सोलापुरात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी चुरस

ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी
ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी

सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू अाहे.राजकीय स्तरावर विविध पक्षांतील राजकारण चांगलेच तापले आहे. पक्षापेक्षा विविध गट, संघटना आणि आघाड्यांमध्ये सर्वाधिक चुरस दिसणार आहे.या सर्व गावांच्या सरपंचांची निवड पहिल्यांदाच थेट होणार असल्याने त्याचीही मोठी उत्सुकता गावांगावांमध्ये आहे.

गावोगावच्या चावड्या आणि चौक आता गर्दीने फुलू लागले आहेत. या निवडणुकीसाठी येत्या १६ ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. पण त्यापूर्वी २२ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. उमेदवारी दाखलासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी राहिल्याने उमेदवार कोण, कसा, यासाठी गावोगाव कार्यकर्त्यांमध्ये बैठका, चर्चा झडू लागल्या आहेत.

सध्या जिल्ह्यात बहुतांश ग्रामपंचायतींवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. काही ठराविक तालुक्‍यांत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. पण सध्या राज्य व केंद्रामध्ये भाजपचे सरकार असल्याने भाजप मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे.

त्यासाठी विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेते, कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर बैठकांचे सत्रही पार पडले. विरोधी पक्षाकडूनही मोठी ताकद लावली जात आहे. पण कोणाची ताकद किती, हे मात्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com