agiculture stories in marathi, agrowon, farmers movement | Agrowon

आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्ह्यांचा अहवाल द्या
ज्ञानेश उगले
रविवार, 10 सप्टेंबर 2017
नाशिक : विविध मागण्यांसाठी झालेल्या शेतकरी आंदोलनात येवला तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी गृह विभागाला दिले आहेत. तसेच, दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. 
 
नाशिक : विविध मागण्यांसाठी झालेल्या शेतकरी आंदोलनात येवला तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी गृह विभागाला दिले आहेत. तसेच, दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. 
 
शुक्रवारी (ता. ८) निंबाळकर यांच्या दालनात अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादीचे आमदार जयवंत जाधव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव रजनिश शेठ, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. संजय दराडे यांच्यासह येवल्याचे संजय बनकर, मोहन शेलार, सचिन कळमकर, बाळासाहेब क्षीरसागर, देविदास शेळके, आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, बी. आर. लोंढे आदी उपस्थित होते.
पावसाळी अधिवेशनात आमदार जयवंत जाधव यांनी या प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानंतर सभापतींनी बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारी मंत्रालयात ही बैठक पार पडली.
या वेळी आमदार जाधव म्हणाले की, १ व २ जून रोजी येवला तालुक्यातील उंदीरवाडी, पिंपळगाव जलाल येथील ४४ शेतकऱ्यांवर पोलिसांनी दरोडा, लूटमार व पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. १ जून रोजी राज्यात शेतकऱ्यांचा बेमुदत संप सुरू असताना पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

त्या आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी हिंसक कारवाया केल्या होत्या; मात्र पोलिसांनी समाजकंटकांना सोडून उंदीरवाडी, पिंपळगाव जलाल आदी गावांमधील शेतकऱ्यांना घरांमध्ये रात्री-अपरात्री घुसून मारहाण केली. तसेच दडपशाही करून ४४ निर्दोष नागरिकांना अटक केली होती.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून ३०७, ३०४ व ३९५ सारखे गंभीर गुन्हे दाखल करणाऱ्या दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करावी आणि शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली. यावेळी सभापती निंबाळकर यांनी शेतकऱ्यांवरील गुन्ह्यांचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे निर्देश गृह विभागाला या वेळी दिले.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...
मिरज पूर्व भागात पाण्यासाठी भटकंती सुरूच सांगली : म्हैसाळ योजनेचा उपसा सुरू होऊन महिना...