धुळे व शिंदखेडा सूतगिरणी प्रकल्प अहवालास मान्यता
चंद्रकांत जाधव
रविवार, 10 सप्टेंबर 2017
कापडणे, जि. धुळे : धुळे व शिंदखेडा शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या सुधारित प्रकल्प अहवालास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. २५ हजार दोनशे चात्यांच्या या गिरणीसाठी सुमारे ५९ कोटींची गरज असून, त्यासंदर्भातील प्रकल्प किमतीस मंजुरी देण्यात आली. आगामी सहा महिन्यांत काम पूर्ण होऊन ही सूतगिरणी सुरू होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडूनही निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सूतगिरणीच्या अध्यक्षा ज्ञानज्योती भदाणे यांनी दिली आहे. 
 
कापडणे, जि. धुळे : धुळे व शिंदखेडा शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या सुधारित प्रकल्प अहवालास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. २५ हजार दोनशे चात्यांच्या या गिरणीसाठी सुमारे ५९ कोटींची गरज असून, त्यासंदर्भातील प्रकल्प किमतीस मंजुरी देण्यात आली. आगामी सहा महिन्यांत काम पूर्ण होऊन ही सूतगिरणी सुरू होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडूनही निधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सूतगिरणीच्या अध्यक्षा ज्ञानज्योती भदाणे यांनी दिली आहे. 
 
शेतकरी सहकारी सूतगिरणीचा आठव्या पंचवार्षिक योजनेत अर्थसाहायासाठी समावेश झाला आहे. २५ हजार २०० चात्यांचा हा प्रकल्प असेल. या मंजुरीसंबंधीचे शासन परिपत्रकही प्रसिद्ध झाले आहे. या गिरणीमध्ये शासनाचा एक अधिकारी कायमस्वरूपी व्यवस्थापनावर असेल. या सूतगिरणीमुळे रोजगारनिर्मिती होणार असून, शेतकऱ्यांच्या कापसाला जवळचे मार्केट उपलब्ध होणार आहे. धुळ्यातील कापूस गुजरात व मध्य प्रदेशमध्ये पाठवावा लागतो; पण पुढे गुजरातमधील कापसाची निर्यात यामुळे कमी होईल. सूतगिरणीत प्रक्रियेसाठी रोज तीन ते चार हजार क्विंटल कापसाची खरेदी होईल, असेही सांगण्यात आले. 
 
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, सहकार व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, रोजगार व पर्यटनमंत्री जयकुमार रावल आदींच्या प्रयत्नांतून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास चालना मिळाली. माजी आमदार (कै.) द. वा. पाटील यांच्या काळात या सूतगिरणीचे काम सुरू झाले होते; पण नंतर अनेक अडचणींमुळे प्रकल्प अपूर्ण राहिला; पण आता हा प्रकल्प उभारण्यासंबंधी सकारात्मक चित्र निर्माण झाल्याचे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांनी म्हटले आहे.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
शीतकरण केंद्र बंद असल्याने दुग्धोत्पादक...अमरावती : वाशीम येथील शासकीय दुग्ध योजनेकडून...
पुणे बाजार समिती असुविधांच्या विळख्यात पुणे : राज्यात सर्वांत माेठ्या बाजार...
नाशिकला टोमॅटो ४५५ ते १६३५ रुपये क्विंटलनाशिक : नाशिक, नगर जिल्ह्यातून वाढलेली आवक,...
साताऱ्यात वाटाणा, वांगी, गवार तेजीत सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नागपूरमध्ये हरभरा सरासरी ५६४० रुपये...नागपूर ः कळमना बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून...
शेतकऱ्यांना न्याय मिळायवा हीच भूमिका :...अकोला : भारत हा कृषिप्रधान देश म्हटला जातो, मात्र...
साताऱ्यात दमदार पावसामुळे पाणीटंचाईची... सातारा : जिल्ह्यात गेल्या सप्ताहात झालेल्या...
‘सिद्धेश्‍वर’कडून गतहंगामातील उसाला... सोलापूर : दुष्काळ, कमी पाऊसमान यामुळे...
वऱ्हाडात मॉन्सूनपूर्व कपाशीचे नुकसान अकोला : गत आठवड्यात काही भागांत संततधार पाऊस...
गवारगमसह तांदूळ निर्यात वाढलीमुंबई ः अमेरिकेतून मागणी वाढल्याच्या...
उकाडा वाढलापुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने...
जळगावमध्ये नवती केळी १०२५ रुपये क्विंटल जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात...
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...