पुणे विभागात रब्बी हंगामाची तयारी सुरू
संदीप नवले
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पुणे  ः गेल्या तीन महिन्यांत पुणे विभागात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे विभागातील बहुतांशी धरणे भरली आहेत. रब्बी हंगामात पाण्याची अडचण येणार नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी सुरू केली आहे. हंगामात बियाण्यांची टंचाई भासू नये म्हणून एक लाख ७७ हजार १९९ क्विंटल बियाण्यांची मागणी पुणे कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे केली आहे. आयुक्तालयस्तरावरून मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे  ः गेल्या तीन महिन्यांत पुणे विभागात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे विभागातील बहुतांशी धरणे भरली आहेत. रब्बी हंगामात पाण्याची अडचण येणार नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी सुरू केली आहे. हंगामात बियाण्यांची टंचाई भासू नये म्हणून एक लाख ७७ हजार १९९ क्विंटल बियाण्यांची मागणी पुणे कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे केली आहे. आयुक्तालयस्तरावरून मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा जून, जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने बहुतांशी भागातील पिके वाया गेल्याने रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र आहे. त्यानुसार कृषी विभागाने तयारी करून बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना तालुका, गावपातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत बियाणे पुरवठा केला जाणार आहे. पुणे विभागात रब्बीचे सरासरी क्षेत्र सुमारे १८ लाख ७३ हजार ३९० हेक्‍टर आहे. हे क्षेत्र लक्षात घेत बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षांचा विचार केल्यास ही मागणी अधिक आहे. २०१४-१५ मध्ये ८७ हजार ३ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. २०१५-१६मध्ये ६७ हजार ४६३ तर २०१६-१७ मध्ये एक लाख ५ हजार ९९६ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. सरासरी विचार केल्यास ८६ हजार ८२१ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती.

चालू वर्षी पुणे विभागात १८ लाख ६९ हजार ९८७ हेक्‍टरवर पेरणी होण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे पोच होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना ‘महाबीज’कडून एक लाख १५ हजार १०४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांकडून ५३ हजार ९३४ क्विंटल; तर उर्वरित बियाणे राष्ट्रीय बीज निगम मंडळाकडून देण्यात येणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावमध्ये नवती केळी १०२५ रुपये क्विंटल जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात...
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...
दहा लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखालीच परभणी : अद्यापर्यंत पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस...
बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणारमुंबई : शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध...
नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीचे अडीच लाखांवर...नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाच्या... सातारा  ः दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर आला...
पुण्यात कोथिंबीर शेकडा २५०० रुपये पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
संतुलित पुरवठ्यामुळे एेन नवरात्रात... आठवडाभरात ब्रॉयलर्सच्या बाजारात जोरदार वाढ...
गुरुवारपर्यत काही ठिकाणी हलक्‍या...पुणे ः राज्यात हवेचा दाब वाढत आहे. त्यामुळे...
बिहारकडून ८० अब्ज पूरग्रस्त निधीची मागणीनवी दिल्ली ः बिहारमध्ये येऊन गेलेल्या...
कर्जमाफीवरून पंजाबमध्ये अारोप-...चंडीगड, पंजाब ः पंजाबमध्ये शेतकरी...
सुधारित पद्धतीमुळे मका पिकात फायदा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
योग्य व्यवस्थापनातून हरभरा उत्पादनात...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...