agriculturai stories in marathi, agro vision, sugarcane, ethenol production | Agrowon

ऊस, इथेनॉल उत्पादनात सुधारणा आवश्यक
वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

ब्राझील येथील साखर उद्योगाकडून इथेनॉलनिर्मिती वाढत असल्यामुळे संभाव्य जागतिक कर्बवायू उत्सर्जनामध्ये ५.६ टक्क्याने घट होऊ शकते, असे मत इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. परिणामी उसाच्या माध्यमातून जैवइंधनाची निर्मिती ही पर्यावरणपूरक ठरत असून, अन्य शेती हा मानव उपयोगी उर्वरित खाद्यपिकांसाठी वापरणे शक्य होईल. हा अहवाल ‘जर्नल नेचर क्लायमेट चेंज’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

ब्राझील येथील साखर उद्योगाकडून इथेनॉलनिर्मिती वाढत असल्यामुळे संभाव्य जागतिक कर्बवायू उत्सर्जनामध्ये ५.६ टक्क्याने घट होऊ शकते, असे मत इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. परिणामी उसाच्या माध्यमातून जैवइंधनाची निर्मिती ही पर्यावरणपूरक ठरत असून, अन्य शेती हा मानव उपयोगी उर्वरित खाद्यपिकांसाठी वापरणे शक्य होईल. हा अहवाल ‘जर्नल नेचर क्लायमेट चेंज’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

ब्राझीलमध्ये उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, त्यातून उपलब्ध होणाऱ्या साखरेइतकेच इथेनॉलही महत्त्वाचे आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ब्राझीलमध्ये अन्य पिकांच्या वाढीसाठी इथेनॉलनिर्मिती उपयुक्त ठरू शकते. सामान्य जमिनींचे ऊस शेतीमध्ये रूपांतर होण्यासाठी पर्यावरणाला कर्बवायू उत्सर्जनातून किंमत मोजावी लागते. या किमतीचे विश्लेषण इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. विविध प्रकारच्या माती, तापमान, पर्जन्यमान आणि अन्य विविध निकषांवर ऊस पिकाच्या वाढीचे गणित ठरत असते. यातील प्रत्येक घटकाचा अत्यंत काळजीपूर्वक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठातील संशोधक व प्रा. स्टिफन पी. लॉंग यांनी सांगितले. हा अभ्यास त्यांनी ब्राझील येथील युनिव्हर्सिटी ऑफ साओ पावलो येथील संशोधकांच्या सहकार्याने केला.

  • जगभरामध्ये बहुतांश मॉडेलमध्ये पिकांच्या भविष्यात उत्पादनावर भर दिलेला असतो. त्यामध्ये संख्याशास्त्रीय माहितीचा वापर करून पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि तापमानाचे उसासारख्या पिकावर होणारे परिणाम पाहण्यात येतात. मात्र, या संशोधकांनी यांत्रिक मॉडेलच्या साह्याने पिकातील प्रत्येक तासाच्या माहितीसह त्या काळातील विविध घटकांचा आढावा घेतला.
  • ब्राझील सरकारने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या व शेती, उद्योग आणि अन्य विकासाठी वापरणे शक्य नसलेल्या जमिनीचे सर्वेक्षण केले आहे. त्यामुळे कायदेशीररीत्या ऊस शेतीखाली आणणे शक्य अशलेल्या जमिनीमध्ये संभाव्य ऊस उत्पादनाचे नियोजन करण्यात येत आहे.
  • वास्तविक पाहता ब्राझीलमध्ये आधीच ऊस ते इथेनॉल हा उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला व स्थिरावला आहे. बहुतांश ऊस उत्पादन हे इथेनॉलनिर्मितीसाठी वापरले जाते. या प्रक्रियेमध्ये बगॅस जाळूनच आवश्यक ती ऊर्जा मिळवली जाते. उर्वरित उष्णता ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये केले जाते. याऐवजी बगॅस ते इथनॉल हे रूपांतर आर्थिकदृष्ट्या परवडणारे असल्याचे संशोधिका अॅमॅन्डा डी सोझा यांनी सांगितले.

अभ्यासातील महत्त्वाचे मुद्दे ः

  • मक्यापासून इथेनॉलनिर्मितीच्या तुलनेमध्ये उसापासून इथेनॉल हे स्वस्त असून, त्याते केवळ १४ टक्के कार्बन डायऑक्साईड तयार होतो. ब्राझीलमध्ये बहुतांश कार या द्वि इंधन पद्धतीच्या असून,त्यात इथेनॉल, गॅसोलीन किंवा त्यांच्या मिश्रणाचा वापर होतो. २०१२ पासून ब्राझील सर्व गॅस स्टेशनवर गॅसोलीनच्या तुलनेमध्ये इथेनॉल विक्रीचे प्रमाण अधिक आहे.
  • येत्या काही वर्षांमध्ये या उद्योगामध्ये विस्तार होण्याची शक्यता गृहित धरल्यास भविष्यात ऊस उत्पादनामध्ये ३७५ लाख हेक्टरपासून वाढ होऊन ११६० लाख हेक्टरपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
  • अशीच स्थिती अमेरिकेमध्ये मका आणि सोयाबीन पिकांमध्ये दिसून येईल. अमेरिकेमध्ये ९०० लाख हेक्टर क्षेत्रा या पिकाखाली असेल.
  • डिसेंबर २०१५ च्या पॅरीस हवामान करारानुसार १९६ देशांनी जागतिक तापमानामध्ये २ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे कर्बवायूंच्या उत्सर्जनामध्ये घट करण्यासाठी जैवइंधन निर्मितीसह विविध प्रक्रियांमध्ये सातत्याने सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.

इतर अॅग्रोमनी
गहू, हरभऱ्याच्या भावात घटया सप्ताहात कापसाचे व साखरेचे भाव वाढले इतर...
द्राक्ष बागेतील भुरीनियंत्रणाकडे...येत्या आठवड्यामध्ये सर्व द्राक्ष विभागामध्ये...
भारतात भुईमूग उत्पादन सात दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः पीक क्षेत्रात झालेली वाढ अाणि...
बटाट्यातील शर्करेचे प्रमाण तपासण्याची...सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने...
ब्रॉयलर्सचा बाजार किफायती राहण्याचे...पुणे ः किरकोळ व संस्थात्मक मागणीचा भक्कम आधार आणि...
साखर उत्पादन ३९ लाख टनांवर नवी दिल्ली  ः देशात ऊस गाळप हंगामाने वेग...
हरभऱ्यात नरमाईचा कलयंदा हरभरा उत्पादनात अपेक्षित मोठी वाढ, शिल्लक...
गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींचा...या सप्ताहात कापसाचे व सोयाबीनचे भाव वाढले,...
ब्रॉयलर्सच्या दरात सुधारणा,...पुणे : रविवारी (ता. २६) बेंचमार्क नाशिक विभागात...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
कापूस, मका, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात...गेल्या सप्ताहात कापूस, सोयाबीन, हळद व गवार बी...
हरभरा, मसुरीवर अायात शुल्क लागू होणारमुंबई ः पिवळ्या वाटाण्यावर ५० टक्के अायात शुल्क...
वाढत्या मागणीमुळे अंड्यांच्या दरात वाढ नवी दिल्ली : वाढत्या मागणीचा पुरवठ्यावर परिणाम...
दीड महिन्यात तेरा लाख टन साखर उत्पादन नवी दिल्ली ः देशातील बहुतांश साखर कारखान्यांनी...
मार्चअखेर पाच लाख टन कडधान्य वितरित...कें द्र सरकारने मार्च २०१८ अखेरपर्यंत संरक्षित...
वाढत्या पुरवठ्यामुळे ब्रॉयलर्सचा बाजार... सध्या ब्रॉयलर्स पक्ष्यांना थंडीमुळे जोरदार...
शेती, अन्नपुरवठा साखळीत ५००० कोटींची...स्वित्झर्लंडस्थित पायोनियरिंग व्हेंचर्स फंडने...
सोयाबीनमधील मंदीची कारणेजगात सलग तिसऱ्या वर्षी सोयाबीनचे उच्चांकी उत्पादन...
चांगल्या सवयीचे गुलाम व्हामित्रांनो, तुमच्या मनाची शक्ती वापरून तुम्ही...