agriculturai stories in marathi, agro vosion, climate change ob honey bees | Agrowon

वातावरणबदलाचा कॉफी, मधमाश्यांवरील परिणामांचा होतोय अभ्यास
वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

वाढत्या तापमानामुळे येत्या २०५० पर्यंत लॅटीन अमेरिका कॉफी उत्पादक पट्ट्यामध्ये सुमारे ७३ ते ८८ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. यामागील कारणांचा शोध स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इस्टिट्यूट येथील संशोधक घेत आहेत. त्यात थंड वातावरणामध्ये तग धरू शकणाऱ्या मधमाश्यांची विविधता वाढत्या तापमानामुळे कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वाढत्या तापमानामुळे येत्या २०५० पर्यंत लॅटीन अमेरिका कॉफी उत्पादक पट्ट्यामध्ये सुमारे ७३ ते ८८ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. यामागील कारणांचा शोध स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इस्टिट्यूट येथील संशोधक घेत आहेत. त्यात थंड वातावरणामध्ये तग धरू शकणाऱ्या मधमाश्यांची विविधता वाढत्या तापमानामुळे कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत असलेल्या तापमानाचा फटका वनस्पती आणि प्राण्यांना (विशेषतः लहान कीटक) बसण्याची शक्यता आहे. त्याविषयी संशोधक सातत्याने अंदाज मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये प्रदेशनिहाय पिके आणि त्यांच्या परागीकरणासाठी आवश्यक कीटक (मधमाश्या) यावर भर दिला जात आहे. त्याविषयी माहिती देताना संशोधक डेव्हिड रौबिक यांनी सांगितले, की वनस्पती आणि प्राणी (विशेषतः मधमाश्या) यांच्या भविष्याबाबत अंदाज मिळविण्यात येत आहेत. त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांचा वेध घेण्याची क्षमता पारंपरिक प्रारूपामध्ये नाही. त्यामुळे लॅटीन अमेरिकेतील कॉफी उत्पादक प्रदेशामध्ये होत असलेल्या तापमानवाढीच्या परिणामांचा अभ्यास करण्यात येत आहे.  या अभ्यास गटामध्ये पनामा येथील स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इस्टिट्यूट आणि  व्हियतनाम येथील आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय कृषी केंद्र, कोस्टा रिका येथील कृषी संशोधन आणि उच्चशिक्षण संस्था यासह व्हर्मोंट विद्यापीठ, अमेरिका, फ्रान्स आणि पेरू येथील संशोधन संस्था एकत्र आल्या आहेत.

मधमाश्यांच्या विविधतेत होईल घट

  • वाढत्या तापमानामुळे थंड हवामानातील अनेक मधमाश्यांच्या जाती नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीमध्ये कॉपी उत्पादक पट्ट्यामध्ये किमान पाच प्रजाती शिल्लक राहतील. उर्वरित प्रदेशामध्ये किमान दहा प्रजाती शिल्लक राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
  • मधमाश्यांची संख्या कमी झाली तरी या प्रदेशामध्ये कॉफी उत्पादन सुरू राहील, त्यामुळे मधमाश्यांसाठी योग्य रहिवास आणि स्थानिक मधमाशी प्रजातींचे संवर्धन याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
  • अनेक कॉफी प्रकारांसाठी मोठ्या झाडांची सावली आवश्यक असते. या झाडांची निवड करताना मधमाश्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यातून दोघांसाठी लाभदायक धोरण आखणे शक्य होईल.

मधमाश्यांच्या काही प्रजाती नक्कीच तग धरतील...

याविषयी माहिती देताना रौबिक यांनी ब्राझीलमध्ये सोडण्यात आलेल्या आफ्रिकन मधमाश्यांचे (१९५७) उदाहरण दिले. या मधमाश्या अधिक काळ तग धरणार नाहीत, असा बहुतेक शास्त्रज्ञांचा अंदाज होता. मात्र, या मधमाश्यांनी चांगल्या प्रकारे तग धरला आहे. पश्चिम गोलार्धातील आफ्रिकन मधमाश्या या त्यांच्या वसाहत आणि शरीराचे तापमान पाण्याच्या साह्याने नियंत्रित करतात, त्यामुळे तापमानामध्ये होणाऱ्या वाढीला (पूर्णपणे दुष्काळी वातावरण वगळता) चांगल्या प्रकारे सामोऱ्या जाऊ शकतील, असे वाटते.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याचा रोष पाहून सदाभाऊ खोत बसले...औरंगाबाद : कर्जमाफी अर्ज ऑनलाईन, बोंडअळी लागण...
ऊस दरासाठी सुकाणू समितीचे अगस्ती...अकोले : उसाला पहिली उचल ३५०० मिळावी, या मागणीसाठी...
कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची पूर्णत...वर्धा : सरसकट कर्जमाफीच्या नावावर सरकारने...
साताऱ्यात २१७५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर... सातारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
सोलापुरात ऊसदराची बैठक पुन्हा फिसकटलीसोलापूर : ऊसदर ठरविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ....
कृषिपंप बिल न भरण्यावर शेतकरी ठाम जळगाव  ः कृषिपंपांच्या थकीत वीज बिलातील...
'बोंडअळीग्रस्तांना ५० हजार भरपाई द्या'अकोला : जिल्ह्यासह संपूर्ण कापूस पट्ट्यात या...
बोंडअळीने नुकसाग्रस्त कापूस उत्पादकांना...यवतमाळ : बीटी कापसावर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने...
कोपर्डी प्रकरणातील तिनही आरोपी दोषी नगर : कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार व तिचा...
निर्यात सुविधा केंद्रासाठी पणनला १५ एकर...पुणे : महाराष्ट्रातून शेतमाल निर्यातीला अधिक...
सहकारमंत्र्यांच्या घरासमोर प्रहारचे...सोलापूर ः ऊसदराच्या प्रश्‍नाकडे गांधीगिरी करत...
सांगली जिल्ह्यातील गुऱ्हाळमालक आर्थिक... सांगली ः शिराळा तालुक्‍याची गूळ उत्पादक तालुका...
नाशिक महापालिकेसाठी 'गंगापूर'चे पाणी...नाशिक : नाशिक महापालिकेने केलेल्या वाढीव पाणी...
पीक अवशेषाची होणार खरेदी नवी दिल्ली ः पीक अवशेष शेतात जाळल्याने प्रदूषण...
नाशवंत भाजीपाला, फळे उपाययोजना समितीची...सोलापूर : राज्य शासनाने स्थापन केलेल्या नाशवंत...
शाश्वत शेतीसाठी पीक विविधतेसह... विशाखापट्टणम, अांध्र प्रदेश ः शेती क्षेत्राला...
संत्रा फळगळीच्या सर्वेक्षणाचे आदेशअमरावती : आंबीया बहारातील संत्र्याच्या फळगळतीमुळे...
रिमोट सेन्सिंग तंत्राने जंगलाचे...जंगली पर्यावरणातील उत्पादकता आणि स्थिरता ही...
नगदी पिकांच्या क्षेत्रवाढीतून...पुणे : ‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी अन्नधान्य...
जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण...सोलापूर : जलयुक्त शिवार अभियानामुळे ग्रामीण भागात...