Last Update:
 
बाजारभाव
सोलापूर - येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपू या भाजीपाल्यांना मागणी वाढली होती, त्यामुळे त्यांच्या दरात तेजी होती, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गतसप्ताहात भाज्यांची आवक तुलनेने कमी होती परंतु मागणी चांगली असल्याने दर वधारले होते. सर्व भाज्यांची आवक रोज सरासरी पाच ते दहा हजार पेंढ्यांपर्यंत होती. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा या स्थानिक भागातून भाज्यांची आवक झाली.

Tuesday, June 30, 2015 AT 06:30 AM (IST)

जळगाव - येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात फ्लॉवरची 100 क्विंटलपर्यंत आवक झाली. त्यास 2100 ते 4000 व सरासरी 3200 रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांच्या आवकेत काही प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, मागणी चांगली असल्याने भाजीपाल्यांचे दर स्थिर होते. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दैनंदिन सरासरी 25 क्विंटलपर्यंत आवक झाली.

Tuesday, June 30, 2015 AT 06:00 AM (IST)

कोल्हापूर - येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात कोथिंबिरीची तेजी कायम होती. कोथिंबिरीची दररोज दहा ते बारा हजार पेंढ्यांची आवक होती. कोथिंबिरीस शेकडा 1000 ते 2000 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत बहुतांशी भाजीपाल्याचे भाव स्थिर होते. सप्ताहात हिरव्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. मिरचीला दहा किलोस 150 ते 400 रुपये दर होता. वांग्याची सातशे ते आठशे करंड्या आवक होती.

Tuesday, June 30, 2015 AT 04:00 AM (IST)

लासलगाव, जि. नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात उन्हाळ कांद्याची एकूण 68 हजार 60 क्विंटल आवक झाली. कांद्याला 500 ते 1955 व सरासरी 1537 रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याची आवक 2025 क्विंटल होऊन 1571 ते 1927 रुपये प्रतिक्विंटल दर होते.

Tuesday, June 30, 2015 AT 03:30 AM (IST)

पुणे - गुलटेकडी येथील प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता.28) भाजीपाल्याची सुमारे 160 ते 170 गाड्या आवक झाली होती. आवकेमध्ये काकडी, फ्लॉवर आणि तोंडल्याची आवक मंदावल्याने यांच्या दरात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. तसेच पालेभाज्यांचे तेजीत असलेले दर कायम होते.

Monday, June 29, 2015 AT 06:30 AM (IST)

गेल्या आठवड्यात वाढत्या पावसामुळे पक्ष्यांच्या पुरवठ्यात अडचणी आल्याने अंडी आणि ब्रॉयलर्सच्या किमती उच्चांकी पातळीवरून दहा टक्क्यांनी कमी झाल्या. दुसरीकडे उष्माच्या लाटेमुळे घटलेल्या ब्रॉयलर्स पक्ष्यांच्या उत्पादनात आता सुधारणा दिसत असून, बाजारातही मागणी चांगली असल्यामुळे तेजी टिकून राहील, असे दिसते. देशातील ब्रॉयलर्स पक्ष्यांचे सर्वांत मोठे मार्केट असलेल्या मुंबईतील जीवनमान गेल्या आठवड्यातील पावसामुळे विस्कळित झाले होते.

Monday, June 29, 2015 AT 04:15 AM (IST)

औरंगाबाद (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 27) गवार शेंगांची 26 क्‍विंटल आवक झाली होती. त्यास 1500 ते 4000 रुपये प्रतिक्‍विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत भाजीपाल्याची व फळाची आवक मंदावली होती. हिरव्या मिरचीची 198 क्‍विंटल आवक झाली होती. त्यास 1000 ते 3000 रुपये प्रतिक्‍विंटल दर होता. शेवगाच्या शेंगाची 7 क्विंटल आवक झाली होती. त्यास 5000 ते 6000 रुपये प्रतिक्‍विंटल दर होता.

Sunday, June 28, 2015 AT 12:00 AM (IST)

मुंबई - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. 23) फ्लॉवरची 820 क्विंटल आवक झाली होती. त्यास 1000 ते 1400 रुपये, तर सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत मंगळवारी 550 ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. स्थानिक आणि परराज्यांतून होणारी शेतमालाची आवक घटल्यामुळे काही भाजीपाल्याचे दर वधारले होते. सोमवारी (ता.22) बाजार समितीमध्ये लसणाची 1120 क्विंटल आवक झाली होती.

Wednesday, June 24, 2015 AT 03:45 AM (IST)

नाशिक : गत सप्ताहात आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे बहुतांश शेतीमालाचे दर तेजीत होते. वेलवर्गीय भाजीपाल्यासह फळभाज्या व पालेभाज्यांना मुंबईच्या बाजारपेठेतून वाढती मागणी होती. दरम्यान, शुक्रवार (ता. 19) पासून मुंबई बाजारासह उपनगरात झालेल्या जारेदार पावसामुळे शनिवारी, रविवारी नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या भाजीपाल्याला त्याचा फटका बसला. मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात अचानक निम्म्याने उतरण होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

Tuesday, June 23, 2015 AT 06:45 AM (IST)

जळगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात एरंडोल, धरणगाव व जळगाव तालुक्‍यांतून भेंडीची 200 क्विंटल आवक झाली होती. त्यास 1500 ते 3200 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे बाजार समितीत गत सप्ताहात पालेभाज्यांची आवक निम्म्याने कमी झाली होती. मागणीनुसार आवक होत नसल्याने कोथिंबीर, मेथी, पालक, पोकळा या पालेभाज्यांचे दर वधारले होते.

Tuesday, June 23, 2015 AT 06:15 AM (IST)

राजकुमार चौगुले कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीर व मेथीच्या दरांत तेजी कायम होती. कोथिंबिरीची दररोजची दहा ते पंधरा हजार पेढ्यांची आवक झाली होती. त्यास 800 ते 1500 रुपये प्रतिशेकडा दर होता. मेथीची दररोज सरासरी दहा हजार पेढ्यांची आवक झाली होती. त्यास 900 ते 1000 रुपये प्रतिशेकडा दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत पालक, पोकळा, शेपूची दोन ते तीन हजार पेढ्यांची आवक झाली होती.

Tuesday, June 23, 2015 AT 05:45 AM (IST)

लासलगाव, जि. नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात उन्हाळी कांद्याची 80 हजार 730 क्विंटल आवक झाली होती. त्यास 700 ते 2031 व सरासरी 1590 रुपये प्रतिक्विंटल दर होते. तसेच नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याची 1655 क्विंटल आवक होऊन 1631 ते 2001 व सरासरी 1870 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Tuesday, June 23, 2015 AT 04:00 AM (IST)

सोलापूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात कांद्याची रोज 100 गाड्या आवक झाली होती. त्यास 300 ते 2400 रुपये, तर सरासरी 1400 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक जिल्ह्याबाहेरून झाली होती. स्थानिक भागातील आवक अगदीच कमी होती. लसणाची रोज 50 ते 80 क्विंटल आवक होती. त्यास 2500 ते 8000 रुपये, तर सरासरी 7000 रुपये प्रतिक्विंटल दर होता. ओल्या शेंगाची पाचशे किलोपर्यंत आवक झाली होती.

Tuesday, June 23, 2015 AT 04:00 AM (IST)

देशात ब्रॉयलर्स आणि अंड्यांचे भाव उच्चांकी पातळीवर पोचले असून, खास करून महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाला याचा सर्वाधिक फायदा मिळत आहे. मॉन्सून सर्वदूर पोचल्यामुळे अंडी, चिकनच्या खपाला चालना मिळाली असून, पुढील आठवड्यांतही तेजीचा माहोल कायम राहील असे दिसते. महाराष्ट्रात नाशिक आणि पुणे विभागांत ब्रॉयलर्स कोंबडीच्या प्रतिकिलो लिफ्टिंग दराने शंभरी पार केली आहे. नाशिक आणि पुणे विभागांत गेल्या सप्ताहातील सरासरी दर शंभरावर होता.

Monday, June 22, 2015 AT 05:45 AM (IST)

मिरचीचे दर वधारले पुणे - गुलटेकडी येथील प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. 21) भाजीपाल्याची सुमारे 170 ते 180 गाड्या आवक झाली होती. मुंबई येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तेथील व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी नवी मुंबई (वाशी) येथील बाजार समितीमधील व्यवहार थंडावल्याने पुणे बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. हिरवी मिरचीची आवक तुलनेने मंदावल्याने मिरचीच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ झाली होती.

Monday, June 22, 2015 AT 05:30 AM (IST)

औरंगाबाद (प्रतिनिधी) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 20) टोमॅटोची 190 क्‍विंटल आवक झाली होती. त्यास 1000 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत हिरव्या मिरचीची 101 क्‍विंटल आवक झाली होती. त्यास 1600 ते 4000 रुपये प्रतिक्‍विंटल दर होता. कांद्याची 130 क्‍विंटल आवक झाली होती. त्यास 700 ते 1500 रुपये प्रतिक्‍विंटल दर होता. फुलकोबीची 31 क्‍विंटल आवक झाली होती.

Sunday, June 21, 2015 AT 12:00 AM (IST)

नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. 19) दोडक्‍याची 500 क्रेटची आवक झाली होती. त्यास 300 ते 800 रुपये, तर सरासरी 450 रुपये प्रति क्रेट दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत कांद्याची 3500 क्विंटल आवक झाली होती. त्यास 500 ते 1500 व सरासरी 1100 रुपये प्रतिक्विंटल दर होता. नाशिकसह पिंपळगाव बसवंत, लासलगाव, सटाणा, उमराणा या बाजार समित्यांत कांद्याची आवक वाढली होती.

Saturday, June 20, 2015 AT 06:45 AM (IST)

गव्हातील किंचित वाढ वगळता इतर सर्व वस्तूंच्या किमती याही सप्ताहात घसरल्या. सोयाबीन, हळद, हरभरा व गवार बी यांच्यातील घट लक्षणीय होती. दूरच्या भविष्यात सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने, मिरची, मका व हरभरा यांमध्ये वाढ संभवते. सोयाबीनमध्ये पुढील वर्षी (डिसेंबर २०१५ मध्ये) ७.२ टक्क्यांची घसरण संभवते. अरुण प्र. कुलकर्णी मागील लेखात ज्या मालासाठी फ्युचर्स ट्रेडिंग शक्य आहे तेथे भविष्यातील किमतीचे अंदाज कसे करता येतील याचा आपण विचार केला.

Friday, June 19, 2015 AT 06:45 AM (IST)

नाशिकमध्ये शेकडा 2500 ते 4500 रुपये नाशिक - येथील बाजार समितीत गुरुवारी (ता.18) मेथीच्या 2500 जुड्यांची आवक झाली होती. त्यास 2500 ते 4500 रुपये, तर सरासरी 3500 रुपये प्रतिशेकडा दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत गत सप्ताहात हाच दर वाढून जास्तीत जास्त 51 रुपयांवर गेला होता. सद्यःस्थितीत नाशिक बाजार समितीतील मेथीची आवक 60 ते 70 टक्‍क्‍यांनी घटली आहे.

Friday, June 19, 2015 AT 03:45 AM (IST)

मुंबई - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता.15) कांद्याची 13 हजार 450 क्विंटल आवक झाली. कांद्यास 1500 ते 2300 व सरासरी 2150 रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  बाजार समितीत मंगळवारी (ता. 16) 550 ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. लसणाची 2120 क्विंटल आवक होऊन 4000 ते 5000 व सरासरी 4500 रुपये प्रतिक्विंटल दर होता. बटाट्याची 17 हजार 280 क्विंटल आवक झाली.

Wednesday, June 17, 2015 AT 06:00 AM (IST)

सोलापूर - येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात ढोबळी मिरची, वांगी, टोमॅटोला मागणी वाढली होती. त्यांची आवकही चांगली होती. तरीही त्यांच्या दरातील तेजी टिकून होती, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  बाजार समितीत ढोबळी मिरचीची रोज 100 ते 200 क्विंटल, वांग्याची 40 क्विंटल आणि टोमॅटोची 30 क्विंटलपर्यंत आवक झाली. मोहोळ, मंगळवेढा, माढा, पंढरपूर यासह पुणे, सांगलीच्या भागांतून त्यांची आवक होती.

Tuesday, June 16, 2015 AT 06:15 AM (IST)

जळगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात लोणच्यासाठी मागणी वाढल्यामुळे कैरीचे दर चांगलेच वधारले होते. कैरीची दैनंदिन सरासरी 50 क्विंटलपर्यंत आवक होऊन 1400 ते 2500 रुपये प्रति क्विंटल दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. पावसाळी वातावरणामुळे बाजार समितीत कोथिंबीर, मेथी, पालक, पोकळा आदी पालेभाज्यांची आवक कमी झाली होती.

Tuesday, June 16, 2015 AT 05:30 AM (IST)

लासलगाव, जि. नाशिक - येथील बाजार समितीत गत सप्ताहात उन्हाळ कांद्याची एकूण 69 हजार 530 क्विंटल आवक झाली. कांद्याला 700 ते 2180 व सरासरी 1612 रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. तसेच नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याची 2835 क्विंटल आवक होऊन 1480 ते 2051 व सरासरी 1834 रुपये प्रतिक्विंटल दर होते.

Tuesday, June 16, 2015 AT 04:45 AM (IST)

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या पंधरवड्यापासून कोथिंबिरीची घटलेली आवक कायम आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पंधरा ते सतरा हजार पेंढ्या कोथिंबिरीची आवक झाली आहे. नियमित आवकेच्या तुलनेत सुमारे पंचवीस टक्‍क्‍यांनी कोथिंबिरीची आवक घटल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  जिल्ह्यातील अनेक भागांत अद्याप उन्हाचा तडाखा कायम आहे. यामुळे कोथिंबिरीच्या उगवणीवर काहीसा परिणाम झालेला असून, कोथिंबिरीची काढणी लांबत आहे.

Tuesday, June 16, 2015 AT 04:45 AM (IST)

नाशिक : येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात ढोबळी मिरचीच्या सरासरी 1350 क्रेटची आवक झाली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरासरी 1150 क्रेटची आवक होती. त्यात गतसप्ताहात 200 क्रेटने वाढ झाली. या वेळी प्रति 10 किलो वजनाच्या ढोबळीच्या क्रेटला 150 ते 350 व सरासरी 250 रुपये दर होता.  जिल्ह्यात दिंडोरी, निफाड आणि नाशिक तालुक्‍यातून ढोबळीची आवक होते.

Tuesday, June 16, 2015 AT 04:30 AM (IST)

मॉन्सून सर्वदूर पोचल्याने तापमानात घट झाली असून, यामुळे ब्रॉयलर्स आणि अंड्यांच्या देशांतर्गत खपात आणखी वाढ अपेक्षित आहे. ब्रॉयलर्सनंतर अंड्यांचा बाजारही उच्चांकाकडे वाटचाल करीत असून, सध्याची तेजी जुलैअखेरपर्यंत टिकण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. संपूर्ण देशांत 80 ते 100 रुपये. प्रतिकिलो या दरम्यान ब्रॉयलर्सचे दर आहेत. देशात गुजरात राज्यात सर्वाधिक 100 रुपये प्रतिकिलो लिफ्टिंग होत असून, सर्वांत कमी दर हैदराबाद विभागात 80 रुपये आहे.

Monday, June 15, 2015 AT 04:30 AM (IST)

पुणे - गुलटेकडी येथील प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. 14) भाजीपाल्यासह पालेभाज्यांच्या आवकेत घट झाली होती. त्यामुळे त्यांचे दर वधारले होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत भाजीपाल्याची सुमारे 170 ते 180 गाड्या आवक झाली होती. आले, दोडका, कोबी, फ्लॉवर, शेवगा, मटार, तोतापुरी कैरी यांच्या दरात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. तसेच पालेभाज्यांचे दरही तेजीत होते.

Monday, June 15, 2015 AT 04:00 AM (IST)

औरंगाबाद (प्रतिनिधी) : येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता. 13) 152 क्‍विंटल आवक झाली. त्यास 1600 ते 3000 रुपये प्रतिक्‍विंटल दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत भाजीपाल्याची आवक काहीशी मंदावली आहे. कांद्याची 147 क्‍विंटल आवक झाली. कांद्याला 700 ते 1900 रुपये प्रतिक्‍विंटल दर होते. टोमॅटोची 90 क्‍विंटल आवक होऊन 1000 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल दर होता. वांग्याची आवक 33 क्‍विंटल झाली.

Sunday, June 14, 2015 AT 12:00 AM (IST)

नांदेड - येथील स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात मंगळवारी (ता. 9) उन्हाळी भुईमुगाची 43 क्विंटल आवक झाली. भुईमुगाला 5400 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत गुरुवारी (ता. 11) कांद्याची 50 क्विंटल आवक होऊन 500 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल दर होते. लसणाची 30 क्विंटल आवक झाली. लसणाला 2000 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल दर होते.

Saturday, June 13, 2015 AT 05:45 AM (IST)

धुळ्यात आले 50 ते 60 रुपये किलो जळगाव - धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यःस्थितीत आल्याची दैनंदिन सरासरी 2 ते 3 क्विंटलपर्यंत आवक होत आहे. मात्र मागणी चांगली असल्यामुळे आल्यास 50 ते 60 व सरासरी 55 रुपये प्रति किलो दर मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून अपेक्षेनुसार लागवड होत नसल्याने धुळे बाजार समितीला आल्यासाठी एरव्ही मध्य प्रदेश राज्यावर अवलंबून राहावे लागते.

Friday, June 12, 2015 AT 03:30 AM (IST)

सातारा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 10) हिरव्या मिरचीची 22 क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीस दहा किलोस 300 ते 350 रुपये दर होता, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीत गवारी तेजीत असून, फ्लॉवर, वांगी, टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली होती. गवारीची सात क्विंटल आवक होऊन दहा किलोस 200 ते 300 रुपये दर होता. रविवारच्या (ता. 7) तुलनेत गवारीस दहा किलो मागे 50 रुपयांची दरवाढ झाली होती. दोडक्‍याची एक क्विंटल आवक झाली.

Thursday, June 11, 2015 AT 04:15 AM (IST)

 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: