agriculturai stories in marathi, agrowon, crop advice, banana | Agrowon

केळी पीक सल्ला
आर. व्ही. देशमुख, डॉ. एस. व्ही. धुतराज
बुधवार, 31 जानेवारी 2018

सध्या तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होत आहे. तापमानात वाढ होत असल्यामुळे येथून पुढे केळीची वाढ जोमाने होण्यास सुरवात होईल. मृगबाग लागवडीची केळी सध्या निसवणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे केळी बागेची काळजी घेणे आवश्यक आहे.

मृगबाग लागवड:

सध्या तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी होत आहे. तापमानात वाढ होत असल्यामुळे येथून पुढे केळीची वाढ जोमाने होण्यास सुरवात होईल. मृगबाग लागवडीची केळी सध्या निसवणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे केळी बागेची काळजी घेणे आवश्यक आहे.

मृगबाग लागवड:

 • केळीच्या झाडालगतचे गवत काढून बाग ताणविरहित ठेवावी. बागेत पिवळी, तसेच रोगग्रस्त पाने कापून त्याची बागेबाहेर विल्हेवाट लावावी. झाडालगतची पिले धारदार विळ्याने नियमित कापून त्यांची बागेबाहेर विल्हेवाट लावावी.
 • विद्राव्य खते ठिबकद्वारे द्यावयाची झाल्यास ०:५२:३४ हे व्रिदाव्य खत एकरी ५० किलो (रोज ०.५ किलो) याप्रमाणे व ०:०:५० एकरी ५० किलो (रोज ०.५ किलो) याप्रमाणे १४७ ते २४७ दिवसांदरम्यान द्यावे. सोबत कॅल्शिअम नायट्रेट १० किलो ५-५ किलो दोन वेळेस विभागून द्यावे.
 • केळी बागेमध्ये ठिबक संच बसवला नसेल तर लागवडीनंतर १६५ दिवसांनी युरिया ८२ ग्रॅम व म्युरेट ऑफ पोटॅश ८३ ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणात रासायनिक खताची मात्रा द्यावी. खते झाडापासून १५ सेमी अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावी आणि लगेच मातीने झाकावी.
 • ठिबक संचाची नियमित तपासणी करून बागेस ९ ते १० लिटर पाणी प्रतिझाड प्रतिदिवस ठिबकद्वारे शक्यतो रात्रीच्या वेळेस द्यावे.
 • बागेच्या चोहोबाजूस सजीव कुंपणाची लागवड केली नसल्यास उंच वाढणारी मका अथवा ज्वारीची चारी बाजूंनी दोन ओळीत दाट लागवड करावी जेणेकरून उन्हाळ्यातील उष्ण वाऱ्यापासून बागेचे संरक्षण होईल.

कांदेबाग लागवड:

 • कांदेबाग लागवडीची केळी सध्या रोपांच्या तारुण्य अवस्थेमध्ये आहे. कांदेबागेचे विशेष करून थंडीपासून संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
 • बागेमध्ये उभी-आडवी वखर पाळी देऊन झाडाभोवतालचे गवत मजुरांच्या साह्याने खुरपणी करून बाग तणमुक्त ठेवावी.
 • बागेस ठिबकद्वारे विद्राव्य खते द्यावयाची झाल्यास १९:१९:१९ हे खत ७५ किलो (रोज १ किलो) व युरिया १५० किलो (रोज २ किलो) प्रतिएकर याप्रमाणे ७१ ते १४६ दिवसांदरम्यान द्यावे.
 • केळीची लागवड केलेल्या चारही बाजूकडील बांधावरील वेलवर्गीय तणे उपटून नष्ट करावेत. बागेत विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.  
 • नांग्या असल्यास त्या ठिकाणी सारख्या जातीच्या कंदाची लागवड करून नांग्या भरून घ्याव्यात.
 • ७५ दिवसांनी द्यावयाचा नत्राचा हप्ता ८२ ग्रॅम युरिया प्रतिझाड याप्रमाणे द्यावा. फेब्रुवारीच्या पाहिल्या पंधरवाड्यामध्ये रामबाग लागवडीचे नियोजन करावे.

पीक संरक्षण

 •  मृगबागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
  फवारणी प्रतिलिटर पाणी
  प्रोपीकोनॅझाॅल (२५ ईसी) १ मिली + १ मिली उत्तम प्रतीचे स्टीकर
 • दुसरी फवारणी १० दिवसाच्या अंतराने
  कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम  परिणामकारक फवारणीसाठी नॅपसॅक फवारणी यंत्राचा वापर करावा.
 •  कांदेबागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी
  कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यूपी) १०० ग्रॅम १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणाची २०० मिली प्रतिझाड या प्रमाणे संपूर्ण बागेला आळवणी करावी.

संपर्क  ः ०२४६२ - २५७३८८
(केळी संशोधन केंद्र, नांदेड)

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...