agricultur news in marathi, farmers not get payment of tur and gram procurement, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगावमधील तूर, हरभरा उत्पादकांना चुकारे नाहीच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

जळगाव : जिल्ह्यात सुमारे ६८ हजार क्विंटल तूर आणि सुमारे ९० हजार क्विंटल हरभऱ्याची शासकीय केंद्रात खरेदी झाली असून, यातील सुमारे २५ टक्के तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे प्राप्त झालेले नसल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव : जिल्ह्यात सुमारे ६८ हजार क्विंटल तूर आणि सुमारे ९० हजार क्विंटल हरभऱ्याची शासकीय केंद्रात खरेदी झाली असून, यातील सुमारे २५ टक्के तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे प्राप्त झालेले नसल्याची माहिती मिळाली आहे.

हरभरा खरेदी मागील आठवड्यातच बंद झाली तर तूर खरेदी मागील महिन्यात बंद झाली. असे असतानाही शासकीय खरेदी केंद्रात तूर विक्री केलेल्या अनेक तूर उत्पादकांना चुकारे मिळालेले नाहीत. मार्केटिंग फेडरेशनच्या वरिष्ठ कार्यालयाकडून यासंदर्भात ठोस कार्यवाही होत नसल्याची माहिती आहे. तूर उत्पादकांची सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम अडकली आहे, तर हरभरा उत्पादकांची सुमारे अडीच कोटी रुपये रक्कम प्राप्त झालेली नाही.

संबंधित तूर किंवा हरभरा उत्पादक या चुकाऱ्यांसाठी तालुक्‍याच्या ठिकाणी शेतकी संघात जातात. परंतु, शेतकी संघाकडून समाधानकारक माहिती दिली जात नाही. जिल्ह्यात नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरू होते, तर १२ ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र संबंधित तालुक्‍यातील शेतकी संघांनी सुरू केले होते. तूर खरेदी बंद होऊन अनेक दिवस झाले तरी चुकारे कसे मिळत नाहीत, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

तुरीची ५४५० रुपये व हरभऱ्याची ४४०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी करण्यात आली. काही शेतकऱ्यांनी उशिरा तूर विक्री केली तरी त्यांचे चुकारे त्यांच्या बॅंक खात्यात आले आहेत. सध्या खरीप हंगामाचे दिवस आहेत. हाती पैसा हवा आहे. पीक कर्जही अनेक जणांना मिळालेले नाही. अशा स्थितीत तातडीने तूर व हरभऱ्याचे चुकारे मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. निम्म्या तूर व हरभरा उत्पादकांना चुकारे दिले आहेत. लवकरच त्यासंबंधी निधी आणखी मिळेल. त्याचे वाटप होईल, असे स्पष्टीकरण मार्केटिंग फेडरेशनने दिले आहे.

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...