जालन्यातील 25 मंडळात अतिवृष्टी

जालन्यातील 25 मंडळात अतिवृष्टी

जालना, ता.21: जिल्ह्यात रविवारी दिवसभर आणि रात्री जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील 25 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर अंबड तालुक्यात सर्वाधिक 128.86 मिमी तर  भोकरदन तालुक्यात 26.75 मिमी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, रविवारी संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.  सोमवारी (ता.21) सकाळी 8 वाजेपर्यंत जालना तालुक्यात 57.13 मिमी, बदनापूर तालुक्यात 32 मिमी, भोकरदन तालुक्यात 26.75 मिमी, जाफराबाद तालुक्यात 26.80 मिमी, परतूर तालुक्यात 98.20 मिमी, मंठा तालुक्यात 84.25 मिमी, अंबड तालुक्यात 128.86 मिमी, घनसावंगी तालुक्यात 95.71 मिमी पाऊसाची नोंद झाली. दरम्यात, आज (सोमवारी) सकाळी पासून पावसाने विश्रांती घेतली असून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अतिवृष्टी झालेले तालुका निहाय मंडळे ( मिलिमीटर). 

  • जालना - जालना ग्रामीण ८९ , विरेगाव ८५,  पाचन वडगाव ६५,,
  • परतूर - परतूर १२८, सातोना १०७, आष्टी ७३, श्रीष्टी १३८
  • मंठा - मंठा ९९, ढोकसाळ ७२, पांगरी गोसावी ११८,
  • अंबड - अंबड १३४, धनगर पिंप्री १३१, जामखेड १३८, वडीगोद्री १३८, गोंदी १२६,
  •  रोहीलागड ११८, सुखापुरी ११७
  • घनसावंगी -  घनसावंगी ९५, राणी उंचेगाव १००, रांजनी १२६, तिर्थपुरी १०५, कुंभार पिंपळगाव ९०, अंतरवाली टेंभी ७६, जांब समर्थ ७८ मिमि. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com