Last Update:
 
ऍग्रो मार्केट
सातारा (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 22) भेंडी, दुधी भोपळ्याचे दर तेजीत होते. वांगी, कारली, हिरवी मिरची, वाल घेवड्याच्या आवकेत वाढ झाली. भेंडीची तीन क्विंटल आवक झाली, भेंडीस 300 ते 350 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. भेंडीच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजार समितीत दुधी भोपळ्याची दोन क्विंटल आवक झाली. दुधी भोपळ्यास 70 ते 100 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला.

Sunday, November 23, 2014 AT 12:00 AM (IST)

मुंबई  - उद्योजकतेचे वातावरण निर्माण करून देशात कारखानदारी वाढविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने कौशल्यविकासावर भर देण्यास सुरवात केली आहे म्हणून देशातील 12 हजार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दतात्रय यांनी केली. भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या इंडिया ऑस्ट्रेलिया स्कील्स परिषदेमध्ये ते बोलत होते.

Thursday, November 20, 2014 AT 05:30 AM (IST)

गोविंद वैराळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कापसाचे दर प्रति क्विंटल 4000 रुपयांपर्यंत कमी झाले. तसेच कापूस उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत अजूनही दर वाढण्याची शक्‍यता नाही. सामान्य परिस्थितीत देशातील कापसाचा साठा वाढणार आहे. यंदाचा अंदाज पाहता देशातून कापूस गाठींची निर्यात मागील वर्षापेक्षा कमी होणार आहे. या वर्षी देशातील उत्पादन, साठा व आवश्‍यकता पाहता जवळपास 170 लाख गाठी शिल्लक राहणार आहेत.

Wednesday, November 19, 2014 AT 05:30 AM (IST)

लासलगाव, जि. नाशिक (प्रतिनिधी) : येथील बाजार समितीत पावसाळी वातावरणामुळे शनिवारी (ता. 15) कांद्याची आवक घटली होती. उन्हाळ कांद्याची 845 क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांद्याला 700 ते 1611 व सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत लाल कांद्याची 50 क्विंटल आवक होऊन लाल कांद्याला 900 ते 1591 व सरासरी 1211 रुपये प्रति क्विंटल दर होते.

Sunday, November 16, 2014 AT 12:00 AM (IST)

मुंबई  - घरटी किमान एकतरी बॅंक खाते असावे आणि त्यापुढे जाऊन देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाकडे बॅंक खाते असावे, या उद्देशाने सुरू करणात आलेल्या "प्रधानमंत्री जन-धन योजने'चे यश दृष्टिपथात येऊ लागले आहे. या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांमार्फत आत्तापर्यंत पाच हजार कोटी रुपये बॅंकिंग प्रणालीत आणण्यात सार्वजनिक बॅंकांना यश आले आहे.

Monday, November 10, 2014 AT 05:15 AM (IST)

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 8) काकडी, दोडका, वाल घेवडा, दुधी भोपळा तेजीत होते. काकडीची पाच क्विंटल आवक होऊन प्रति दहा किलोस 200 ते 250 रुपये दर होता. काकडीस बुधवारच्या (ता. 5) तुलनेत 50 रुपयांची दरवाढ झाली होती, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत दोडक्‍याची एक क्विंटल आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस 400 ते 450 रुपये दर होता. वाल घेवड्याची एक क्विंटल आवक होऊन दहा किलोस 450 ते 500 रुपये दर होता.

Sunday, November 09, 2014 AT 01:00 AM (IST)

पुणे  - वितरणादरम्यान होणाऱ्या गळतीतून पाणी आणि परिणामी शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी "फिनोलेक्‍स' उद्योग समूहाच्या वतीने भविष्यात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी पुढील पाच वर्षांत सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवले आहे. फिनोलेक्‍स आता "तरक्की जिंदगीभर' या घोषवाक्‍यावर शेतकरी आणि ग्राहकांसाठी काम करणार आहे, अशी माहिती फिनोलेक्‍सचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया यांनी गुरुवारी (ता. 6) पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Saturday, November 08, 2014 AT 05:45 AM (IST)

कवठाला चांगला स्वाद असतो. कवठापासून घरच्या घरी चांगल्या प्रतीची जेली व जॅम तयार करता येतो. जॅम, जेली तयार करण्यासाठी पिकलेली कवठ फळे घ्यावीत. कु. निवेदिता डावखर जेली  - - जेली तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेली, मोठ्या आकाराची व अर्धवट पिकलेली कवठे घ्यावीत. - प्रथम ती स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावीत. त्यानंतर ती फोडून स्टीलच्या सुरीने गर काढून घ्यावा. - स्टीलच्या पातेल्यामध्ये जेवढा गर तेवढेच पाणी मिसळून प्रतिकिलो गरास 1.

Friday, November 07, 2014 AT 05:30 AM (IST)

हळदीच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा जून २०१५ च्या फ्यूचर्स किमती १६.५ टक्क्यांनी अधिक आहेत. हरभऱ्याच्या एप्रिल २०१५ मधील फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.९ टक्क्यांनी अधिक आहेत. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी शेतकरी व व्यापारी या सर्वांनी पुढील काही महिन्यांत शेतमालाचे भाव कसे राहतील, यांचा अंदाज घेऊन आपापले निर्णय घ्यायचे असतात. भविष्यातील किमतींचे अंदाज करण्याच्या अनेक सांख्यिकीय व अर्थशास्त्रीय पद्धती आहेत.

Friday, November 07, 2014 AT 05:30 AM (IST)

मुंबई  - सोव्हिएत सोशॅलिस्ट रशियन संघराज्यातील देशांबरोबर मुक्त व्यापार धोरणाबाबत केंद्र सरकार लवकरच चर्चा सुरू करणार आहे. भारताबरोबरीने या देशांमध्ये मुक्त व्यापार सुरू झाल्यास मैत्रीचे हे बंध आणखी दृढ होतील, अशी सरकारची भावना आहे. यासाठी केंद्र सरकारतर्फे लवकरच युनियन ऑफ रशिया, कझाकस्तान आणि बेलारूस या देशांच्या बरोबरीने मुक्त व्यापार धोरणासंदर्भात चर्चा सुरू करण्यात येईल.

Tuesday, November 04, 2014 AT 05:30 AM (IST)

पुणे  - इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या "इंडोफिल क्रॉप एनर्जी' आणि "इंडोफिल फ्रूट एनर्जी' या दोन पीक पोषक उत्पादनांच्या विक्रीस नाशिक येथे सुरवात झाली. या वेळी कंपनीचे एक्‍झिक्‍युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट आर. सी. बिश्‍नोई यांनी कंपनीची वाटचाल आणि उद्दिष्टांबाबत माहिती दिली. कंपनीच्या अल्बिओन, अमेरिका येथील सेल्स व मार्केटिंग विभागाचे संचालक डॉ. एडवर्ड यांनी उत्पादन तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत माहिती दिली.

Friday, October 31, 2014 AT 05:45 AM (IST)

ढोबळमानाने, जेवढा किमतीतील कल अधिक वाढता, तेवढे पीक घेणे अधिक फायदेशीर. मात्र हा कल सरासरी स्वरूपाचा आहे. दर वर्षी तो अनुभवास येतो असे नाही. त्यामुळे आपणास या कलाबरोबरच, किमतींमध्ये वार्षिक व मासिक बदल का व किती होतात, हेही लक्षात घेणे जरुरीचे आहे. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी शेतकरी व व्यापारी यांनी पुढील काही महिन्यांतील दरांचा अंदाज घेऊन आपले निर्णय घ्यावे लागतात.

Friday, October 31, 2014 AT 05:30 AM (IST)

पॅकेजिंग हे पदार्थांचे विविध जीवाणूंपासून संरक्षण करण्यासाठी, साठवणूक काळ वाढविण्यासाठी, तसेच संरक्षित साठवणूक करण्यासाठी वापरले जाते. पदार्थ, साठवणूक कालावधी आणि वाहतुकीची गरज लक्षात घेऊन पॅकेजिंगचे विविध प्रकार उपलब्ध झाले आहेत. कल्याण बाबर आपल्याकडे अन्नपदार्थांचे पॅकिंग आणि साठवणूक करण्यासाठी पूर्वीपासून लाकडी डबे किंवा पिशव्यांचा वापर केला जात असे. अलीकडच्या काळात पॅकिंगसाठी कागद आणि फूडग्रेड प्लॅस्टिकचा जास्त प्रमाणात वापर केला जातो.

Wednesday, October 29, 2014 AT 05:00 AM (IST)

ब्रॉयलर कोंबड्यांची शेड हवेशीर असावी. शेडमध्ये तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा तपासावी. पिलांसाठी ब्रुडरची व्यवस्था करावी. अशक्त पिलांना वेगळे करून त्यांच्यावर वेगळा उपचार करावा. पक्ष्यांचे खाद्य आणि पाण्याची पुरेशी भांडी असावीत. डॉ. सु. फ. निपाने, डॉ. विजय के. बसुनाथे पिल्ले शेडमध्ये येण्यापूर्वीचे नियोजन  - 1) शेडमध्ये लिटर (भाताचा कोंडा) 10 दिवसांपूर्वी काढलेला असावा. 2) शेडमध्ये कीडनाशकांची फवारणी करून संपूर्ण स्वच्छता करावी.

Thursday, October 23, 2014 AT 05:30 AM (IST)

गोविंद वैराळे केंद्र सरकारने हंगाम २०१४-१५ करिता खरीप पिकासाठी आधारभूत दर ठरविले आहेत. कृषिमूल्य आयोगाने प्रस्तावित केलेल्या दरालाच केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. कृषिमूल्य आयोगाने या वर्षी शिफारस केलेल्या आधारभूत दरात कोणतीही वाढ न करता तेच दर केंद्र सरकारने जाहीर केले आहेत. कापूस उत्पादन प्रतिक्विंटल खर्च सुमारे ५५०० रुपये एवढा येतो.

Thursday, October 23, 2014 AT 05:15 AM (IST)

नांदेड (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 18) बटाट्याची 40 क्विंटल आवक झाली. बटाट्यास 2000 ते 3000 रुपये प्रति क्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत मुगाची आवक सुरू झाली आहे. शनिवारी पाच क्‍विंटल मुगाची आवक झाली. त्यास 6200 ते 6400 रुपये प्रति क्विंटल दर होते. गव्हाची 75 क्विंटल आवक होऊन 1525 ते 1535 रुपये प्रति क्विंटल दर होते.

Sunday, October 19, 2014 AT 12:00 AM (IST)

ठोबळ मानाने, जेव्हा चढ-उतार अधिक तितकी जोखीम अधिक मात्र या चढ-उतारांची कारणे जर आपण लक्षात घेतली तर पुष्कळ वेळा आपणास भविष्यातील किमतींचा अंदाज बऱ्यापैकी करता येतो. ही जोखीम पण कमी करता येते. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने, सोयबीन, हळद, हरभरा, व गवार बी यांच्यात वाढ होण्याची शक्यता आहे डॉ. अरुण प्र. कुलकर्णी भविष्यातील किमतींचे अंदाज करण्याच्या अनेक सांख्यिकीय व अर्थशास्त्रीय पद्धती आहेत. या पद्धतीत सतत बदल होतो आहे.

Friday, October 17, 2014 AT 05:30 AM (IST)

बोकडपालनासाठी तीन ते चार महिन्यांची करडे निवडावीत. कारण, या वयांच्या करडांमध्ये जोखीम आणि मरतुकीचे प्रमाण कमी असते. करडांचे आरोग्य आणि खाद्य व्यवस्थापन योग्य ठेवल्यास त्यांची चांगली वाढ होते. डॉ. व्ही. के. बसुनाथे, डॉ. शीला बनकर आपल्याकडील साधन सुविधा आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पुढे बोकडपालन व्यवसाय वाढवत जा. तीन महिन्यांच्या पुढील नर करडे विकत घेतल्यास जास्त नफा मिळतो. कारण या करडांची मरतूक कमी असते. व्यवस्थापन सोपे असते.

Tuesday, October 14, 2014 AT 05:15 AM (IST)

सोलापूर (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 11) हिरव्या मिरची तेजीत होती. हिरव्या मिरचीची 18 ते 25 क्विंटल आवक होऊन प्रतिदहा किलोसाठी 200 ते 250 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत कोथिंबीर, मेथी, शेपू या भाज्यांचे दर वधारलेलेच होते. शनिवारी कोथिंबिरीची आठ हजार पेंढ्या, मेथीची सात हजार पेंढ्या आणि शेपूची पाच हजार पेंढ्या आवक झाली. गेल्या महिनाभरापासून भाज्यांच्या दरात तेजी आहे.

Sunday, October 12, 2014 AT 12:00 AM (IST)

भविष्यातील विक्री करण्यासाठी जर करार करावयाचे असतील तर या फ्युचर्स किमती आधार म्हणूनही वापरता येतात. अर्थात, या फ्युचर्स किमती सतत बदलत असतात. त्यामुळे भविष्यातील किमतींचे अंदाजसुद्धा सतत बदलत असतात. प्रत्यक्ष निर्णय घेताना त्यामुळे शास्त्रीय पद्धती आणि उपलब्ध असतील तर फ्युचर्स किमती यांचा एकूण विचार करणे आवश्यक आहे. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी भविष्यातील किमतींचे अंदाज करण्याच्या अनेक सांख्यिकीय व अर्थशास्त्रीय पद्धती आहेत.

Friday, October 10, 2014 AT 05:45 AM (IST)

जनावरांची वाहतूक करताना योग्य काळजी घ्यावी. वाहतुकीमध्ये काळजी न घेतल्याने जनावरे आजारी पडण्याची आणि दगावण्याची शक्यता असते. जनावरांची वाहतूक शक्यतो पहाटे किंवा सायंकाळी करावी. दुपारच्या कडक उन्हात वाहतूक केल्यास जनावरांना उष्माघात होण्याची शक्यता असते. डॉ. शरद दुर्गे, डॉ. अंबादास माडकर जनावरांना वाहतुकीच्या एका दिवसअगोदरपासून पूर्ण आराम तसेच मुबलक पाणी व चारा द्यावा. जनावरांना गोठ्यात किंवा झाडांच्या सावलीत ठेवावे.

Friday, October 10, 2014 AT 05:00 AM (IST)

चीनमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या कापूस साठ्यामुळे यंदा या देशाकडून कापसाची आयात कमी होणार आहे. देशांतर्गत वाढणारा कापसाचा साठा, जागतिक दरात होणारी घसरण आणि केंद्र सरकारने ठरविलेले कापसाचे आधारभूत दर याचा परिणाम कापसाच्या दरावर होत आहे. गोविंद वैराळे आता कापूस हंगाम सुरू होत असून, काही ठिकाणी कापसाचे दर प्रति क्विंटल 4000 रुपयांपेक्षा कमी आहेत. मागील हंगामामध्ये कापसाचे दर 5000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते.

Thursday, October 09, 2014 AT 05:30 AM (IST)

पी. व्ही. मेश्राम व्ही. एम. धायगुडे कोंबड्यांमधील रोगांच्या निदानामध्ये शवविच्छेदन खूप महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे कोंबड्यांना होणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांमध्ये दिसणारी लक्षणे जवळपास सारख्याच प्रकारची असतात म्हणून त्यांना रोगनिदानात विशेष महत्त्व नसते. परंतु रोगांमुळे शरीरातील विविध अवयव, ऊतीमध्ये होणारे बदल हे संबंधित आजाराविषयी सूचक असतात. त्याआधारे अचूक रोगनिदान करून योग्य प्रतिबंध तसेच औषधोपचार निवडता येतो.

Thursday, October 09, 2014 AT 05:15 AM (IST)

पुणे - टाटा उद्योग समूहाच्या रॅलीज इंडिया लिमिटेड या कंपनीने यंदाच्या हंगामात हंक हे कीटकनाशक आणि द्राक्षावरील डाऊनी मिल्ड्यू रोगाच्या नियंत्रणासाठी ब्लेंड हे बुरशीनाशक बाजारात आणले आहे. या दोन्ही उत्पादनांच्या विक्रीची सुरवात राज्यात विविध जिल्ह्यांत नुकतीच करण्यात आली. हंक हे कीटकनाशक दाणेदार स्वरूपात आहे. मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

Thursday, October 09, 2014 AT 05:15 AM (IST)

पुणे  - उंदीर, घुशी, डुकरे आदी जनावरांपासून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सोलापूर येथील "मनीषा ऍग्रो सायन्सेस' कंपनीमार्फत "पळापळी' हे दाणेदार स्वरूपाचे (ग्रॅन्युअल्स) उत्पादन बाजारात आणले आहे. पीकलागवड क्षेत्राभोवती पाच फुटांच्या पट्ट्यात हे ग्रॅन्युअल्स टाकल्यानंतर नासधूस करणारे प्राणी 15 ते 20 दिवस पिकांत प्रवेश करत नाहीत, असा दावा कंपनीमार्फत करण्यात आला आहे.

Saturday, October 04, 2014 AT 05:15 AM (IST)

ऑक्टोबरनंतरचे खरीप पिकांचे फ्युचर्स भाव हे नवीन पिकांच्या आवकेमुळे कमी आहेत. ते जर योग्य वाटले, तर त्यांचा उपयोग हेजिंग करण्यासाठी करता येईल. मिरचीच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा डिसेंबर २०१४ मधील फ्युचर्स किमती १.९ टक्क्यांनी अधिक आहेत. हळदीच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा डिसेंबर २०१४ च्या फ्युचर्स किमती १.२ टक्क्याने अधिक आहेत. डॉ. अरुण प्र.

Friday, October 03, 2014 AT 05:30 AM (IST)

पुणे  - राज्यातील साखर कारखान्यांसाठी नेटाफिम कंपनीतर्फे नुकतेच ऊस पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Thursday, October 02, 2014 AT 04:45 AM (IST)

पुणे  - नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांसाठी सुमिटोमो केमिकल कंपनीतर्फे संजीवकांच्या योग्य वापराबाबत नुकत्याच एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये द्राक्ष बागेत कशा पद्धतीने संजीवकांचा वापर करावा याबाबत अमेरिकेतील द्राक्ष तज्ज्ञ डॉ. रॉब फ्रिट्‌स यांनी मार्गदर्शन केले.

Tuesday, September 30, 2014 AT 05:45 AM (IST)

सोलापूर (प्रतिनिधी) ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारपेठेत शनिवारी (ता. 27) टोमॅटो, वांगी, हिरव्या मिरचीची आवक चांगली झाली. त्यांचे दरही तेजीत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात शनिवारी टोमॅटोची 500, वांग्याची 100 आणि हिरव्या मिरचीची 50 क्विंटल आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो, वांग्याची आवक वाढते आहे. शिवाय दरातील किंचित चढ-उतार वगळता दरही टिकून आहेत.

Sunday, September 28, 2014 AT 12:00 AM (IST)

सांगली  - येथील ऑरबिट क्राप सायन्सेस व केमिकल्स कंपनी कृषी उद्योगात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. कंपनीने कॅल्सिमास्टर हे दुय्यम अन्नद्रव्य घटक असलेले खत विकसित केले आहे.

Saturday, September 27, 2014 AT 05:30 AM (IST)

मिरचीच्या सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा डिसेंबर २०१४ मधील फ्यूचर्स किमती २.१ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याच्या सध्याच्या स्पॉट किमती डिसेंबर २०१४ मधील फ्यूचर्स किमती ९.५ टक्क्यांनी अधिक आहेत. हळदीच्या सध्याच्या स्पॉट किमती डिसेंबर २०१४ मधील फ्यूचर्स किमती ९.५ टक्क्यांनी अधिक आहेत. डॉ. अरुण प्र. कुलकर्णी मॉन्सूनचा आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे. १ जून ते २३ सप्टेंबरपर्यंत भारतातील पावसातील तूट ११ टक्क्यांवर आली आहे.

Friday, September 26, 2014 AT 05:30 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2014 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: