कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या अात्महत्या : पृथ्वीराज चव्हाण

उत्तर प्रदेश निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी मते मिळविण्यासाठी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारलाही ते टाळता आले नाही. जे सरकार ३० हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी द्यायला तयार नव्हते, त्या सरकारने ३४ हजार कोटी रुपये आणले कोठून असा प्रश्‍न आहे.
कर्जमाफीच्या घोषणेनंतरही  शेतकऱ्यांच्या अात्महत्या  : पृथ्वीराज चव्हाण
कर्जमाफीच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या अात्महत्या : पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर : सरकारच्या कर्जमाफीसह सर्व योजना फसव्या आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणेनंतरही ४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी (ता. २०) येथे केली. राजीव गांधी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सद्‍भावना दौडसाठी ते कोल्हापुरात आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भ्रष्टाचारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नैराश्‍य आले असून त्यांनी या नैराश्‍येपोटी विरोधी पक्ष आणि माध्यमे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करायला सुरवात केली आहे, हे निषेर्धाह आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले. फडणवीस सरकारला कर्जमाफी द्यायचीच नव्हती. पण काॅंग्रेससह सर्व विरोधी पक्ष इतिहासात पहिल्यांदाच एकत्र आले आणि त्यांनी संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची मागणी केली. त्यामुळे सरकारला विचार करावा लागला. उत्तर प्रदेश निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी मते मिळविण्यासाठी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. त्यामुळे महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारलाही ते टाळता आले नाही. जे सरकार ३० हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी द्यायला तयार नव्हते, त्या सरकारने ३४ हजार कोटी रुपये आणले कोठून असा प्रश्‍न आहे. पण जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे आमचे समाधान झालेले नाही. निकष असायला हवेत. ते आमच्या सरकारनेही ठेवले होते. पण दीड लाखापर्यंतची कर्जमाफी ही फसवी आहे. यातून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. ऑनलाइन पद्धती सपशेल फेल आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही. त्यामुळे सरकारची कर्जमाफी योजना फसवी अाहे, असा अारोप श्री. चव्हाण यांनी केला अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com