agriculturai stories in marathi, agrowon, CITRUS advice | Agrowon

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला
डाॅ. एम. एस. लदानिया, दिनकरनाथ गर्ग
बुधवार, 3 जानेवारी 2018

जानेवारी महिन्याकरीता संत्रा, मोसंबी आणि लिंबू फळबागेत करावयाची कामे आणि नियोजन यांची माहिती घेऊ.

सिंचन व्यवस्थापन ः

जानेवारी महिन्याकरीता संत्रा, मोसंबी आणि लिंबू फळबागेत करावयाची कामे आणि नियोजन यांची माहिती घेऊ.

सिंचन व्यवस्थापन ः

 • अंबिया बहारासाठी ताणावर असलेल्या बागेमध्ये वखरणी करून घ्यावी. सिंचनासाठीचे आळे मोडलेले असल्यास दुरुस्ती करून ओलीत करावे.
 • ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ व ८ वर्षावरील झाडांना अनुक्रमे ७ ते ३०, ४४ ते ७२ व ८२ ते १०२ लिटर पाणी प्रति दिवस जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावे.
 • ठिबक सिंचन नसल्यास दुहेरी आळे पद्धतीने ८-१० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. शेतातील गवत, तणस, कुटार असल्यास आळ्यामध्ये ५ ते १० सें. मी. थर देऊन आच्छादन करावे.

कीड व्यवस्थापन ः
सिट्रस सिला ः
बागेमध्ये पाणी देऊन ताण मोडला जातो. त्यानंतर नवीन पालवी किंवा नवतीची सुरवात होते. याच वेळी सिट्रस सिला व त्याची पिले पानांतून रस शोषण करतात. नवतीच्या पानांची गळ होऊन फांद्या सुकतात. फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. या किडीद्वारे ‘ग्रिनिंग’ आणि ‘शेंडेमर’ या रोगांचाही प्रसार होतो. वेळीच नियंत्रण न केल्यास झाडावरील फुले आणि फळे गळून पडतात. झाडावर जास्त फळे येत नाहीत. नंतर बहार येत नाही. या किडीच्या प्रादुर्भावामुळे १०० टक्के नुकसान होते.

नियंत्रण : फवारणी प्रति लिटर पाणी
क्विनॉलफाॅस १ मि.लि. किंवा
नोव्हॅल्युराॅन ०.५५ मि.लि. किंवा
डायमेथोएट २ मि.लि. किंवा
ॲसिफेट १ ग्रॅम किंवा
इमिडाक्लोप्रिड ०.५० मि.लि.
टीप ः आवश्‍यकतेनुसार दुसरी फवारणी दहा दिवसांनी कीटकनाशक बदलून करावी.

खोडकिडा किंवा इंदरबेला किंवा साल खाणारी अळी
नियंत्रण :
अळीच्या छिद्रावरून जाळे काढावे. इंजेक्शनच्या मदतीने डायक्लोरव्हास (७६ ई. सी.) ५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात बनवून छिद्रात टाकावे. कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्र बंद करावे. ओली माती, रॉकेल किंवा पेट्रोल वापरू नये.

अंबिया बहार व्यवस्थापन ः

 • झाडावरील वाळलेली साल काढावी. साल काढताना थोडी ओली एक इंच फांदी कापावी. सल फांद्या कापण्यासाठी वापरण्यासाठी घेतलेली कात्री सोडियम हायपोक्लोराइटच्या मिश्रणामध्ये बुडवून घ्यावे. त्यामुळे कात्रीद्वारे अन्यत्र होणारा रोगाचा प्रसार रोखता येईल.
 • साल काढल्यानंतर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे झाडावर फवारणी करावी.
 • अंबिया बहार चांगल्या रीतीने येण्यासाठी फवारणी
  जिबरेलिक आम्ल एक ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाणी.

मृग बहार व्यवस्थापन ः

 • मृग बहाराच्या संत्रा व मोसंबीच्या फळांच्या झाडांवर ठिंबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. त्यासाठी सहा वर्षाच्या झाडाला ६२ लिटर, ८ वर्षाच्या झाडाला ८२ लिटर आणि १० वर्षाच्या झाडाला ९२ लिटर पाणी /दिवस/झाड द्यावे. लिंबूच्या ६ वर्षांच्या झाडाला २९ लिटर आणि १० वर्षाच्या झाडाला ८७ लिटर पाणी/दिवस/झाड द्यावे.
 • मृग बहाराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता फवारणी
  जिबरेलिक आम्ल एक ग्रॅम अधिक मोनो पोटॅशिअम फाॅस्फेट किंवा डाय अमोनियम फॉस्फेट किंवा पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी.
 • १५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.
 • कोळी किडीचा प्रादुर्भाव या महिन्यामध्ये मृग बहाराच्या फळांवर दिसतो. कोळीमुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. ते पुढे काळ्या रंगाचे होतात. याला स्थानिक भाषेमध्ये ‘लाल्या’ म्हणतात.

कोळी नियंत्रणासाठी (फवारणी प्रति लिटर पाणी)
डायकोफाॅल १.५ मि.लि. किंवा
इथिआॅन २ मि.लि. किंवा
द्राव्य गंधक ३ ग्रॅम
आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

रोपवाटिका व्यवस्थापन
रोपवाटिकेमध्ये खुंटावर केलेल्या बडिंगचे निरीक्षण करावे. खुंटावरील बडिंग जमलेले नसल्यास पुन्हा बडिंग करावे. ज्या खुंटावरील बडिंग फुटले आहे, त्यावर इथिआॅन २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

डिंक्या व्यवस्थापन
संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास असा डिंक तीक्ष्ण चाकूने खरडून घ्यावा. ती जागा पोटॅशिअम परमॅगनेट १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणाने धुवून घ्यावी. त्या ठिकाणी मेटालॅक्झील एम. अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटिल आम्ल यांची पेस्ट (प्रमाण १०० ग्रॅम प्रति लिटर) लावावी.

संपर्क ः
डाॅ. एम. एस. लदानिया, ०७१२-२५००३२५
दिनकरनाथ गर्ग, ९८२२३६९०३०

(केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...
हिंगोली, नांदेड, परभणीत आॅनलाइन नोंदणीत...परभणी   ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
वारणा नदीवरील बंधारा दुरुस्तीमुळे...कोल्हापूर  : वारणा नदीवरील विविध बंधाऱ्यांची...
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...