agricultur news in marathi, farm road scheme status, washim, maharashtra | Agrowon

पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत वाशिममध्ये ४६१ प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

वाशीम  : पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४६१ प्रस्ताव दाखल झाले असून, कार्यवाही व नियोजनाच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समितीच्या सभेत चर्चा करण्यात अाली.

वाशीम  : पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४६१ प्रस्ताव दाखल झाले असून, कार्यवाही व नियोजनाच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समितीच्या सभेत चर्चा करण्यात अाली.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे आदी उपस्थित होते.

प्रत्येक शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्याकरिता पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबवली जात अाहे. याकरिता ग्रामपंचायतींकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीने हे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले आहेत.

या प्रस्तावांच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातून आतापर्यंत ४६१ प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झाले आहेत. शेत, पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. हे रस्ते झाल्यास पावसाळ्यात शेतकऱ्यांची होणारी गैरसोय थांबेल. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांसाठी संबंधित विभागांनी मिशन मोडवर काम करण्याची गरज असल्याचे या वेळी आमदार पाटणी म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...