agricultrue news in marathi, tur payment transferred in another account, yavatmal, maharashtra | Agrowon

नाफेडच्या तुर खरेदीचा चुकारा कर्नाटकातील शाखेत वर्ग
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जून 2018

श्रीरामपूर, जि. यवतमाळ  : महिला शेतकऱ्याच्या तुरीचा एक लाख रुपयाचा चुकारा राज्य मार्केटिंग कार्यालयाच्या चुकीमुळे थेट कर्नाटकातील गुलबर्गा शाखेतील खात्यात वर्ग करण्यात आल्याने ऑनलाइन प्रणालीचा फटका रामपूरनगरच्या शेतकरी महिलेला बसला आहे.

श्रीरामपूर, जि. यवतमाळ  : महिला शेतकऱ्याच्या तुरीचा एक लाख रुपयाचा चुकारा राज्य मार्केटिंग कार्यालयाच्या चुकीमुळे थेट कर्नाटकातील गुलबर्गा शाखेतील खात्यात वर्ग करण्यात आल्याने ऑनलाइन प्रणालीचा फटका रामपूरनगरच्या शेतकरी महिलेला बसला आहे.

पुसद तालुक्‍यातील रामपूरनगर येथील महिला शेतकरी सुभद्राबाई विश्वनाथ आडे यांनी पुसद येथील खरेदी विक्री संघात सातबारा, आधार कार्ड, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखेचा आयएफएससी कोड नंबर, खाते नंबर यांचे पुरावे देऊन तूर विक्रीसाठी नोंदणी केली होती. नोंदणीनुसार सुभद्राबाई आडे यांनी २ मे ररोजी नाफेडला १८.२६ क्विंटल तूर ५४५० रुपये प्रमाणे ९९,५१७ रुपयांची तूर विक्री केली.

एक महिन्याचा कालावधी उलटला असला, तरी सदर तूर विक्रीची रक्कम खात्यात जमा न झाल्याने तुरीचे पैसे केव्हा येणार याची त्या वाट पाहत होत्या. ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या सोबत तूर विक्री केली होती, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार जून रोजी चुकारे जमा करण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली, परंतु आपल्या खात्यात पैसे का जमा झाले नाही याची चौकशी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात जाऊन केली असता सदर रक्कम कर्नाटकातील स्टेट बॅंक ऑफ सेलम शाखा गुलबर्गा येथील शाखेत मटपल्ली मीनाक्षी यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली.

चुकाऱ्याची रक्कम परराज्यांत वर्ग झाल्याने सदर महिलेला बॅंकेचे तसेच संस्थेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या संदर्भात महिला शेतकऱ्याने पुसद येथील स्टेट बॅंक शाखेला अर्जाद्वारे सदर रक्कम आपल्या मध्यवर्ती बॅंकेच्या खात्यात वळती करावी, अशी विनंती केली आहे. कर्नाटकात चुकीने वळती करण्यात आलेल्या खात्यातून ९ हजार रुपये काढले गेले असल्याची माहिती मिळाल्याने महिला शेतकऱ्याची पायाखालची वाळू सरकली आहे.

ही रक्कम पूर्ण काढली गेल्यास या प्रकाराला जबाबदार कोणाला धरावे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारात संबंधित सर्व यंत्रणा या महिला शेतकऱ्याला तिची रक्कम मिळवून देण्यास पुढाकार घेतील का, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...