली खोल नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन व्यवस्थितरीत्या तयार करून घ्यावी.

Thursday, October 01, 2015 AT 06:15 AM (IST)

- एस. जी. करंडे, मानूर, जि. नाशिक  ब्रोकोली पिकास कोरडे व थंड हवामान मानवते. रेताड, मध्यम, काळी, निचऱ्याची जमीन या पिकास चांगली असते. अती हलकी, क्षारयुक्त, चोपण, पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. शेवटच्या पाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत पसरून जमिनीच्या उतारानुसार लागवडीसाठी सपाट वाफे तयार करावेत. लागवडीसाठी गणेश ब्रोकोली या जातीची निवड करावी. या जातीचा गड्डा आकर्षक, हिरव्या रंगाचा असून, सरासरी वजन 180 ते 200 ग्रॅम असते.

Thursday, October 01, 2015 AT 06:00 AM (IST)

- विशाल देवतळे, चंदगड, जि. कोल्हापूर  1) बांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात 3 x 3 मीटर अंतरावर आखणी करून कंदापासून लागवड करण्यासाठी 60 x 60 x 60 सें. मी. आकाराचे खड्डे खोदून ठेवावेत. रोपापासून लागवड करावयाची असल्यास 30 x 30 x 30 सें. मी. आकाराचे खड्डे खोदावेत.  2) कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. पावसाळ्याच्या सुरवातीस खड्ड्यात चांगली माती, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळावे.

Tuesday, September 29, 2015 AT 06:15 AM (IST)

- सुरेश परब, खेड, जि. रत्नागिरी  1) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक शेळी कळपातून सर्वेक्षण करून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. ही जात मांस उत्पादनासाठी चांगली आहे. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के आहे. एका वर्षामध्ये या जातीच्या नराचे 25 किलो आणि मादीचे 21 किलो वजन भरते.

Tuesday, September 29, 2015 AT 06:00 AM (IST)

आपण पाहतो कुणाला पाणीबदलाचा पटकन त्रास होतो तर कुणाला अजिबात होत नाही. हा जो फरक असतो तो भिन्न प्रतिकार क्षमतेमुळे दिसून येतो. प्रदूषण, पाणी बदल याचा सतत परिणाम शरीरावर होऊ नये म्हणून प्रतिकार क्षमता वाढवली पाहिजे.

Sunday, September 27, 2015 AT 12:00 AM (IST)

  जयंत पालवे, गुंजाळवाडी, जि. नगर  निचरा कमी असलेल्या जमिनीला थोडे जास्त प्रमाणात पाणी दिले तर उष्ण व कोरड्या हवामानात बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळे क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर किंवा वरच्या थरात एकवटतात. अशा अयोग्य पाण्याचा सतत वापर केल्यास ते क्षार विरघळतात, त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढून कालांतराने पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते.

Saturday, September 19, 2015 AT 06:00 AM (IST)

- गणेश लोंढे, हिंगोली 1) म.कृ.वि. बैलचलित खत व बी पेरणी यंत्र - या यंत्राच्या साह्याने आपण विविध पिकांची पेरणी करू शकतो. दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर पाहिजे ते ठेवू शकतो. खत व बी एकाच वेळी पेरू शकतो, त्यामुळे बियाण्याचे व खताचे नुकसान होत नाही. या यंत्राच्या साह्याने आपण आंतरपिके पेरू शकतो. या यंत्राच्या साह्याने आपण एका दिवसामध्ये दोन ते तीन एकर क्षेत्रावर पेरणी करू शकतो.

Saturday, September 19, 2015 AT 05:45 AM (IST)

- प्रकाश कदम, चिखली, जि. सांगली  1) पोल्ट्री व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या 70 टक्के खर्च हा फक्त खाद्यावर होतो. कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण खाद्यापैकी 35 ते 45 टक्के खाद्याचे रूपांतर हे अंडी व मांसामध्ये होते.  2) पक्ष्यांच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते 12 टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये 30 ते 40 टक्के प्रथिने असतात.

Friday, September 18, 2015 AT 06:30 AM (IST)

- दिनकर डोईफोडे, निगडी, जि. सातारा  1) सुधारित गुऱ्हाळामध्ये चुल्हाण्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी फायर ब्रिक्‍स (विटा) आणि फायर क्‍ले यांचा बांधकामासाठी वापर करावा. 2) चुल्हाण बांधकामाभोवती जाड वाळू आणि पांढरी माती यांच्या मिश्रणाचा जाड थर द्यावा, त्यामुळे चुल्हाण्यात तयार झालेले उष्णतेचे तापमान बराच काळ टिकून राहील, उष्णता वाया जाणार नाही, उष्णतेचा कार्यक्षम वापर होईल, तसेच चुल्हाण्याचे आयुष्यही वाढण्यास मदत होईल.

Friday, September 18, 2015 AT 06:15 AM (IST)

- किरण सावंत, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग  दालचिनी लागवड अति पावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर लागवड करावी. सलग लागवड करायची झाल्यास 1.25 x 1.25 मीटर अंतरावर 60 x 60 x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यामध्ये चांगली माती, एक घमेले शेणखत, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणाने भरून ठेवावेत.

Thursday, September 17, 2015 AT 06:00 AM (IST)

- प्रशांत इंगळे, कोतूळ, जि. नगर  पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्‍यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून पुरेसे चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. पानमळा लागवडीच्या क्षेत्राचे नियोजन करून पानवेलीच्या सावली आणि आधारासाठी शेवरी, शेवगा, हादगा यांची लागवड जून, जुलै महिन्यांत पहिल्या आठवड्यात करावी.  राज्यात बहुतेक ठिकाणी कपुरी जातीची लागवड केली जाते.

Thursday, September 17, 2015 AT 06:00 AM (IST)

- विलास सावंत, रोहा, जि. रायगड  रक्षक सापळा   दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला हा सापळा असून यामध्ये एक कुपी असते. त्यात कापसाच्या बोळ्याला मिथाईल युजेनॉल हे रसायन ठेवता येते. याच्या गंधाने नर फळमाश्‍या खिडकीतून सापळ्यामध्ये येतात. त्यातील पाण्यात पडून मरतात. दर 20 ते 22 दिवसांनी मिथाईल युजेनॉलचा बोळा बदलावा. मृत माश्‍या काढून टाकाव्यात.

Wednesday, September 16, 2015 AT 06:15 AM (IST)

  - सुरेश कदम, बार्शी, जि. सोलापूर  ज्वारीपासून लाह्या, ज्वारीचा हुरडा, पापड, पोहे, ज्वारीच्या कण्या/रवा, गूळ/काकवी, पीठ, लाह्या, पापड, पोहे, भातवड्या, वडे, थालिपीठ, बिस्कीट, कुक्कीज, पाव, कुरडया, इडल्या तसेच स्टार्च, ग्लुकोज, फुक्‍टोज यासारखे पदार्थ तयार करता येतात. प्रक्रिया उद्योगाची गरज लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी रब्बी ज्वारीच्या विविध जाती विकसित केलेल्या आहेत.

Wednesday, September 16, 2015 AT 06:15 AM (IST)

- बी. एस. लोकरे, मिरज  क्षारयुक्त जमिनीच्या पृष्ठभागावर पांढऱ्या क्षाराचा पांढरा थर येतो. या जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो. जमिनीतील विद्राव्य क्षाराची विद्युत वाहकता चार डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते. विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असते.  क्षारपड जमीन सुधारणेसाठी जमिनीची योग्य मशागत करून एक टक्का उतार द्यावा. शेती उताराच्या आडव्या दिशेने योग्य अंतरावर चर करावेत.

Wednesday, September 16, 2015 AT 03:00 AM (IST)

  -  राजेश बेल्हेकर, परिते, जि. कोल्हापूर  सुगंधी वनस्पतींमध्ये गवती चहा, जावा सिट्रोनेला, जिरॅनियम, तुळस, दवणा, वाळा यांच्या तेलाला बाजारपेठेत मागणी आहे तसेच औषधी वनस्पतींमध्ये अश्‍वगंधा, कळलावी, इसबगोल, खाजकुहिली, ज्येष्ठमध, रानवांगी, शतावरी, सदाफुली, सर्पगंधा, सफेद मुसळी या वनस्पतींना मागणी आहे परंतु या वनस्पतींची लागवड करताना आपल्या भागातील बाजारपेठेचा विचार करूनच लागवड करणे फायदेशीर ठरते.

Saturday, September 12, 2015 AT 06:00 AM (IST)

- आर. जी. करंडे, वडाळा, जि. सोलापूर  राज्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या जातींचा विचार करता उस्मानाबादी ही मांसासाठी उपयुक्त असलेली आणि संगमनेरी ही मांस व दुधासाठी उपयुक्त असलेली शेळीची जात आहे. मेंढ्यांमध्ये लोकर व मांसोत्पादनासाठी दख्खनी मेंढी आणि फक्त मांसासाठी मडग्याळ मेंढी फायदेशीर आहे. या सर्व जाती महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण भागांत अत्यंत कमी व निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर तग धरून राहतात. त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही चांगली आहे.

Saturday, September 12, 2015 AT 05:45 AM (IST)

- आर. जी. घुगे, बीड  सर्वसाधारणपणे अंडी उत्पादनासाठी व मांसासाठी (ब्रॉयलर) कुक्कुटपालन करता येते. अंडी उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या जातींच्या कोंबड्या असून, साधारणपणे पुढील प्रकारच्या कोंबड्यांचे पालन आपण करू शकतो. साधारणपणे गावठी कोंबड्या (वार्षिक अंडी उत्पादन 60-80), व्हाइट लेगहॉर्न (वार्षिक अंडी उत्पादन 240-260) आणि ऱ्होड आयलॅंड रेड (वार्षिक अंडी उत्पादन 240-260) या कोंबड्यांचे पालन करावे.

Thursday, September 10, 2015 AT 06:30 AM (IST)

- जी. एस. कदम, चिपळूण, जि. रत्नागिरी  1) नारळ बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्याची लागवड 7.5 7.5 मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे. या चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरी वेलीची लागवड करावी. 2) नारळ, जायफळ यांच्या लागवडीसाठी 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे, तर दालचिनी लागवडीसाठी 0.60 मीटर बाय 0.

Thursday, September 10, 2015 AT 06:15 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: