नगर जिल्ह्यात सोळा हजार हेक्‍टरवर ठिबकचा वापर

drip use in nagar district
drip use in nagar district
नगर : कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यामध्ये ठिबक सिंचनखालील क्षेत्रात वाढ होत आहे. सध्या सुमारे सोळा हजार हेक्‍टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. २३ हजार १३४ शेतकरी त्याचा वापर करत आहेत. आतापर्यत ठिबक सिंचनापोटी ४२ कोटी रुपयांचे अनुदान दिले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.  
सलग पाच वर्षे जिल्ह्याने दुष्काळी स्थिती अनुभवली आहे. दुष्काळाचा शेती आणि शेती उत्पादनावर गंभीर परिणाम झालेला आहे. मात्र अशा काळातदेखील ज्या शेतकऱ्यांनी पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला, त्यांना फायदाच झाला. त्यामुळे जिल्ह्यामध्ये भविष्याचा विचार करता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसादही मिळत आहे. ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत. या वर्षी त्यासाठी बऱ्यापैकी निधीही उपलब्ध झालेला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये २३ हजार १३४ शेतकरी १५ हजार ८४० हेक्‍टर क्षेत्रावर ठिबकचा वापर करत आहेत. त्यात १३ हजार ८५३ हेक्‍टर क्षेत्रावर ठिबक व १९८७ हेक्‍टर क्षेत्रावर स्प्रिंकलरचा वापर होत आहे. त्यासाठी आतापर्यत ४१ कोटी ९१ लाख ३५ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना वाटप केले आहे. शेतकऱ्यांनी ठिबकचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी साखर कारखाने, संस्था, कृषी विभागाकडून जागृती केली जात आहे. त्याला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळत आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले. 
तालुकानिहाय ठिबकखालील क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
नगर ः ९८०.८६, अकोले ः ३६३.८९, जामखेड ः ४८९.०९, कर्जत ः १२८४.१६, कोपरगाव ः १३६३.४५, नेवासा ः १०९८.०१, पारनेर ः ७२४.३२, पाथर्डी ः १०३३.८८, राहाता ः १७७८.०१, राहुरी ः ९६९.४४, संगमनेर ः १७९०.०४, शेवगाव ः १२५८.१३, श्रीगोंदा ः १७१५.९२, श्रीरामपूर ः ९९१.६९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com