agriculturai stories in marathi, agrowon, agro vision, Healthy soil lifts animal weight | Agrowon

आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजन
वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

चराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन केल्यास जनावरांची वाढ आणि आरोग्य दोन्हीसाठी फायदा होत असल्याचे इंग्लंड येथील रोथमस्टेट संशोधन संस्थेतील संशोधकांना आढळले आहे. थोडक्यात, पशुधनाचे आरोग्य हे मातीच्या आरोग्याशी, कुरणाच्या मूल्याशी जोडलेले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल अॅनिमल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

चराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन केल्यास जनावरांची वाढ आणि आरोग्य दोन्हीसाठी फायदा होत असल्याचे इंग्लंड येथील रोथमस्टेट संशोधन संस्थेतील संशोधकांना आढळले आहे. थोडक्यात, पशुधनाचे आरोग्य हे मातीच्या आरोग्याशी, कुरणाच्या मूल्याशी जोडलेले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल अॅनिमल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

इंग्लंड येथील रोथमस्टेट संशोधन संस्थेतील आंतर विद्याशाखीय १३ शास्त्रज्ञ आणि दोन विद्यार्थी यांच्या गटाने पशुधन असलेल्या शेतीवर कितपत कार्यक्षम अन्नद्रव्याचे व्यवस्थापन होते, याचा अभ्यास केला. प्रत्येक शेतनिहाय मातीचे आरोग्याची सांगड या अभ्यासात जनावरांच्या वजनाशी घालण्यात आली. त्यासाठी चराईच्या प्रत्येक क्षेत्राने जनावरांच्या वाढीमध्ये घातलेली भर मोजण्याची नवीन पद्धत विकसित केली आहे.

कृषी अर्थशास्त्र तज्ज्ञ तारो ताकाहाशी यांनी सांगितले, की व्यावसायिक पशुधन उत्पादकांची उत्पादकता वाढण्यासाठी कुरणामध्ये जनावरांच्या चराईच्या पॅटर्नमध्ये सातत्याने बदल करणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. त्याचा फायदा त्या कुरणांनाही होतो. पशुपालनासह असलेल्या वेगळ्या शेतीतील उत्पादन हे सामान्य शेतीच्या उत्पादनापेक्षा अधिक असल्याचे पुढे आले आहे. जनावरांच्या चराईमुळे मातीच्या आरोग्यामध्ये पडत असलेल्या फरकाचा हा परिणाम आहे. त्याच प्रमाणे अन्य पर्यायी तंत्रज्ञानाप्रमाणे वेगळी भांडवली गुंतवणूकही लागत नाही.

एका शेतातून दुसऱ्या शेतीमध्ये चरण्यासाठी जनावरे नेण्याची पद्धत इंग्लंडमध्ये राबवली जाते. त्यामुळे जनावरांना संपूर्ण हंगामात ताजा चारा उपलब्ध होत असला तरी शेतीचे व्यवस्थापन व देखरेख अधिक अवघड होते. त्याच प्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये कमी काळ घालवल्यामुळे त्याचे जनावरांच्या वाढीमध्ये किंवा आरोग्यावर झालेले परिणाम ओळखणेही अवघड ठरते. गुंतागुंतीमुळे त्यासंबंधीची माहिती व्यक्तिगतरीत्या गोळा करणेही जवळजवळ अशक्यच असते. मातीमध्ये मिसळलेली बहुतांश अन्नद्रव्येही पाण्यात विद्राव्य असतात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातून वाहून बाहेर जाणारे पाणी अडवून त्यांचे मोजमाप करणे अवघड ठरते. त्यामुळे मातीची तपासणी करून त्यातील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर जनावरांच्या आरोग्याचे मोजमाप करण्याची नावीन्यपूर्ण पद्धत नॉर्थ वायके फार्म प्लॅटफॉर्म येथील संशोधकांनी तयार केली आहे.

 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...