Last Update:
 
ऍग्रो स्पेशल
जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव येथील युवा शेतकरी राम बाबूराव खरजुले यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून दोन एकरांत शेवगा लागवड केली. या शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने त्यांना शेतीत प्रगती करता आली. यंदा आपल्या एकूण आठ एकर क्षेत्रात त्यांनी ठिबक सिंचन केले आहे. कपाशीचे आंतरपीक, झेंडू, ऍपल बेर आदींच्या प्रयोगातून त्यांनी आपली धडपडी वृत्तीही दाखवली आहे.

Friday, July 11, 2014 AT 05:45 AM (IST)

जळगाव जिल्ह्यातील पाथरी व सामनेर या गावांचे शेतीशिवार सुमारे 1500 हेक्‍टर. मात्र त्यातील 10 टक्के क्षेत्र निव्वळ डोंगरमाथ्याचे व खडकांनी व्यापलेले. पेरणीलायक क्षेत्रातही माती कमी, दगडगोटेच जास्त. पावसाच्या भरवशावर पिके घ्यायची तरी जेमतेम उत्पन्नावर उदरनिर्वाह चालणे कठीण. एके दिवशी "इक्रीसॅट' व "जलश्री' संस्था व लोकसहभागातून शिवारातील पाणी शिवारातच जिरविण्याची कामे सुरू झाली.

Friday, July 11, 2014 AT 05:00 AM (IST)

ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन 472 विहिरींची पाणी पातळी उंचावली नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्‍यातील लोणारवाडी, भाटवाडी, वडगाव, बेलांबा सिन्नर आणि टेंभुरवाडी ही पाच गावे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत राहिली. सिन्नरच्या युवामित्र संस्थेच्या प्रयत्नांतून या भागातील देव नदीवरील ब्रिटिशकालीन बंधारे व त्यावरील पाटपाण्याची व्यवस्था पुनरुज्जीवित झाली आहे. परिणामी, ही गावे बारमाही पिकांची झाली आहेत.

Thursday, July 10, 2014 AT 05:30 AM (IST)

पाटण तालुक्‍यात शाश्‍वत शेती कार्यक्रम सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्‍यातील चार दुर्गम, डोंगराळ व पर्जन्याधारित गावांत कृषी उत्पादकतेत शाश्‍वत वाढ करण्यासाठी जिरायती शाश्‍वत शेती कार्यक्रम राबविण्यात आला. शेतीतील सुधारित तंत्रज्ञान त्यातून शेतकऱ्यांना उपलब्ध झाले, दुधाळ जनावरांच्या सुधारित जाती उपलब्ध झाल्या. शेताच्या बांधापर्यंत पाणी पोचले. त्यातून पीकपद्धती विस्तारता आली.

Thursday, July 10, 2014 AT 05:30 AM (IST)

तिसऱ्या पिढीने जपला प्रक्रिया उद्योगाचा वारसा सांगली जिल्ह्यातील बोरगाव (ता. वाळवा) येथील मोहिते कुटुंबाची तिसरी पिढी पेढे, खवा व अन्य उत्पादनांत कार्यरत आहे. गुणवत्ता जपल्याने मोहित्यांचे पेढे असा आपला ठसा उमटवण्यात मोहिते यशस्वी झाले आहेत. आज ग्राहकांमध्ये त्यांच्या पेढ्यांनी विश्‍वासार्हता निर्माण केली आहे. श्‍यामराव गावडे सांगली जिल्ह्यात इस्लामपूर शहराच्या पूर्वेला सुमारे दहा किलोमीटरवर बोरगाव हे गाव लागते.

Wednesday, July 09, 2014 AT 05:45 AM (IST)

पाणीदार पारगाव सुद्रीकची नवी ओळख - शेततळे, तलावांमुळे बागायती क्षेत्रात वाढ - गावात सुमारे 90-95 टक्के ठिंबक सिंचन - राज्यात सर्वाधिक शेततळ्यांचे गाव म्हणून पारगावची ओळख - प्लॅस्टिक मल्चिंगवर शेतकऱ्यांचा भर - गावात गटशेतीची संकल्पना येतेय पुढे डोंगरमाथ्यावर असलेल्या पारगाव सुद्रीक (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील ग्रामस्थांनी अनेक वर्षे पाणीटंचाईची झळ सोसली.

Wednesday, July 09, 2014 AT 05:30 AM (IST)

जळगाव  - मृग व आर्द्रा नक्षत्राकडून निराशा झाल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्यांना चालना मिळू शकली नाही. मात्र, रविवारी (ता. 6) सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रामुळे वातावरणात बदल होऊन तुरळक ठिकाणी पावसाची हजेरीसुद्धा लागली. महिनाभरापासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे सुखद दिलासा मिळाला. दरम्यान, सोमवारी (ता. 7) सकाळीसुद्धा जिल्ह्यात रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. न्हावी (ता.

Tuesday, July 08, 2014 AT 05:45 AM (IST)

पुणे - लाटेवर स्वार होऊन सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आणखी अठ्ठेचाळीस तासांनी मांडला जाईल. "अच्छे दिन' दिसतील पण त्यासाठी काही कठोर मार्गाचा अवलंब करावा लागेल,' असे सांगत खुद्द पंतप्रधानांनीच आर्थिक शिस्तीचे सूतोवाच केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा महायुतीवर विश्‍वास दाखवताना महाराष्ट्रातल्या मतदारांनी मोदींचे आर्थिक शिस्तीसाठीचे "कडू औषध' घेण्याची मानसिकता दाखवली आहे.

Tuesday, July 08, 2014 AT 05:30 AM (IST)

सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्‍यातील हिवरे गावाने सुमारे 33 एकर गायरान जमिनीचा पुरेपूर वापर करीत त्यात सीताफळाची लागवड करून गावाच्या उत्पन्नात भर टाकण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. लोकसहभागातून सुमारे 33 एकर क्षेत्रात वृक्ष लागवड करताना जलसंधारणाची कामे करून पाणीटंचाईवर उत्तर शोधले आहे. प्रगतीकडे गावाची आश्‍वासक वाटचाल सुरू झाली आहे. विकास जाधव हिवरे हे कोरेगाव तालुक्‍यातील सुमारे 1700 लोकसंख्येचे गाव.

Tuesday, July 08, 2014 AT 05:15 AM (IST)

दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असतानाच जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीचे चटके सोसणाऱ्या आम जनतेने महागाई हाच येत्या निवडणुकीवर सर्वाधिक प्रभाव टाकणारा मुद्दा असल्याचे अधोरेखित केले आहे विशेषतः महिलांनी. एकूण 44 टक्के महिलांनी महागाईबद्दल नाराजी नोंदवली आहे. महागाईपाठोपाठ भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे मुद्दे मतदारांनी महत्त्वाचे म्हणून नोंदवले आहेत.

Tuesday, July 08, 2014 AT 05:00 AM (IST)

दुष्काळाशी कायम झुंज देणाऱ्या पांगरीतील गावतलावात जून उलटून गेला व पावसाने हजेरी लावली नसली तरी मुबलक पाणी आहे. गावातील ओढा पाण्याने भरून वाहत आहे. विहिरींत पाणीपातळी चांगली आहे. हा सर्व बदल घडला लोकसहभाग व ट्रस्टने राबवलेल्या सामूहिक प्रकल्पातून. आजूबाजूची गावे पाण्याअभावी कोरडी असताना पिंगोरीचे शेतशिवार मात्र त्यामुळेच हिरवेगार दिसत आहे.

Sunday, July 06, 2014 AT 12:00 AM (IST)

केंद्र व राज्य अशा दोन्ही शासनस्तरांवरून पंढरपूर देवस्थानच्या विकासासाठी अपेक्षित लक्ष दिलेले नाही, हे खेदाने नमूद करावे लागते. पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करून मंदिर व परिसराच्या विकासाचा समग्र आराखडा तयार करण्यात येत आहे. तो शासनाला सादर केला जाईल. सांगताहेत, विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष, माजी मंत्री अण्णा डांगे. विविध विषयांवर त्यांच्याशी साधलेला हा संवाद...

Sunday, July 06, 2014 AT 12:00 AM (IST)

भुकेचा पीळ. व्यथेचा पीळ. परिस्थितीचा पीळ. नात्यागोत्याचा पीळ. साराच पीळ आणि पीळ. आतड्यालाही पीळ अन् गळ्यालाही पीळ. कुठला सोडावा? खाटकानं गळ्यावर सुरी चालवायच्या आधीच भावनांचं मरण आईच्या वाट्याला... अक्काचं बाशिंग सुटलं. ते तोडून फेकलं. नवऱ्याच्या जाचाचं ‘जू’ तिनं खांद्यावरून उतरवून ठेवलं. पण कोणत्या न् कोणत्या रूपानं तिची पाठ व्यथेनं काही सोडली नाही.

Sunday, July 06, 2014 AT 12:00 AM (IST)

अमरावती जिल्ह्यात पूर्णानगर (ता. भातकुली) येथे त्र्यंबकराव हरणे यांनी मागील वर्षी सलग सोयाबीन, सोयाबीन-तूर आंतरपीक, तसेच रब्बीमध्ये हरभऱ्याची लागवड पट्टापेर पद्धतीने केली. त्यातून केवळ उत्पादनवाढच नव्हे, तर अन्य अनेक फायदे साधले. यंदाही पट्टा पद्धतीचाच वापर ते करणार आहेत. डॉ. विजेंद्र शिंदे, डॉ. जितेंद्र दुर्गे पूर्णानगर (ता. भातकुली) येथे त्र्यंबकराव हरणे यांची सुमारे 26 एकर शेती आहे. त्यांचे मूळ गाव टाकरखेडा, ता. अंजनगाव सुर्जी येथे आहे.

Friday, July 04, 2014 AT 05:30 AM (IST)

बंधारेउभारणी, ओढ्याची सफाई व रुंदीकरण लोकसहभाग ठरला महत्त्वाचा राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि शासकीय योजनांचा मिलाफ सांगली जिल्ह्यातील गार्डी (ता. खानापूर) येथे झाला आहे. या एकत्रित प्रयत्नांतून बंधारे बांधणे, ओढ्याची सफाई व रुंदीकरण केल्याने गावांतील सुमारे दोनशे हेक्‍टर शेती क्षेत्राला कायमस्वरूपी पाण्याची सोय झाली आहे. बंधाऱ्यातील पाण्याबरोबर विहिरींच्या पाण्याची पातळीही वाढली आहे.

Friday, July 04, 2014 AT 05:15 AM (IST)

दै. ऍग्रोवनची वैशिष्ट्यपूर्ण कार्यशाळा महाराष्ट्रासह गोव्यातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद कृषी पर्यटन केंद्रांच्या भेटीद्वारा प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या दृष्टीने कार्यशाळा-सहलीचे आयोजन ऍग्रोवनतर्फे 27 ते 29 जून या कालावधीत झाले. महाराष्ट्रासह, गोव्यातूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कृषी पर्यटन व्यवसायात असलेल्या संधी व वाव यांचे नेमके आकलन प्रशिक्षणार्थींना या निमित्ताने झाले.

Thursday, July 03, 2014 AT 05:45 AM (IST)

गाव झाले टॅंकरमुक्त, विहिरींची पाणीपातळीही वाढली एकीचे बळ आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्‍यातील विठ्ठलवाडीच्या ग्रामस्थांनी पाणीप्रश्‍न सोडवण्याचा निर्धार केला. गावच्या शिवारात बांधबंदिस्ती, पाणलोट क्षेत्रातील पाणी अडवणे, साठवण तलावातील गाळ काढणे यासारखी कामे केली. आज गाव टॅंकरमुक्त झाले आहे, तर परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

Thursday, July 03, 2014 AT 05:15 AM (IST)

दुग्ध व्यवसाय वर्षभर किफायतशीर पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी रोजचे दूध संकलन किती हवे, गाई व कालवडींचे प्रमाण किती हवे, याचा अभ्यास नागेश श्रीकांत धुमाळ यांनी केला. सातारा जिल्ह्यात आदर्की बुद्रुक (ता. फलटण) येथील 27 वर्षीय या युवकाने याच उद्दिष्टातून प्रभावी व्यवस्थापन व सुधारित तंत्राच्या जोरावर या व्यवसायात आत्मविश्‍वासाने पावले टाकली आहेत. नोकरीतील चांगल्या पगाराएवढे उत्पन्न त्यांना मिळू लागले आहे.

Wednesday, July 02, 2014 AT 05:45 AM (IST)

गुहा (ता. राहुरी, जि. नगर)  - गावात काही भागांत पाणीटंचाईची मोठी समस्या जाणवते. रब्बीत हरभऱ्यासारखे पीक अर्थशास्त्राच्या दृष्टीने फारसे लाभदायक ठरत नव्हते. अशा वेळी कमी पाण्यात रब्बी बटाटा पिकाचा पर्याय गावातील अशोक आंबेकर यांना मिळाला. गेल्या पंधरा वर्षांपासून या पिकात त्यांचा अनुभव तयार झाला आहे. एकरी 11 ते 12 टन उत्पादन ते घेतात. अन्य शेतकऱ्यांनाही या पिकाची प्रेरणा त्यांच्यापासून मिळाली आहे.

Wednesday, July 02, 2014 AT 05:30 AM (IST)

शेतकऱ्यांनी उभारले बंधारे, शोषखड्डे कधी काळी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील वाळकी-दोडकी या एकमेकांना जवळपास लागून असलेल्या गावांनी पाण्याची श्रीमंती जपणाऱ्या गावांच्या यादीत समावेश होण्यासाठी धडपड चालविली आहे. त्याकरिता सामूहिक प्रयत्नातून गावात जल व मृद संधारणाच्या कामांना गती आली असून, शासकीय व अशासकीय संस्थांचेही या कार्यात योगदान ग्रामस्थांना मिळत आहे.

Tuesday, July 01, 2014 AT 05:30 AM (IST)

जळगाव जिल्ह्यात अनोरे गावाने अळूच्या शेतीत खास ओळख तयार केली आहे. चविष्ट, घशास न खाजणाऱ्या या पानांना परिसरातच नव्हे तर गुजरात राज्यातही चांगली मागणी असते. येथील शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित चालत आलेला अळू शेतीचा वारसा चांगल्या प्रकारे जोपासला आहे. अळूच्या मार्केटिंगचे तंत्रही आत्मसात केले आहे. जितेंद्र पाटील जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्‍यातील शेतकरी उपलब्ध पाणीसाठ्यावर भेंडी, वांगी, मिरची, गवार, पोकळा आदी भाजीपाला पिके तिन्ही हंगामांत घेतात.

Monday, June 30, 2014 AT 05:45 AM (IST)

केवळ दीड एकर शेतीचे योग्य नियोजन करीत, दुष्काळी परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत आदर्की बुद्रुक (ता. फलटण, जि. सातारा) येथील सुनील धुमाळ यांनी पशुपालनात सातत्य ठेवले आहे. भांडवल नसल्याने वासरापासून 12 गाईंचा गोठा उभारला आहे. विकास जाधव साताऱ्यातील फलटण तालुक्‍याचा पश्‍चिम भाग हा अवर्षणप्रवण असून, सिंचनासाठी पाण्याची टंचाई असते. या भागातील आदर्की बुद्रुक हे पाच हजार लोकसंख्येचे गाव. या गावात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो.

Monday, June 30, 2014 AT 05:30 AM (IST)

प्रचंड बुद्धिमत्ता असूनही जोरकस संवादकौशल्याच्या अभावी मराठी तरुण चांगल्या नोकरीत, उद्योगातही मागे पडतोय. पिकवता येतं पण विकता येत नाही. त्यामुळे शेतीसारख्या व्यवसायातही "मध्यस्थ'च अधिक पोसले जातात. येत्या काळात थोडं अधिक आत्मविश्‍वासाने पुढे येऊन संवादकौशल्य, इंग्रजीसारख्या ज्ञानभाषेवर प्रभुत्व, सॉफ्ट स्किल्स यावर भर दिला तर मराठी तरुणाला निश्‍चित उज्ज्वल भवितव्य राहील...

Sunday, June 29, 2014 AT 01:00 AM (IST)

अक्कानं पाठीवरले वळ दाखवले. एकादशीच्या दिवशी त्याला मटण करून द्यायला नकार दिला म्हणून सुक्यानं लाकडाच्या धपलीखाली मारलं. ‘‘मी त्याच्याकडं नांदायला जित्ती जाणार नायी.’’ ‘‘तू माला जड नायी वासरे! जावदे तुजं घरंच तीन काटक्यांचं आलं वारं गेलं उडून. तुज्या नशिबी असंलच तर तीन काडक्या आडचा संसारही तू सुखाचा करून दावशील दुनियाला!’’ दिवस आपल्या गळ्यात दोर बांधून आपल्याला ओढत नेत असतात अन्‌ आपण दिवसाच्या मागे मागे जात असतो.

Sunday, June 29, 2014 AT 12:30 AM (IST)

शेतकऱ्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद अणुऊर्जा निर्मितीसाठी असलेल्या फुकुशिमा अणू प्रकल्पामध्ये सुनामीमुळे झालेल्या अपघाताने किरणोत्साराचा धोका वाढल्याने जपानने अणुऊर्जेऐवजी अपारंपरिक ऊर्जेकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याला शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सोलर पॅनेल उभारणी करत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Sunday, June 29, 2014 AT 12:00 AM (IST)

सागरी आम्लीकरणामुळे सागरी एकपेशीय वनस्पती (म्हणजेच संपूर्ण खाद्य साखळीतील मूलभूत प्राथमिक घटक) विषारी होत असून, त्याचे परिणाम मानवासह सर्व जीवांवर होणार आहेत. त्याहीपेक्षा अधिक धोका ऑक्सिजन निर्मितीमध्ये होऊ घातलेल्या असंतुलनाचा असल्याचे या क्षेत्रातील शास्त्रज्ञांचे मत आहे. त्याबाबत नुकत्याच झालेल्या अभ्यासामध्ये काही बाबी पुढे आल्या आहेत.

Sunday, June 29, 2014 AT 12:00 AM (IST)

मधूमेही (विशेषतः टाइप २ प्रकारातील ) रुग्णामध्ये टेस्टास्टेरॉनचे प्रमाण किमान पातळीवर असते. मात्र, सोय प्रथिनामध्ये नैसर्गिक इस्ट्रोजन असूनही, त्यांचा आहारातील वापर माणसांतील टेस्टास्टेरॉनची पातळी कमी होऊ देत नाही. तसेच सोय प्रथिनयुक्त पुरक खाद्य किमान रक्तदाबामध्ये योग्य ती सुधारणा करतानाच उच्च रक्तदाबामध्ये मात्र फारसा बदल करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Sunday, June 29, 2014 AT 12:00 AM (IST)

मध्यस्थांशिवाय निर्माण केली स्वतंत्र विक्रीव्यवस्था जालना जिल्ह्यातील नळविहिरा (ता. जाफराबाद) येथील उच्चशिक्षित संजय मोरे यांनी सेंद्रिय पद्धतीने केसर आंबा पिकवून मध्यस्थांशिवाय त्याची विक्री व्यवस्था उभारली आहे. गुणवत्तेने परिपूर्ण असा "नलकेशर ब्रॅंड' तयार करून ग्राहकांत त्याची चांगली ओळख व विश्‍वास तयार केला आहे. जालना जिल्ह्यात पाण्याचा शाश्‍वत आधार नसलेल्या नळविहिरा (ता.

Sunday, June 29, 2014 AT 12:00 AM (IST)

कामाच्या व्यस्ततेमध्ये छंद किंवा पूरक व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं, असं अनेकजण सहजपणे सांगतात. मात्र मुलचेरा (जि. गडचिरोली) येथील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वामन सावसाकडे याला अपवाद ठरले. "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' हा विश्‍वास निर्माण करीत वामनरावांनी नोकरी सांभाळत शेतीमध्ये विविधता जपली आहे. जामसाडा (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) येथे वामन सावसाकडे यांची वडिलोपार्जित शेती आहे. वडिलांकडूनच त्यांनी लहानपणी शेतीचे धडे गिरविले.

Sunday, June 29, 2014 AT 12:00 AM (IST)

जालना जिल्ह्यात दुष्काळ झेलणाऱ्या काही शेतकऱ्यांना अंबड-घनसावंगी तालुक्‍यातील गोदावरील नदीवर बांधण्यात आलेल्या उच्च पातळी बंधाऱ्यामुळे काहीसा दिलासाही मिळाला आहे. गोदाकाठचे सिंचन क्षेत्र वाढले असून जिरायती शेती बागायती झाली. बंधाऱ्यातील पाण्यामुळे या भागात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून पाण्याचा उपयोग शेतकरी पुरेपूर करून घेत आहेत.

Saturday, June 28, 2014 AT 05:30 AM (IST)

घरच्या शेतातल्या तुरी किती दिवस बाजारात विकायच्या, चार पैसे अधिक मिळवायचे तर डाळ तयार करून विकणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो, हे सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील सुलभा कदम यांनी जाणले. प्रतिदिन सात क्विंटल डाळनिर्मिती त्या करतात. सुमारे 50 गावांत त्यांचे ग्राहक तयार झाले आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर त्यांच्या आयुष्याचा पट अवघ्या दोन वर्षांत बदलून गेला. प्रगतशील महिला उद्योजक म्हणून त्यांची ओळख तयार होऊ लागली आहे....

Saturday, June 28, 2014 AT 05:15 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2014 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: