agricultrue news in marathi, green chilly will export to gulf countries, washim, maharashtra | Agrowon

वाशीमची हिरवी मिरची जाणार अाखाती देशात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

अकोला  ः वाशीम जिल्ह्यात पिकणारा भाजीपाला यापुढे निर्यात केला जाणार अाहे. करडा कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक व निर्यातदार यांच्या दरम्यान करार झाला अाहे. या करारामुळे अाता प्रथमच हिरव्या मिरचीची निर्यात आखाती देशात केली जाणार अाहे. या करारात ५० शेतकरी सहभागी झाले असून, ३० एकरांवर मिरचीची लागवड पूर्ण झाली अाहे.

अकोला  ः वाशीम जिल्ह्यात पिकणारा भाजीपाला यापुढे निर्यात केला जाणार अाहे. करडा कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक व निर्यातदार यांच्या दरम्यान करार झाला अाहे. या करारामुळे अाता प्रथमच हिरव्या मिरचीची निर्यात आखाती देशात केली जाणार अाहे. या करारात ५० शेतकरी सहभागी झाले असून, ३० एकरांवर मिरचीची लागवड पूर्ण झाली अाहे.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अार. एल. काळे, रिसोडचे तहसीलदार राजेश सुरडकार, निर्यात प्रकल्पाचे प्रमुख निवृत्ती पाटील, ईवा एक्स्पोर्टचे संदेश धुमाळ, ‘ॲग्रोस्टार’चे सोपान काळे, कृषी व पणन तज्ज्ञ धनजंय वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार नुकताच झाला.   

वाशीम जिल्ह्यात विविध पिकांचे दर्जेदार बीजोत्पादन केले जाते. भाजीपाल्याचेही उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन घेतले जाते. अाता हा उत्पादित माल निर्यात करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली अाहे. पहिल्या टप्प्यात हिरवी मिरची अाखाती देशात पाठवली जाणार अाहे. या करारात शेलू खडसे, डोंगरकिन्ही, धोडप, हराळ, रिसोड तालुक्यांतील शेतकरी सहभागी झाले अाहेत. 

या वेळी निवृत्ती पाटील यांनी या कराराबाबत माहिती दिली. उत्पन्न दुप्पट करण्यासाठी तांत्रिक माहितीसोबतच संघटन, विक्री व्यवस्था महत्त्वाची असून, एक ठराविक हमीदर शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. यादृष्टीने हे पाऊल उचलण्यात अाले अाहे. सद्यःस्थितीत ५० शेतकरी यात सहभागी झाले असल्याचे ते म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....
दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...
उपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...
आंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...
औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...
नगरमध्ये मुगाचे क्षेत्र वाढतेय; पण...नगर  ः जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र...
सोलापूरातील अवघ्या ५० हजार शेतकऱ्यांना...सोलापूर  : कर्जमाफीची प्रक्रिया गेल्या काही...
डाळिंबाचा प्रतिकिलो दर २० ते २२ रुपयांवरसोलापूर ः राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
केरळला २० कोटींची मदत ः मुख्यमंत्री...मुंबई : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या...
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...