agriculturai stories in marathi, agrowon, CITRUS advice | Agrowon

लिंबूवर्गीय फळपीक सल्ला
- डाॅ एम. एस. लदानिया, दिनकरनाथ गर्ग
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

गेल्या काही वर्षांमध्ये मोसंबीसह लिंबूवर्गीय बागांचा ऱ्हास होत आहे. यामागे सिंचन व्यवस्थापन, कीड- रोगांचे वेळेवर नियंत्रण न होणे यासारखी कारणे दिसून येत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून हळूहळू तापमानात वाढ होत जाते. या काळात लिंबूवर्गीय फळबागांमधील व्यवस्थापनाविषयी माहिती घेऊ.

सिंचन व्यवस्थापन ः

गेल्या काही वर्षांमध्ये मोसंबीसह लिंबूवर्गीय बागांचा ऱ्हास होत आहे. यामागे सिंचन व्यवस्थापन, कीड- रोगांचे वेळेवर नियंत्रण न होणे यासारखी कारणे दिसून येत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून हळूहळू तापमानात वाढ होत जाते. या काळात लिंबूवर्गीय फळबागांमधील व्यवस्थापनाविषयी माहिती घेऊ.

सिंचन व्यवस्थापन ः

 • या वेळी झाडावर नवती असते. तसेच अांबिया बहराची फुले व फळधारणाही याच काळामध्ये होते. फेब्रुवारी महिन्यापासून हळूहळू उष्णतामानामध्ये वाढ होत जाते. या काळात सिंचनाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
 • जमिनीनुसार ७ ते १० दिवसांच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने नियमित पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४, ५ ते ७ आणि ८ वर्षांवरील झाडांना अनुक्रमे ९ ते ४० लिटर, ६० ते ९६ लिटर व १०८ ते १३७ लिटर पाणी प्रति दिवस द्यावे.

डिंक्या रोग व्यवस्थापन ः

 • झाडांच्या बुंध्यावर डिंक्याचा प्रादुर्भाव
  आढळून आल्यास, असा भाग चाकूने खरवडून काढावा. त्यावर मेटॅलॅक्झील एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील एएल यांची पेस्ट लावावी.
 • आंबिया बहरातील फळगळ रोखण्यासाठी,
  जिबरेलिक अॅसिड १.५ ग्रॅम अधिक युरिया एक किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

मृग बहर व्यवस्थापन

 • या महिन्यात मृग बहराची फळे काढण्याच्या स्थितीमध्ये असतील. योग्य पक्वतेला फळ तोडून बाजारामध्ये विक्री करावी.
 • फळे तोडणीनंतर झाडावरील सल काढून टाकावी. झाडावर कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा काॅपर आॅक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

कीड व्यवस्थापन

 •  खोडकिडा किंवा ईंदरबेला ः
  या साल खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, अळीच्या छिद्रावरून जाळे काढून त्यामध्ये    इंजेक्शनच्या साह्याने शिफारशीत कीडनाशकाचे द्रावण टाकावे. कापसाचा बोळा या द्रावणात बुडवून छिद्रावर लावावा.
 •  पाने पोखणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  सायपरमेथ्रीन (१० ई.सी.) २ मि.लि. किंवा
  सायपरमेथ्रीन (२५ ईसी) १ मि.लि.
 •  मावा नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  डायमेथोएट १.५ मि.लि.
 •  पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी
  सायपरमेथ्रीन (१० ई.सी.) २ मि.लि. किंवा
  डायमेथोएट १.५ मि.लि.

 अांबिया बहराच्या वेळी सिट्रस सायला नियंत्रणाकरिता, फवारणी प्रति लिटर पाणी
इमिडाक्लोप्रिड ०.५ मि.लि. किंवा
क्विनाॅलफाॅस १.५ मि.लि. किंवा
डायमेथोएट २ मि.लि. किंवा
नोव्हॅल्युराॅन ०.८० मि.लि.
आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी, परंतु कीटनाशक बदलून वापरावे.

संपर्क  ः डाॅ. एम. एस. लदानिया (संचालक), ०७१२-२५००३२५
 दिनकरनाथ गर्ग, कीटकशास्त्रज्ञ, ९८२२३६९०३०
(केंद्रिय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...