agriculturai stories in marathi, agrowon, agralekh on INCRESED CHAMICALS & FERTILISER PRICES | Agrowon

खतांचा संतुलित वापर - चांगला पर्याय
विजय सुकळकर
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

वाढलेले खतांचे दर प्रतिबॅग कमी वाटत असले, तरी राज्यातील या खतांचा एकूण वापर पाहता येत्या खरीप हंगामात कोट्यवधी रुपयांचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे.

निविष्ठांच्या किमती भरमसाट वाढलेल्या आहेत. त्यातच एेन खरिपाच्या तोंडावर आता संयुक्त खतांच्या किमती प्रति ५० किलो बॅग ६३ ते १३४ रुपयांनी वाढविल्या आहेत. वाढलेले खतांचे दर प्रतिबॅग कमी वाटत असले तरी राज्यातील या खतांचा एकूण वापर पाहता येत्या खरीप हंगामात कोट्यवधी रुपयांचा बोजा शेतकऱ्यांवर पडणार आहे. खतनिर्मितीसाठी लागणाऱ्या घटकांचे दर वाढले आहेत. बहुतांश रासायनिक खते आपल्याला आयात करावी लागतात. त्यावर आयातकरही आहे. त्यातच वाढीव जीएसटीमुळे खतांचे दर वाढलेले आहेत, असे कंपन्या सांगतात.

निविष्ठांवरील वाढता खर्च पाहता त्यांचे दर कमी ठेवणे गरजेचे असताना ते सातत्याने वाढत आहेत. याचा विचार करून कर कमी करून शासन रासायनिक खतांचे दर नियंत्रित ठेवू शकते. रासायनिक खतांचा संतुलित वापर व्हायला हवा, असेही शासनाचे धोरण पाहिजे. खतांच्या किमतीतील मोठ्या तफावतीमुळे त्यांचा असंतुलित वापर होतो. अशावेळी ही तफावत कमी होणे अपेक्षित असताना ती कशी वाढेल असेच धोरण राबविले जात आहे. नत्र:स्फुरद:पालाश यांच्या आदर्श वापराचे प्रमाण ४:२:१:१ असे असताना युरिया स्वस्त मिळतो म्हणून हे प्रमाण ८:३:१:० असे झाले आहे.

आता संयुक्त खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांकडून युरियाचाच वापर अधिक होऊ शकतो. असे करण्याएेवजी शेतकऱ्यांनी सरळ खतांचे मिश्रण करून संयुक्त खतांच्या प्रमाणात पिकांना अन्नद्रव्ये दिली तर या वाढीव खर्चावर मात करता येऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे रासायनिक खतांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केल्यास संयुक्त खतांची द्यावयाची मात्रा कमी करता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांसोबत किमान १ : २ या प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच दिलेल्या खतांमधून अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यासाठी आणि जमिनीतील अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात मिळण्यासाठी जैविक खतांचा वापर करणेही आवश्यक आहे. सर्वच प्रकारच्या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्यासाठी रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, ॲसिटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी सूक्ष्म अन्नद्रव्ये विरघळविणारे जीवाणू यांचा वापर पीक लागवडीपासून बीजप्रक्रियेच्या स्वरूपात तसेच पिकांच्या वाढीव अवस्थेत ठिबक सिंचनाद्वारे किंवा आळवणी पद्धतीने शेतकऱ्यांनी करायला हवा.

आज बाजारात विद्राव्ये खतेदेखील भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर विशेषतः पीक वाढीच्या संवेदनशील अवस्थेत केल्यास जमिनीद्वारे द्यावयाची रासायनिक खतांची मात्रा कमी होऊ शकते. याद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल. तसेच वाढलेल्या खतांच्या किमतीचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर होणार नाही. रासायनिक सरळ खतांसोबत विविध प्रकारच्या पेंडीचा व शेतातील तयार कंपोस्टचा वापर केल्यास रासायनिक खताची मात्रा कमी करता येते. एकंदरीत एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन हा एक चांगला पर्याय उपलब्ध अाहे. यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी संबंधित शासकीय-अशासकीय संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. येणाऱ्या हंगामात वाढीव किमतीचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होऊ नये म्हणून सर्व स्तरावर प्रयत्न होणेही आवश्यक आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरमध्ये हिमकणांची चादरमहाबळेश्वर, जि. सातारा  ः राज्यात सर्वत्र...
‘एल निनो’चा यंदा माॅन्सूनला धोका नाहीपुणे ः प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ सप्टेंबर...
मध्य महाराष्ट्र, काेकणात हलक्या पावसाचा...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
भारत हवामान बदलाला सर्वांत संवेदनशीललंडन ः भारत हा जागातील सर्वांत जास्त हवामान...
‘अविश्वास’ला विश्वास ठरावाने उत्तरमुंबई : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे...
सरकारने लोकशाहीचा खून केला : विरोधकांचा...मुंबई : विधानसभा अध्यक्षांविरोधात प्रस्ताव दाखल...
लोकपाल, हमीभावासाठी अण्णांचा रामलीलावर...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत आश्वासन देऊनही मोदी...
बहुविध पिके, तंत्रज्ञान यांचा सुरेख...मुंबईतील चांगली नोकरी सोडून शेतीतच प्रगती करायची...
परस्परांची साथ लाभली,प्रगतीची दारे खुली...लातूर जिल्ह्यातील जवळा (बु.) व्हाया बोरगाव येथील...
नारळाच्या झावळ्यांपासून खतनारळ झाडास महिन्याला एक नवीन पान (झावळी) येत असते...
मध्य महाराष्ट्रात उद्या तुरळक ठिकाणी...पुणे : मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकचा दक्षिण भाग या...
राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल १०००...पुण्यात प्रतिक्विंटल १५०० ते ३५०० रुपये पुणे ः...
यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेतील...परभणी : जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य...
‘कमी दाबक्षेत्रा’च्या पूर्वानुमानात...पुणे : कमी दाबक्षेत्राचे हवामान अंदाजात...
बोंड अळीच्या नुकसानभरपाईपासून शेतकरी...नगर : बोंड अळीमुळे ८० ते ९० टक्के नुकसान झाले....
तूर खरेदीसाठी लाच घेणाऱ्या ग्रेडरला अटकहिंगोली ः कळमनुरी (जि. हिंगोली) येथील कृषी...
तूर, हरभरा हमीभाव खरेदीतील अपयशावरून...मुंबई : हमीभावाने शेतीमालाच्या खरेदीतील सरकारी...
हरभऱ्याला सात टक्के निर्यात प्रोत्साहननवी दिल्ली : हमीभावाच्या खाली असलेल्या...
शेतकऱ्यांसाठीची पहिली औद्योगिक वसाहत...मुंबई : शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत...
कृषिपंपांच्या कनेक्शन तोडणीला स्थगिती...मुंबई: राज्यभरातील शेतकऱ्यांचा रोष आणि...