Last Update:
 
मुख्यपान
राज्यातील बारा दुष्काळी जिल्ह्यांत होणार अंमलबजावणी मुंबई - राज्यातील अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी टंचाईच्या उपाययोजनांना राज्य सरकारने काल (ता.३१) एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.
पुणे - कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यानंतर पावसाचे पोषक वातावरण निवळले आहे. शुक्रवारपर्यंत (ता. 4) राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भात दाट ढग असून, उर्वरित राज्यात हलके ढग गोळा होत आहेत.
नवी दिल्ली : देशांतर्गत कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच (ता. 27) मंजुरी दिली आहे. एक हजार टन कांद्याची 45 रुपये किलो दराने आयात केली जाणार असून कृषी मंत्रालयाच्या "किंमत स्थिरीकरण निधी' अंतर्गत कांदा आयात केला जाणार आहे.
सांगली : पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांना त्याचे दुष्परिणाम जाणवू नयेत यासाठी सांगलीतील नेत्रविकार तज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांनी गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सातशे किटचे मोफत वाटप केले आहे.
पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत दमदार पाऊस कोसळला. पूर्व विदर्भातील पंधरा ठिकाणी 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला.
पुणे/मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणखी एक घोटाळा समोर आला आहे.
सातारा जिल्ह्यामधील गुढे (ता. पाटण) येथील अप्पासाहेब चंद्रकांत कदम यांनी शिक्षकाची नोकरी सांभाळत वडिलोपार्जित शेतीमध्येही प्रगतीची वाट धरली आहे. सोमवार ते शनिवार शाळेतील नोकरी आणि रविवारी शेतीचे नियोजन असे त्यांचे वेळापत्रक ठरलेले आहे.
पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी तंत्र पदविका आणि मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्याने प्रवेशाला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवी दिल्ली :   देशात शुक्रवार (ता. 28) अखेर 967.83 लाख हेक्‍टरांवर पेरणी झाली होती, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. गतवर्षी या कालावधीत 956.93 लाख हेक्‍टरवर पेरणी झाली होती.
नवी दिल्ली : कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांसोबत स्वपक्षातील काही जणांचा असलेला विरोध आणि आगामी बिहार विधानसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर चौथ्यांदा भूसंपादन अध्यादेश काढण्याचा विचार केंद्र सरकारने सोडून दिल्याचे सूत्रांनी शनिवारी (ता. 29) सांगितले.
 
 
About Us | Contact Us | Advertise With Us | RSS
© Copyrights Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: