agiculture news in marathi, cotton crop damage | Agrowon

जळगाव जिल्ह्यात कपाशीचे पीक हातचे जाण्याची शक्‍यता
चंद्रकांत जाधव
शनिवार, 9 सप्टेंबर 2017
जळगाव : जिल्ह्यात बोदवड, मुक्ताईनगर व जामनेरमधील विविध भागांमधील हलक्‍या जमिनीच्या भागात पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक बनत आहे. पुढील काळात पाऊस आला नाही तर कापसाचे पीकही हातचे जाईल की काय, अशी स्थिती आहे.
जळगाव : जिल्ह्यात बोदवड, मुक्ताईनगर व जामनेरमधील विविध भागांमधील हलक्‍या जमिनीच्या भागात पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक बनत आहे. पुढील काळात पाऊस आला नाही तर कापसाचे पीकही हातचे जाईल की काय, अशी स्थिती आहे.
सोयाबीन, कापूस, मका या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु मागील १२ ते १३ दिवसांपासून पाऊस झालेला नाही. मुक्ताईनगरमधील पूर्व व दक्षिण भाग, बोदवडमधील पूर्व व पश्‍चिम भाग आणि जामनेरातील पूर्व भागातील गावांमध्ये हलकी, मुरमाड जमीन आहे. या भागात जेवढा अधिक पाऊस असतो तेवढी जोमात पिके येतात. पाच- सहा दिवसही पाऊस झाला नाही तर पिकांच्या वाढीवर, फळे, फुले लावण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. 
 
मागील पाच- सहा दिवसांपासून कडक ऊन पडत आहे. त्यात हलक्‍या जमिनींमधील ओलावा लागलीच दूर झाला. उष्णता वाढल्याने पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण राहिले तर पिकांना फारशी पाण्याची गरज नसते. पण ऊन असले तर पिके माना टाकतात. यातच या भागात कृत्रिम जलसाठ्यांची स्थिती बिकट आहे. त्यांना हवा तसा पाऊस यंदा मिळाला नाही. पीक जेमतेम तग धरून होते, त्यातच पुन्हा एकदा पाऊस गायब झाल्याने हळूहळू स्थिती बिकट बनत आहे.
या तालुक्‍यांमध्ये कापूस हे प्रमुख पीक आहे. त्याची वाढ खुंटली असून, फुलगळ, पातेगळ सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे कृत्रिम जलसाठे आहेत त्यांनी सिंचन सुरू केले आहे. काही कापूस उत्पादकांकडे सूक्ष्म सिंचन प्रणाली असल्याने त्यांना सिंचन करणे सुकर आहे. परंतु सूक्ष्म सिंचन प्रणाली नसलेल्या शेतकऱ्यांना एक आड एक सरीत पट पद्धतीने सिंचन करावे लागत आहे.
 
आमच्याकडे पिकांची स्थिती सुरवातीपासून नाजूक आहे. त्यात पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. कापसाचे पीक माना टाकू लागले आहे. पावसाची नितांत गरज आहे, अशी माहिती बोदवड येथील शेतकरी नाना पाटील यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील केळी, कापूस, तूर... जळगाव  ः जिल्ह्यात आठवडाभरापासून असलेले...
सांगलीत गूळ ३५५० ते ४२६० रुपये क्विंटलसांगली : येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक...
नाशिकमधील शेतकऱ्यांना कर्जमाफीची... नाशिक  : गेल्या १८ ऑक्‍टोबरला मोठ्या...
वाढत्या मागणीमुळे अंड्यांच्या दरात वाढ नवी दिल्ली : वाढत्या मागणीचा पुरवठ्यावर परिणाम...
ज्वारी - भुईमुग आंतरपिकासाठी खताचे...आफ्रिकेच्या काही भागामध्ये शेतकरी ज्वारीमध्ये...
ढगाळ हवामानामुळे सांगलीतील द्राक्ष... सांगली :  द्राक्ष हंगामाच्या तोंडावर...
वर्धा जिल्ह्यात कर्जमाफीचे केवळ कागदी...वर्धा : शासनाने मोठा गाजावाजा करून १० जुलै रोजी...
शासकीय देणी थकविणाऱ्या कारखान्यांना...पुणे : राज्य शासनाची देणी थकविणाऱ्या साखर...
अकोल्यात बोंडअळी प्रादुर्भावाबाबत... अकाेला : जिल्ह्यात या हंगामात लागवड झालेल्या...
कृषिसेवक भरतीचा तपास सीआयडीकडे द्या पुणे : राज्यात झालेल्या कृषिसेवक भरती...
साध्या यंत्रमागधारकांना व्याजदरात पाच...मुंबई : राज्यातील यंत्रमाग उद्योगाला चालना...
कृषी सल्ला : आंबा, काजू, नारळ, सुपारी,...सद्यस्थितीचा विचार करता पिकानिहाय खालील प्रकारे...
कृषि सल्ला : भाजीपाला, फळभाज्यामिरची : परभणी तेजस, पुसा ज्वाला, पंत सी-१...
नाशिकला टोमॅटोच्या दरातील तेजी कायमनाशिक : जिल्ह्यात टोमॅटो हंगामाने वेग घेतला असून...
नागपुरात सोयाबीन २८०० रुपये क्विंटल नागपूर ः येथील कळमना बाजारात हंगामातील...
सोलापुरात कांदा वधारला; दर ४००० रुपये... सोलापूर ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांदा १००० ते ४२०० रुपये... कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडीद, मुगाच्या दरात सुधारणा जळगाव ः डाळ उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव...
सोलापुरात ऊसदराच्या आंदोलनाची धग कायम सोलापूर ः प्रशासन, कारखानदार यांच्याकडून अद्याप...
‘वान’च्या पाण्यावरील संपूर्ण अारक्षण... अकोला  ः वान प्रकल्प हा मुख्यतः सिंचनासाठी...