agricultur news in marathi, bollworm awarness program today in school | Agrowon

प्रभात फेरीत आज गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत जनजागृती !
वृत्तसेवा
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त प्रत्येक शाळेत आज (ता.१७) आयोजित प्रभातफेरीत जिल्ह्यातील सर्व कृषी विक्रेते गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत जनजागृती करणार आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त प्रत्येक शाळेत आज (ता.१७) आयोजित प्रभातफेरीत जिल्ह्यातील सर्व कृषी विक्रेते गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत जनजागृती करणार आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्ह्याती सर्व कृषी निविष्ठा विक्रेते यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकात म्हटले आहे, की मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त प्रत्येक शाळेत आयोजित होणाऱ्या प्रभातफेरीमधे जिल्ह्यातील सर्व कृषी विक्रेत्यांनी सहभागी होऊन गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काच्या फवारणीचा, डोम कळी नष्ट करण्याचा व कीटकनशकाच्या सुरक्षित हाताळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत गावामध्ये जनजागृती करावी. जिल्ह्यातील बहुतांश बियाणे व कीटकनाशक कंपन्या साधारणतः दीडशे ते दोनशे गावांमध्ये आपले कर्मचारी पाठवीत असून इतर सर्व ही गावांमध्ये ज्या कृषी सेवा केंद्र जे गाव दत्तक दिले आहे, तेथे त्यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधून प्रभात फेरी मध्ये जनजागृती निर्माण करण्याचे कार्य करावे. यासाठी काही घोषणा (स्लोगन) तयार करण्यात आला असून स्लोगन प्रदर्शित करण्यासाठी फलकाचे CDR व PDF फाईल देण्यात आले असून आपणास नजीकच्या केंद्रावरून प्रिंट काढून शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करून देता येणार आहेत. या प्रभात फेऱ्या मध्ये सहभागी होऊन सोबत दिलेल्या डिझाईन मधील स्लोगन्स विद्यार्थ्यांकडे देऊन त्यांना उद्घोषित करण्यासाठी प्रवृत्त करावे व 
प्रभात फेरी समोर बॅनर व सुरक्षा किट घातलेला एक व्यक्ती ठेवावा म्हणजे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांमध्ये या सवयी बाबतची माहिती पोहोचेल व आपणास मोठा फरक समाजामध्ये दिसू शकेल, अशी आपेक्षा व्यक्त केली आहे. संबंधित तालुक्यातील गुणनियंत्रण निरीक्षक या मोहिमेचे नियंत्रण करणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...