agiculture news in marathi, agrowon, croploan ragistration status in jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात कर्जमाफीसाठी साडेतीन लाख अर्ज
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शनिवारपर्यंत (ता. ९) तीन लाख ४६ हजार ऑनलाइन अर्ज दाखल होऊ शकले आहेत. आतापर्यंत जवळपास ४० हजार शेतकरी या योजनेसंबंधीचे ऑनलाइन अर्ज दाखल करण्यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात सुमारे पाच लाख १४ हजार ९७ खातेदार शेतकरी आहेत. यापैकी चार लाख ९२ हजार शेतकरी हे विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे सभासद आहेत. यातील तीन लाख ८६ हजार शेतकरी कर्जदार असून, ते कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांचे जवळपास ४२ हजार कर्जदार शेतकरी या योजनेसाठी पात्र असून, यातील कमाल शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शनिवारपर्यंत (ता. ९) तीन लाख ४६ हजार ऑनलाइन अर्ज दाखल होऊ शकले आहेत. आतापर्यंत जवळपास ४० हजार शेतकरी या योजनेसंबंधीचे ऑनलाइन अर्ज दाखल करण्यापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात सुमारे पाच लाख १४ हजार ९७ खातेदार शेतकरी आहेत. यापैकी चार लाख ९२ हजार शेतकरी हे विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे सभासद आहेत. यातील तीन लाख ८६ हजार शेतकरी कर्जदार असून, ते कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांचे जवळपास ४२ हजार कर्जदार शेतकरी या योजनेसाठी पात्र असून, यातील कमाल शेतकऱ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

या योजनेतून कर्जमाफी व सवलतीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे गरजेचे आहे; परंतु अद्याप जवळपास ४० हजार शेतकरी हे अर्ज भरण्यापासून वंचित आहेत. त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे येत नाहीत, काही शेतकरी नोकरी, व्यवसाय, सेवेनिमित्त राज्य किंवा जिल्ह्याबाहेर आहेत, त्यांच्या आधार कार्डसंबंधीच्या अडचणी कायम आहेत. कारण, महाराष्ट्राबाहेरील आधार कार्डमधील क्रमांक हा अर्ज भरताना नमूद होत नाही, वृद्ध शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे येतच नाहीत.

संबंधित शेतकरी जिल्हा उपनिबंधक कार्यालय, सोसायट्यांमध्ये सतत चकरा मारीत आहेत. खासगी सायबरचालकांकडेही बोटांचे नवे ठसे देऊन अर्ज मुदतीत भरला जाईल यासाठी प्रयत्न करत आहेत; पण शुक्रवारपर्यंत (ता. १५) हे अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या मुदतीत हे अर्ज भरले जातील काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

आधार कार्ड नव्याने तयार करण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. बोटांचे नवे ठसे, त्यावरील जन्मतारीख व इतर माहिती बदलून त्याच्या अद्ययावतीकरणासाठी किमान २० ते २२ दिवस लागतात. अनेक शेतकऱ्यांनी या महिन्याच्या सुरवातीला ही प्रक्रिया करून घेतली; पण अनेक शेतकऱ्यांचे ‘आधार’ अद्ययावतीकरण १५ सप्टेंबरनंतरच होईल. त्यामुळे ते हे अर्ज भरण्यापासून वंचित राहतील, असे चित्र तूर्त तरी दिसत आहे.

गटसचिवांनी आपला बेमुदत संप मागे घेतला; पण त्यांनी अद्यापही कर्जमाफीचे ऑफलाइन अर्ज स्वीकारायला सुरवात केलेली नाही. प्रथम ऑनलाइन अर्ज भरा, नंतर हे अर्ज आम्ही स्वीकारू, असे गटसचिव शेतकऱ्यांना सांगत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शासनातर्फे १७७ महाऑनलाइनचे केंद्र , ७०० कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), ८६९ आपले सरकार केंद्रे कार्यरत आहेत. यातील अनेक केंद्रे ही सुरूच नाहीत. ती नावालाच आहेत. चार ते पाच हजार लोकसंख्येच्या गावात हे केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना तालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन खासगी सायबर केंद्रात पैसे देऊन अर्ज भरून घ्यावे लागले आहेत; पण जिल्हा ऑनलाइन अर्ज दाखल करण्याबाबत राज्यात आघाडीवर असल्याचा दावा सहायक जिल्हा उपनिबंधक अशोक बागल यांनी केला आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...