पुणे जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला पावसाचा दिलासा
संदीप नवले
रविवार, 10 सप्टेंबर 2017
पुणे  गत दोन ते तीन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. विशेष म्हणजे दुष्काळी असलेल्या पूर्वेकडील बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरूर तालुक्‍यातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे पूर्वेकडील भागातील तूर, बाजरी, मूग, उडीद, तर पश्‍चिमेकडील भात पिकाला चांगला फायदा झाला असून, ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. 
 
पुणे  गत दोन ते तीन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. विशेष म्हणजे दुष्काळी असलेल्या पूर्वेकडील बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरूर तालुक्‍यातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे पूर्वेकडील भागातील तूर, बाजरी, मूग, उडीद, तर पश्‍चिमेकडील भात पिकाला चांगला फायदा झाला असून, ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. 
 
पुणे जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. गुरुवारी (ता. ७) देखील दिवसभर ऊन पडले होते; परंतु दुपारनंतर अचानक ढग भरून आले. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. शुक्रवारी अशीच काहीशी स्थिती होती. शनिवारी पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते; परंतु पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्‍याच्या काही भागात हलक्‍या स्वरूपात पाऊस झाला. पूर्वेकडील बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्‍यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले; परंतु काही पिकांना दिलासा मिळाल्याने पिके जोमाने वाढत आहेत. 
 
मुसळधार पावसामुळे बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्‍यातील ओढे, नाले, नद्याही दुथडी भरून वाहिल्या. पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी,भोर, वेल्हा तालुक्‍यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने भात पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.   
 
मंडलनिहाय शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंत झालेला पाऊस (मिमी)  :  हवेली ः पुणे शहर ०.९, भोसरी ११, चिंचवड ३२.  मुळशी  ः पौड १२, मळे १४ मुठे १५, पिरंगुट ४.  भोर ः भोर ८, भोळावडे ८, नसरापूर २, किकवी ४, संगमनेर २, निगुडघर १.  वडगाव मावळ ः वडगाव मावळ २३, तळेगाव २१, काले १५, कार्ला ४, खडकाळा १५, लोणावळा ४, शिवने ९.  वेल्हा ः वेल्हा ४, पानशेत ५, विंझर ३, आंबवणे ३.  जुन्नर ः जुन्नर १, नारायणगाव ७. खेड ः वाडा ३६, कुडे ४०, पाईट १५, कडुस १.  दौंड ः राहू २.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
शीतकरण केंद्र बंद असल्याने दुग्धोत्पादक...अमरावती : वाशीम येथील शासकीय दुग्ध योजनेकडून...
पुणे बाजार समिती असुविधांच्या विळख्यात पुणे : राज्यात सर्वांत माेठ्या बाजार...
नाशिकला टोमॅटो ४५५ ते १६३५ रुपये क्विंटलनाशिक : नाशिक, नगर जिल्ह्यातून वाढलेली आवक,...
साताऱ्यात वाटाणा, वांगी, गवार तेजीत सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत...
नागपूरमध्ये हरभरा सरासरी ५६४० रुपये...नागपूर ः कळमना बाजार समितीत गेल्या आठवडाभरापासून...
शेतकऱ्यांना न्याय मिळायवा हीच भूमिका :...अकोला : भारत हा कृषिप्रधान देश म्हटला जातो, मात्र...
साताऱ्यात दमदार पावसामुळे पाणीटंचाईची... सातारा : जिल्ह्यात गेल्या सप्ताहात झालेल्या...
‘सिद्धेश्‍वर’कडून गतहंगामातील उसाला... सोलापूर : दुष्काळ, कमी पाऊसमान यामुळे...
वऱ्हाडात मॉन्सूनपूर्व कपाशीचे नुकसान अकोला : गत आठवड्यात काही भागांत संततधार पाऊस...
गवारगमसह तांदूळ निर्यात वाढलीमुंबई ः अमेरिकेतून मागणी वाढल्याच्या...
उकाडा वाढलापुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने...
जळगावमध्ये नवती केळी १०२५ रुपये क्विंटल जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात...
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...