रामदेवबाबा करणार ‘निसाका’ची खरेदी?

निफाड साखर कारखाना
निफाड साखर कारखाना

नाशिक : कोट्यवधींच्या थकीत कर्जवसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निफाड आणि नाशिक या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांची मालमत्ता विक्रीची कार्यवाही सुरू केली असून, त्यापैकी निफाड कारखाना खरेदीसाठी योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली संस्थेने चाचपणी केल्याचे वृत्त आहे.

या दोन्ही कारखान्यांकडे जवळपास अडीचशे कोटी रुपये थकीत असून, तीन वर्षांपासून गाळपच होत नसल्याने वसुलीही रखडली आहे. नाशिक कारखाना सुरू करण्याच्या वावड्या उठविल्या जात असल्या, तरी राज्य सहकारी बँक सरकारच्या थकहमीशिवाय कारखान्याला कर्ज द्यायला कुणी तयार नाही. त्यामुळे हा कारखाना सुरू होण्याविषयी साशंकता आहे. निफाड कारखान्याच्या बाबतीत तर सद्यःस्थितीत शांत वातावरण आहे. दुसरीकडे पीककर्जाची वसुली न झाल्याने बँकेची आर्थिक स्थिती कमालीची खालावली असून, बँकेने बिगरशेती कर्जाच्या वसुलीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळेच या दोन्ही कारखान्यांची विक्री करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. कारखाने विक्री करण्यात आले, तरी ते कारखाने म्हणूनच चालवावे लागणार आहेत, अशी अट असल्याने कारखान्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे.

अजूनपर्यंत निविदा प्राप्त झालेल्या नसल्या, तरी निफाड कारखाना खरेदीसाठी पतंजली या संस्थेने रस दाखविल्याची माहिती सूत्रांनी दिली. संस्थेने बँकेकडे कारखान्याचे कर्ज किती, मालमत्ता यासंदर्भात नुकतीच विचारपूस केल्याचेही सांगण्यात आले.

विविध प्रकारच्या घरगुती वस्तूंचे उत्पादन करून ते घराघरांत पोचविण्यास यशस्वी ठरलेल्या पतंजलीने निफाड कारखाना विकत घेतल्यास नाशिककरांना पतंजलीच्या साखरेची गोडीही चाखायला मिळणार आहे. निविदा भरण्यासाठी अजून मुदत असल्याने ही प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतरच पतंजलीची साखर कारखान्याच्या बाबतीतील भूमिका स्पष्ट होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com