वऱ्हाडात पाणीटंचाईचे सावट

water shortage
water shortage
अकोला : पावसाचे तीन महिने लोटले तरी सरासरीइतकाही पाऊस झाला नसल्याने वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांवर पाणीटंचाईचे सावट उभे राहले आहे. या जिल्ह्यांमधील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. जोरदार पाऊस न झाल्यास दिवाळीनंतरच टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.   
वाशीम जिल्ह्यातील मध्यम व लघू अशा १२६ प्रकल्पांत मिळून केवळ १९.७७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या जिल्ह्यातील ४० हून अधिक प्रकल्प कोरडे पडले आहेत. अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील ६१ गावांना ४५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. 
 
बुलडाणा जिल्ह्यातील १४० गावांत पाणीटंचाई असून, ती दूर करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.अकोला जिल्ह्यात कमी पावसामुळे प्रकल्प कोरडे पडत आहेत. महान या मोठ्या प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने या प्रकल्पावर अवलंबून असलेली खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. यामुळे ६१ गावांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागते आहे. या गावांमधून जिल्हा प्रशासनाकडे पाणी समस्या सोडविण्याची सातत्याने मागणी केली जात आहे. यासाठी आता टँकरचा आधार घेतला जाणार आहे.
 
महान धरणातून पुरवठा बंद झाल्यावर खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यातून आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु याही बंधाऱ्यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद झाला आहे. यामुळे आता ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. 
 
या मोसमात पावसाळ्याचा चौथा महिना सुरू होऊनही पावसाने सरासरी गाठलेली नाही. परिणामी वाशीम जिल्ह्यातील मध्यम आणि लघू मिळून १२६ प्रकल्पांतील पाणीसाठा वाढलेला नाही. जिल्ह्यातील ४०  पेक्षा अधिक प्रकल्प कोरडे आहेत. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ६२.१९ टक्के पाऊस झाला. कमी पर्जन्यमानामुळे ३ मध्यम आणि १२३ लघू प्रकल्पांसह बॅरेजेस मिळून एकूण १२६ प्रकल्पांत केवळ १९.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील नऊ वर्षांतील स्थिती पाहता यंदा टंचाईचे सावट अधिक तीव्र आहे. जिल्ह्यातील एकूण १२६ प्रकल्पांची उपयुक्त पाण्याची टक्केवारी १९.७७ असली, तरी त्यामधील ४४ प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. हे प्रकल्प कोरडे आहेत. त्याशिवाय १३ प्रकल्पांत ५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे, तर ८ प्रकल्पांत १० टक्क्यांच्या आत उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. 
 
कमी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील विविध प्रकल्पात अल्पसाठा आहे. सध्या टंचाईग्रस्त १४० गावे असून, तेथील ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी ९७ हातपंपांचा आधार घ्यावा लागत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पावसाची सरासरी ७१२.७ मिमी असताना या वर्षी आजपर्यंत केवळ ४९५.६ मिमी म्हणजे सरासरीच्या ६९.९३ टक्के पाऊस झाला आहे. हा पाऊस अल्प असून, जिल्ह्यातील विविध प्रकल्पांत अल्प प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com