पर्यावरणपूरक उपायातून पोल्ट्री उद्योगातील समस्यांवर मात
वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कॅनडा : येथील अंडी व त्यापासून पदार्थांचा वापर २०१० पासून वेगाने वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि अंडी उत्पादन हा उद्योग दरवर्षी एक अब्जापेक्षा अधिक नफा कमावणारा उद्योग ठरला आहे. अशा वेळी त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांचा वेध घेण्याचा व त्यातील समस्यांवर उत्तर शोधणारा अभ्यास पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ नॅथन पेल्लेटीअर यांनी केला आहे. त्याचे निष्कर्ष जर्नल ऑफ क्लीनर प्रोडक्शन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

कॅनडा : येथील अंडी व त्यापासून पदार्थांचा वापर २०१० पासून वेगाने वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री आणि अंडी उत्पादन हा उद्योग दरवर्षी एक अब्जापेक्षा अधिक नफा कमावणारा उद्योग ठरला आहे. अशा वेळी त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांचा वेध घेण्याचा व त्यातील समस्यांवर उत्तर शोधणारा अभ्यास पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ नॅथन पेल्लेटीअर यांनी केला आहे. त्याचे निष्कर्ष जर्नल ऑफ क्लीनर प्रोडक्शन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जगभरातील लोक सेंद्रिय आणि व्हेगान खाद्य पदार्थांकडे वळत आहे. अशा वेळी पोल्ट्रीमध्येही व्हेगान किंवा सेंद्रिय चिकन पशुखाद्य देऊन ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया’ येथील संशोधकांनी प्रयोग केले आहेत. या प्रकारच्या पशुखाद्यामुळे पर्यावरणावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकतो. येथील पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ नॅथन पेल्लेटीअर यांनी सांगितले, की कॅनडामध्ये लेअर पोल्ट्री उद्योगामध्ये सुमारे एक हजार प्रमाणित फार्म आहेत. ते ७० दशलक्ष टनापेक्षा अधिक अंडी उत्पादन करतात. अंडी उत्पादनाच्या संधी आणि आव्हानांचे व्यवस्थापन करण्यासाठी शाश्वत पद्धतीचा शोध सातत्याने घेतला जात आहे. त्यासाठी विविध निविष्ठांचा वाहतूक, ऊर्जा आणि उत्सर्जन अशा सर्व घटकांचा प्रामुख्याने विचार केला जातो.

पेल्लेटियर आणि सहकाऱ्यांनी केलेला हा अंडी आणि संबंधित उद्योगाचा पहिला राष्ट्रीय पातळीवरील अभ्यास आहे. पोल्ट्री उद्योगामध्ये शाश्वतता आणण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. पारंपरिक खाद्याच्या तुलनेमध्ये सेंद्रिय खाद्य, अप्राणीज खाद्य स्रोत यातून होणारे उत्सर्जन अत्यल्प आहे. या सर्व माहितीचा अवलंब करून वेबआधारित साधन विकसित करण्याचा प्रयत्न असून, शेतकऱ्यांनाही आपल्या फार्मनुसार ध्येय ठरवता येईल. स्रोतांचा वापर आणि मिथेन उत्सर्जनाची तीव्रता ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...