नारळावर रुगोज चक्राकार पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

नारळावर रुगोज चक्राकार पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव
नारळावर रुगोज चक्राकार पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

नारळावर सध्या रुगोज चक्राकार पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव काही भागांत दिसून येत आहे. पिले आणि प्रौढ पानाच्या खालील बाजूने रसशोषण करतात. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून किडीचे नियंत्रण करावे. किडीची नोंद ः

  • किडीचे उगम मध्य व उत्तर अमेरिकेतील बेलिझ, मेक्‍सिको, ग्वाल्टेमाला.
  • २००९ मध्ये फ्लोरिडामध्ये शोभिवंत वनस्पतीवर प्रथम नोंद.
  • सन २०१६ मध्ये तमिळनाडू आणि केरळ राज्यांत नारळावर प्रादुर्भाव.
  • सर्वेक्षणामध्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये आणि रत्नागिरीतील काही शेतकऱ्यांच्या बागेत तसेच दापोलीतील काही बागांमध्ये प्रादुर्भाव दिसून आला.
  • पर्यायी खाद्य वनस्पती ः किडीच्या प्रादुर्भावाची नोंद ११८ वनस्पतींवर. विशेषतः पेरू, केळी, सीताफळ, आंबा, शोभिवंत वनस्पती. प्रसार ः  वारा, मनुष्य, पक्ष्यांमार्फत. फळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना ओळख ः

  • माशीच्या पंख्याच्या जोडीवर फिकट तपकिरी पट्टे, डोळे राखाडी.
  • नर आकाराने मादीपेक्षा लहान. अंडी ०.३ मि.मी. लांबीची, लंबवर्तुळाकार, पिवळसर रंग. अंडी चक्राकार. अंडी मेणचट पांढरट आवरणाने झाकलेली.
  • प्रौढ माशीच्या शरीराच्या खालील बाजूस ग्रंथीमधून स्राव बाहेर येतो.
  • किडीच्या प्रथमावस्थेला पाय. ती हालचाल करू शकते. प्रौढ अवस्था अंडाकृती असून पांढरट पिवळसर रंगाची. त्यावर पांढरे मेणचट आवरण. कोष १ मि.मी. लांबीचा.
  • जीवनक्रम ः

  • प्रौढ माशी साधारणतः ३२ अंडी देते. अंडीअवस्था सात दिवसांची.
  • पिले १२-१४ दिवस आणि प्रौढ १३ ते २२ दिवस जगतात.
  • नुकसानीची पद्धत ः

  • पिले आणि प्रौढ पानाच्या खालील बाजूने रसशोषण करतात. त्यामुळे पानांमध्ये तणाव निर्माण होऊन त्यातील पाणी व अन्नद्रव्ये उत्सर्जित होतात.
  • माशी शरीरातून गोड चिकट स्राव सोडते. त्याकडे असंख्य मुंग्या आकर्षित होतात. त्यामुळे स्राव पानावर पसरतो. पानाच्या वरच्या बाजूवर गोड चिकट स्राव दिसतो. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो.
  • मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर फळांवरसुद्धा चक्राकार आवरणात अंडी व प्रौढ दिसतात.
  • कीटकनाशकाचा अनियंत्रित वापर केल्याने पुनर्प्रादुर्भाव वाढल्याचे तमिळनाडू राज्यातील पोलाची येथे दिसून आले आहे. मात्र प्रादुर्भावित ठिकाणी कोणतीही विकृतीची लक्षणे दिसून येत नाही.
  • प्रादुर्भाव ओळखण्याची पद्धती चक्राकार अंडी - प्रादुर्भावाचे प्रमाण १) एका पानावर १० पेक्षा कमी - कमी २) एका पानावर १० ते २० पेक्षा जास्त - मध्यम ३) एका पानावर २० पेक्षा जास्त - जास्त विशेष लक्षणे ः

  • अपरिपक्व झावळ्यांवर प्रादुर्भाव दिसत नाही.
  • पानाच्या खालील बाजूस चक्राकार अंडी आढळणे, पानांवर काळ्या बुरशीची वाढ दिसणे, मेणासारख्या चिकट आवरणात पिल्ले आणि प्रौढ पानाच्या खालील बाजूस दिसतात.
  • नियंत्रण व्यवस्थापन ः

  • प्रादुर्भावित रोपे, फळे, शहाळे वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करू नये.
  • प्रादुर्भावित बागेचे नियमित सर्वेक्षण करावे. त्यामुळे वेळेत उपाययोजना करता येतील.
  • क्रायसोपा, ढालकिडा, मॅलाडा, जावराव्हिया भुंगा या मित्रकीटकांचे बागेत संवर्धन करावे.
  • इनकार्सियासारखे परोपजीवी कीटक प्रादुर्भावित बागेत सोडावेत.
  • माशीला आकर्षित करण्यासाठी प्रादुर्भावित झाडाच्या शेंड्याकडे दोन पिवळे चिकट सापळे लावावेत.
  • पानावरील काळ्या बुरशीवर लेइओचिनस निलगिरीॲनस उपजीविका करत असल्यामुळे त्याचे संवर्धन बागेत करावे.
  • राज्यांतर्गत कीड नियंत्रणासाठीच्या नियमांचे पालन करून प्रादुर्भावित घटकांवर निर्बंध करावेत. जेणेकरून प्रसार होणार नाही.
  • रासायनिक नियंत्रण ः (प्रतिलिटर पाणी)

  • इमिडॅक्‍लोप्रीड (१७.८ एस एल) ०.३ मि.लि. किंवा
  • निमतेल ०.५ मि.लि.
  • संपर्क ः डॉ. संतोष वानखेडे ः ९७६५५४१३२२ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com