राज्यात गेल्या दीड दशकामध्ये गटशेतीचे मूळ बऱ्यापैकी धरले अस
अॅग्रो विशेष
सांगली : जिल्ह्यातील काही भागांत द्राक्ष फळछाटणीला प्रारंभ झाला आहे. मात्र, कमी पाऊस आणि पाण्याची कमतरता यामुळे द्राक्षछाटणी करण्यास शेतकऱ्यांमध्ये उत्साह नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे द्राक्ष फळछाटणीसाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी शाश्वत पाणी आहे, त्याच भागातील शेतकऱ्यांनी द्राक्ष फळछाटणी सुरू केली आहे.

जिल्ह्यातील मिरज तालुक्याचा पूर्व भाग, तासगाव तालुक्याचा पूर्व भाग, पलूस तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी द्राक्ष फळछाटणी घेण्यास प्रारंभ केला. मात्र, छाटणी घेण्यास सुरवात केली असली तरी द्राक्ष उत्पादकांच्या चेहऱ्यावर निराशाच दिसते आहे.
गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात द्राक्षाला मिळालेल्या कमी अधिक दरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. यामुळे कर्ज भरण्यास अडथळे निर्माण झाले होते. त्यातच यंदाचा हंगाम चांगला जाईल अशी आशा होती. मात्र, सुरवातीपासून पाणीटंचाई असल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी बागा जगविण्यासाठी टॅंकरचा आधार घेतला आहे. त्यासाठी एका टॅंकरला सुमारे १८०० ते ३००० रुपये मोजावे लागले आहेत. यामुळे उत्पादनखर्च वाढण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामातील द्राक्षबागेची फळछाटणीसाठी मजुरांची संख्या कमी आहे. याचे कारण म्हणजे पावसाची कमतरता आणि पाणीटंचाई. यामुळे यंदा फळछाटणी उशिरा सुरू होणार असल्याचे परराज्यातून मजूर सांगली जिल्ह्यात दाखल झाले नाही. परिणामी मजुरांची संख्या कमी असून मजुरी दरही वाढले आहेत.
यंदाच्या हंगामात ३०० रुपये मनुष्यास; तर २०० रुपये महिलांसाठी असे मजुरी दर आहेत. अनेक ठिकाणी खंडून घेण्याची पद्धत आहे. एकरी ३० हजार रुपयांनी खंडून घेतले जाते. यामध्ये पाला आच्छादन, पेस्ट लावणे, विरळणी आणि दोन डिपिंग यासह रक्कम घेतली जाते.
पाण्याची कमतरता असल्याने द्राक्षबागेची छाटणी करण्याचा विचार नव्हता; पण गेल्या आठवड्यात पाऊस झाल्याने द्राक्ष फळछाटणीस प्रारंभ केला आहे; पण इथून पुढे पाण्याची आवश्यकता भासणार आहे. तरच पीक चांगले येऊ शकते, कुंडल येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी महादेव लाड यांनी सांगितले.
- 1 of 291
- ››