agriculturai stories in marathi, agrowon, agro money, arth katha, small scle farmer Bhalme's 108 acre farm on rent | Agrowon

अल्पभूधारक भलमे यांची 108 एकर शेती !
विनोद इंगोले
सोमवार, 15 जानेवारी 2018

चंद्रपूर जिल्ह्यातील चारगाव (धरण) (ता. वरोरा) येथील मधुकर भलमे यांनी अल्पभूधारक असतानाही आपल्या उत्तम आर्थिक नियोजनातून यशाचे शिखर गाठले आहे. तुरीसारख्या कोरडवाहू मानल्या जाणाऱ्या पिकाची 108 एकर क्षेत्रावर लागवड करीत, उत्तम नफा मिळविण्याचे मजूरविरहित तंत्रज्ञान विकसित केले आहे.

वाटणीनंतर केवळ दोन एकर शेती हाती आल्यावर एखादा नशिबाला दोष देत रडगाणे गात बसला असता. मात्र चारगाव (धरण) (ता. वरोरा) येथील मधुकर भलमे यांनी परिसरातील पडीक जमिनी भाड्याने घेत त्यावर मार्ग काढला. कोरडवाहू भागाच्या मर्यादा व पाण्याची उपलब्धता विचारात घेत, त्यात तूर लागवडीचा पॅटर्न राबविला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चारगाव (धरण) (ता. वरोरा) येथील मधुकर भलमे यांनी अल्पभूधारक असतानाही आपल्या उत्तम आर्थिक नियोजनातून यशाचे शिखर गाठले आहे. तुरीसारख्या कोरडवाहू मानल्या जाणाऱ्या पिकाची 108 एकर क्षेत्रावर लागवड करीत, उत्तम नफा मिळविण्याचे मजूरविरहित तंत्रज्ञान विकसित केले आहे.

वाटणीनंतर केवळ दोन एकर शेती हाती आल्यावर एखादा नशिबाला दोष देत रडगाणे गात बसला असता. मात्र चारगाव (धरण) (ता. वरोरा) येथील मधुकर भलमे यांनी परिसरातील पडीक जमिनी भाड्याने घेत त्यावर मार्ग काढला. कोरडवाहू भागाच्या मर्यादा व पाण्याची उपलब्धता विचारात घेत, त्यात तूर लागवडीचा पॅटर्न राबविला आहे.

सुरवातीपासूनच धडपड्या असा स्वभाव असल्याने मधुकर यांनी अनेक व्यवसाय केले. त्यात गावामध्ये पीठ गिरणी चालविणे (12 वर्षे), वेल्डिंग व सायकल दुरुस्ती (10 वर्षे), मधमाशीपालन (7 वर्षे) यांचा समावेश होता. काही अडचणी व घरगुती विभाजनामुळे हे व्यवसाय त्यांना सोडावे लागले, तरी त्यातून त्यांचा आत्मविश्‍वास वाढतच गेला. कष्टाला योग्य दिशा दिली, तर अशक्‍य काहीच नाही, हे त्यांच्या लक्षात आले.

काही वेगळे हवे...
कोणताही व्यवसाय करायचा, तर भांडवल हवेच! तिथेच बहुतांशी व्यवसायाच्या गाड्यांना खीळ बसते. मधमाशीपालनाचा व्यवसाय करण्यासाठी प्रचंड धडपड करत, सहा लाख 10 हजारांचे कर्ज बॅंकेकडून मिळविले. खादी ग्रामोद्योग मंडळ, चंद्रपूर यांच्याकडून 30 टक्‍के अनुदानावर 100 मधपेट्यांची उचल केली. उत्तम फुलोरा असलेल्या परिसरामध्ये एका मधपेटीतून वर्षाकाठी 30 ते 35 किलो मध मिळतो. स्वतः पॅकिंग करून विक्री केल्यास त्याला 180 ते 190 रुपये प्रति किलो दर मिळतो, तर खादी ग्रामोद्योग वा अन्य कंपन्यांना ठोक विक्री केल्यास 120 रुपये प्रति किलो दर मिळतो. सुमारे सात वर्षे व्यवसाय केला. कालांतराने मधमाश्‍यांचे स्थलांतरण आणि मध गोठण्याच्या कारणांमुळे त्यांनी मधपेट्यांची संख्या कमी केली. शेतीच्या विकासावरच अधिक भर देण्यास सुरवात केली.

108 एकरांवर तूर लागवडीचा भन्नाट प्रयोग

 • केवळ दोन एकर शेतीमधून भागणार नाही, हे मधुकर यांच्या लक्षात आले. मग परिसरातील संपूर्ण पडीक असलेल्या शेती पाच ते सात वर्षे कालावधीसाठी कराराने घेण्यास सुरवात केली. 2012 -13 मध्ये 10 एकरापासून सुरवात करून, हळूहळू ते 108 एकरापर्यंत पोचले आहेत. पडीक जमिनी तुलनेने स्वस्तामध्ये मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
 • सिंचनासाठी पाच वेगवेगळ्या शेतीमध्ये शेततळी घेतली असून, लाभार्थी हिश्‍श्‍याचा भरणाही स्वतः केला. पावसाचे पाणी साठविल्याने पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी देणे शक्‍य होते. पर्यायाने उत्पादनामध्ये तीन ते चार क्विंटलपर्यंत वाढ मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी केलेले उपाय

 • तुरीचे बियाणे ते घरचेच वापरतात.
 • ट्रॅक्‍टर फिरवता येईल, अशा प्रकारे लावगड ः तीन फूट रुंद गादीवाफ्यावर जोड ओळ पद्धतीने लागवड करतात. दोन बेडमधील अंतर 10 फूट ठेवतात.
 • तुरीचे पीक हे 185 ते 190 दिवस कालावधीचे आहे. त्यात मुगाचे आंतरपीक ते घेतात. त्यातून तुरीचा उत्पादन खर्च बऱ्यापैकी वसूल होतो.
 • तुरीचा उत्पादन खर्च एकरी 8 ते 9 हजार रुपये असतो.
 • गेल्या वर्षी कोरडवाहू 60 एकरामधून 500 क्विंटल तूर उत्पादन मिळाले असून, त्याला 4 हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. त्याच प्रमाणे उर्वरित 40 एकरांमध्ये हरभऱ्याची लागवड केली होती, त्यापासून 150 क्विंटल उत्पादन मिळाले व त्याला 5 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
 • या वर्षी शेततळ्यासह सिंचनाची सुविधा केली असल्याने उत्पादनामध्ये वाढ होणार आहे.

मजूरविरहित शेतीचा पॅटर्न...

 • भाडेपट्ट्यावरील मोठ्या शेतीची मशागतीसाठी यांत्रिकीकरण मदतीला आले. त्यांच्याकडे तीन ट्रॅक्‍टरसह पेरणीयंत्र, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, बेड मेकर, पंजी अशी आवश्‍यक ट्रॅक्‍टरचलित अवजारे आहेत. त्याद्वारे मजुरांवरील अवलंबित्व कमी केले आहे.
 • संपूर्ण पिकाचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे, यासाठी 60 एकर क्षेत्रासाठी सौर कुंपण लावले आहे. त्यासाठी 1 लाख रुपये खर्च आला.
 • इतक्‍या मोठ्या क्षेत्रावरील शेतीचे व्यवस्थापन केवळ दोन मजुरांच्या साह्याने एकट्याला शक्‍य होत असल्याचे मधुकर यांनी सांगितले.

शेती नव्हे प्रयोगशाळा!
1) सहा फुटांची कोथिंबीर ः
कमी कालावधीचे पीक म्हणून कोथिंबिरीची लागवड मधुकर करत. त्या वेळीही उत्तम बीज धरत निवड पद्धतीने कोथिंबिरीचे वाण मिळविले होते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे सहा फुटांपर्यंत वाढते. या कोथिंबिरीची विक्री चंद्रपूर, वरोरा व शेगाव येथील आठवडी बाजारात ते करतात. परंतु स्थानिक बाजारात इतक्‍या उंच कोथिंबिरीला मागणी नसल्याने अलीकडे कापून, त्याची जुडी बांधून विकावी लागते. मात्र हॉटेल व्यावसायिकांसाठी उत्तम ठरू शकते. ही सहा फुटी कोथिंबीर शेती पाहण्यासाठी अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची रीघ लागली होती. या कोथिंबिरीमुळे त्यांची राष्ट्रपती कार्यालयानेही दखल घेतली. 23 मार्च 2007 रोजी माजी राष्ट्रपती (कै.) ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी संवाद साधलेल्या 20 प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये मधुकर भलमे यांचा समावेश होता. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अंतर्भाव होण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे एक पथक चारगावला पाठविले. मात्र पत्रव्यवहाराव्यतिरिक्त अद्याप पुढे काहीच कार्यवाही न झाल्याची खंत ते बोलून दाखवतात.

2) तुरीची "वंदना' जात ः
निवड पद्धतीने बियाणे मिळवत राहण्याची मधुकर यांना सवय आहे. त्यातूनच तुरीची वंदना ही जात तयार केली आहे. अगदी कोरडवाहूमध्येही सरासरी 15 क्विंटरपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता असल्याचा दावा मधुकर करतात.

बांधावरील सागवानाने वाढविली पत
मधुकर यांनी शेतीतील कष्टाचे प्रमाण कमी करण्यासाठी ट्रॅक्‍टर खरेदीचा घाट घातला. आधीच मधमाशीपालनासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा शेतीवर असल्याने कोणतीही बॅंक त्यांना दारात उभे करेना. त्याच वेळी त्यांना आपल्या शेतीच्या बांधावरील सागवानांची आठवण झाली. स्वतःच्या दोन एकर आणि आईवडिलांच्या दीड एकर शेताच्या बांधावर 1989-90 मध्ये सागवानाची 150 झाडे लावली होती. त्याचे मूल्य बॅंकेला समाजावून सांगितल्यानंतर ट्रॅक्‍टर खरेदीकरीताही चार लाख रुपये कर्ज मंजूर झाले. अर्थात, पूर्वीच्या कर्जाचे वेळेवर हप्ते भरणेही पत वाढविण्यासाठी कारणीभूत ठरले होते. या दोन्ही कर्जाची नियमित कर्जफेडही त्यांनी मुदतीत केली आहे.

प्रयोगशीलतेचा गौरव
शेतीमध्ये नवनवे प्रयोग राबविणाऱ्या मधुकर भलमे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

 • 2003 ः शेतीनिष्ठ शेतकरी
 • 2005 ः राज्य पातळीवरील पीकस्पर्धेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविला. त्यांनी एका हेक्‍टर क्षेत्रात 37 क्‍विंटल 810 ग्रॅम सोयाबीनचे उत्पादन घेतले होते.
 •  2008 ः कृषिभूषण पुरस्कार व सह्याद्री वाहिनीचा "सह्याद्री कृषी सन्मान' पुरस्कारही याच वर्षी मिळाला.
 • 2009 ः आकाशवाणी, नवी दिल्ली यांच्या वतीने पहिल्या दहा शेतकऱ्यामध्ये त्यांचा समावेश केला.
 • यासह अनेक स्थानिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

संपर्क ः मधुकर भलमे, 9420080887

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
किमान आधारभूत किमती कशा ठरवल्या जातात ? केंद्र सरकार दरवर्षी प्रमुख पिकांच्या किमान...
हमीभावाने साखर खरेदीसाठी हवी तरतूदराज्यातील साखर कारखान्यांमध्ये लाखो टन पोती साखर...
अर्थसंकल्प समजून घेताना..अर्थसंकल्प म्हणजे सरकारने आगामी आर्थिक वर्षातील...
कर, अनुदान, उत्पादन दर्जा या बाबींमध्ये...सूक्ष्मसिंचन प्रणालीने शेती उत्पादनात पर्यायाने...
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारला यावी...गाव विकासाचा आराखडा करताना पाणी केंद्रस्थानी...
शेतकरी उत्पादक संघांना 'स्टार्टअप'चा...राज्यातील शेतकरी उत्पादक संघांना स्टार्टअप...
मुबलक वीज; पण यंत्रणा अद्ययावत नाहीशेतकऱ्यांच्या दृष्टीने शासनाने जाहीर केलेल्या...
ग्रामविकासच्या अार्थिक तरतुदींत वाढ...राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात ग्रामविकास विभागाचा...
सहकारातील त्रिस्तरीय बॅंकिंग व्यवस्थेला...राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची...
अवजार उद्योगाला अर्थसंकल्पात प्रोत्साहन...अवजार क्षेत्राबाबत अनेक महिन्यांपासून शासन...
दुग्ध व्यवसायासाठी हवा स्वतंत्र निधीगेल्या वर्षभरात दूध व्यवसाय मोठ्या संकटाला तोंड...
‘पोल्ट्री’च्या वाढीसाठी हवे ठोस सरकारी...दुष्काळी भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना उद्योजकतेची...
पीकसंरक्षणातील खर्च कमी करायला हवायवतवाळ जिल्ह्यात कीडनाशक विषबाधेची जी गंभीर घटना...
राज्याचाही पिकांना दीडपट हमीभाव?मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील...
केवळ विदर्भातच थंडीपुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे....
शेतीमाल मूल्यसाखळी मजबुतीसाठी ठोस धोरण...शेतीमालाचे उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि...
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...