दहा हजारांचे कर्ज मिळाले १०८ शेतकऱ्यांनाच
चंद्रकांत जाधव
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

जळगाव : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरलेल्या १०८ शेतकऱ्यांनाच तातडीचे कर्ज म्हणून १० हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती आहे. कर्जमाफी योजनेसाठी जवळपास दोन लाख ९३ हजार शेतकरी पात्र ठरले; परंतु फक्त १०८ शेतकऱ्यांना तातडीचे १० हजार कर्ज मिळाल्याने शेतकरी व संघटना यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जळगाव : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरलेल्या १०८ शेतकऱ्यांनाच तातडीचे कर्ज म्हणून १० हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती आहे. कर्जमाफी योजनेसाठी जवळपास दोन लाख ९३ हजार शेतकरी पात्र ठरले; परंतु फक्त १०८ शेतकऱ्यांना तातडीचे १० हजार कर्ज मिळाल्याने शेतकरी व संघटना यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून यासंदर्भात ठोस काम झालेले नसल्याचे दिसते. मध्यंतरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या भागात दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे सुकाणू समितीने हा मुद्दा मांडला होता. त्या वेळेस फक्त जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनाच हे तातडीचे कर्ज मिळाले होते. म्हणजेच पालकमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर १०३ शेतकऱ्यांना हे तातडीचे कर्ज मिळाले आहे, अशी माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यात १५ तालुके व खातेधारक शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता १० हजार रुपयांच्या तातडीच्या कर्ज वितरणाची तारीख ही सप्टेंबरअखेरपर्यंत हवी होती, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ३१ ऑगस्ट या मुदतीमध्ये जिल्हाभरातील १०८ शेतकऱ्यांना तातडीचे १० हजार कर्ज दिले आहे. जेवढे अर्ज आले तेवढ्या शेतकऱ्यांना वितरण केल्याचे अग्रणी बॅंकेने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. कापसाचे पीक फारसे आशादायी नाही. कापूस हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे; पण बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा भागात त्याची अवस्था हळूहळू बिकट होत आहे. शेतकरी बियाणे, खतांवर खर्च करून मेटाकुटीस आले आहेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, त्यामुळे १० हजार तातडीचे कर्ज वितरणाची मुदत वाढविली जावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रमुख अजय बसेर यांनी केली आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊसपुणे : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २१) दिवसभर पावसाने...
दहा गावांतील शेतकऱ्यांचे एकाचवेळी उपोषणवणी, जि. यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे...
जळगाव येथे कोथिंबीर १८०० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक...
महात्मा फुले कृषी विद्यापीठात...राहुरी, जि. नगर  : महात्मा फुले कृषी...
दीक्षाभूमी त्याग, शांतता, मानवतेची...नागपूर ः नागपुरातील दीक्षाभूमी त्याग, शांतता व...
नगर : मांडओहळ धरण १०० टक्के भरले टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्याला वरदान...
उजनी धरणातून भीमेमध्ये पाण्याचा विसर्ग...सोलापूर : जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने...
फिनोलेक्स प्लासनसह चार ठिबक कंपन्यांना...पुणे : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून राज्यात...
पावसामुळे सोयाबीन, घेवडा कुजण्याची शक्‍... सातारा ः जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
खरीप हंगामातील उत्पादन वाढणारनवी दिल्ली ः देशात यंदा समाधानकारक पावसाच्या...
ई-पॉस यंत्रणेबाबत तांत्रिक अडचणी जळगाव  ः खतांच्या विक्रीमध्ये पारदर्शकता व...
धारवाड येथे आजपासून कृषी प्रदर्शनसंकेश्‍वर, कर्नाटक ः येथील धरावाड कृषी...
मंगळावर पाण्याचे प्रचंड साठे मंगळावर पाण्याचे साठे असल्याचे नवे पुरावे...
सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात...सांगली : जिल्ह्यात यंदा द्राक्षाच्या शेती...
बुलेट ट्रेनने अहमदाबाद जाऊन ढोकळा...मुंबई : सोशल मिडीयात काही लपून राहत नाही. सोशल...
वादळी पावसामुळे नांदुरा तालुक्यात...नांदुरा (बुलडाणा) : काल संध्याकाळी नांदुरा...
वाहनचालकाच्या प्रयत्नातून शेतीचे...बीड : एकीकडे शेती नकोशी वाटणाऱ्यांची संख्या वाढत...
भारतात आणखी १ लाख टन गहू आयात होणार मुंबई ः पुढील काही दिवसांत केंद्र सरकारकडून...
मुंबईला पाणी पुरविणारी सातही धरणे भरली मुंबई ः तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार...
कर्जमाफीची रक्कम १५ ऑक्टोबरपासून बँक... मुंबई : अनेक घोषणांनंतर लांबलेली कर्जमाफीची...