कुपोषणावर मात करण्यासाठी ‘न्यूट्रिशन गार्डन’
वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

केनिया येथील ओसेरियन फेअरट्रेड जॉइंट बॉडी या संस्थेने पोषकतेसाठी बाग ही संकल्पना राबवली आहे. त्यात सर्व कर्मचारी व कामगारांसाठी ताज्या व अधिक पोषक भाज्यांची लागवड या बागेमध्ये केली जाते.

केनिया येथील ओसेरियन फेअरट्रेड जॉइंट बॉडी या संस्थेने पोषकतेसाठी बाग ही संकल्पना राबवली आहे. त्यात सर्व कर्मचारी व कामगारांसाठी ताज्या व अधिक पोषक भाज्यांची लागवड या बागेमध्ये केली जाते.

आफ्रिकन देशांमध्ये सामान्यांच्या कुपोषणाची समस्या फार मोठी आहे. या समस्येवर मात करण्यासाठी पोषक घटकांची उपलब्धता वाढविण्याची आवश्यकता आहे. त्या दिशेने सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्यांही कार्यरत आहे. यामध्ये पुढाकार घेतला आहे, तो ओसेरियन फेअरट्रेड या फूल उत्पादक कंपनीने. त्याविषयी माहिती देताना न्यूट्रिशन गार्डन अधिकारी मेरी किनयुवा व डॉ. डॅनिअल वाट्टा यांनी सांगितले, की ओसेरियनमध्ये सुमारे ६० टक्के कामगार हे एचआयव्ही आणि एड्सग्रस्त आहेत. या लोकांसाठी रोजगारासोबतच पोषक आहार पुरविण्याचा प्राथमिक उद्देश या प्रकल्पामागे होता. यांना आठवड्यातून एकदा ताज्या भाज्या मोफत दिल्या जातात. पूर्वी उत्पादन कमी असताना केवळ रोगग्रस्तांसाठीच ही सुविधा दिली जात होती. मात्र, अलीकडे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी भाज्या उपलब्ध होतील, हे पाहिले जाते. या सर्व भाज्या कंपनीच्या एक एकर क्षेत्रामध्ये कामगार स्वतः पिकवतात. त्यामुळे भाज्यांच्या शेतीचे कौशल्यही त्यांच्यामध्ये विकसित होण्यास मदत होईल. त्याचा फायदा भविष्यामध्ये परसबागेमध्ये भाज्यांचे उत्पादन घेण्यासाठी होईल, अशी आशा आहे.

  • सध्या या बागेमध्ये प्रामुख्याने पालेभाज्या घेण्यात येतात. त्यासह ब्रोकोली, गाजर, मिरची, ढोबळी मिरची उत्पादन होते.
  • पुढील टप्प्यामध्ये प्रथिनांचा अधिक उपलब्धतेसाठी पोल्ट्री फार्म सुरू करण्याचाही मानस आहे.
  • या प्रकल्पासाठी १५ लाखांची गुंतवणूक केली असून, यातून मिळणारे उत्पादन सुमारे २५ लाखांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या उत्पन्नापेक्षाही कामगारांच्या आरोग्यांचे मोल मोठे आहे.

इतर बातम्या
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
उत्पादन, उत्पन्नवाढीसाठी गटशेतीची कास...देळेगव्हाण, जि. जालना  : शेती क्षेत्र घटत...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीनला '...परभणी : नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
लालकंधारी गोवंश संगोपनासाठी मिळाला...जळकोट, जि. लातूर ः गेल्या अनेक वर्षांपासून...
अनेक कीटकनाशकांवर जगात बंदी; भारतात...नागपूर : मोनाक्रोटोफॉस हे जहाल कीटकनाशक आहे....
संत्र्याचा पीकविमा कर्जखात्यात केला जमाअकोला : संत्रा पिकाच्या नुकसानीसाठी मिळालेली...