agricultrue news in marathi, milipead on soyabean crop, yavatmal, maharashtra | Agrowon

साकुर परिसरात सोयाबीन पिकावर मिलीपीड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

मिलीपीड ही किड स्थानिक भाषेत वाणी, पैसा या नावाने ओळखली जाते. पावसाने उघडीप दिल्याच्या काळात जमिनीतील भेगातून ही कीड बाहेर पडते आणि उगवलेले पीक खाते. सीआयबीकडून या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्याच कीटकनाशकाची शिफारस नाही. त्यामुळे मिलीपीडचे समूह केरोसीनच्या पाण्यात बुडवून नष्ट करावे हा एकच उपाय आहे.
- डॉ. अनिल कोल्हे, मुख्य पीक संरक्षण अधिकारी,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

आर्णी, जि. यवतमाळ  ः यावर्षी पहिल्या टप्प्यात पाऊस झाल्याने हुरूप वाढलेल्या शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या आटोपल्या. पीक अंकुरले आणि आता ते चांगले बहरात असतानाच मिलीपीड (वाणू) या किडीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्याचे दिसून आले आहे.

यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीन लागवडीला प्राधान्य दिले आहे. आर्णी तालुक्‍यातील साकुर परिसरातील शेतकऱ्यांनी देखील सोयाबीन लागवड केली. दहा जूनपासून चार दिवस सलग झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पुरेशी ओल असल्याची खात्री करून सोयाबीन पेरले. त्यानंतर बी अंकुरले आणि आता पीकवाढीच्या टप्‍प्यात असताना मिलीपीडचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

ही कीड रोप खाऊन टाकते. गेल्या तीन ते चार दिवसांत साकुर शिवारात याच कारणामुळे १०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. २००५ मध्ये सुद्धा साकुर शिवारात मिलीपीडचा प्रादुर्भाव दिसून आला होता.
 

इतर ताज्या घडामोडी
सूज, जखमांवर काळी अळू उपयुक्त स्थानिक नाव    : काळी अळू...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
औरंगाबादेत खरबूज प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...