agriculturai stories in marathi, agrowon, crop advice, kokan region | Agrowon

कृषी सल्ला : रब्बी भुईमूग, मोहरी, आंबा, काजू, कलिंगड, भाजीपाला
डॉ. सुरेश चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर जगताप, विरेश चव्हाण
बुधवार, 17 जानेवारी 2018

भुईमूग ः
 रब्बी उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी शेताच्या पूर्वतयारीसाठी कामे हाती घ्यावीत. जमीन खोल नांगरून, ढेकळे फोडून घ्यावीत. हेक्‍टरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट मिसळून जमीन तयार करावी. पेरणीसाठी टी.जी. २६, टी.ए.जी. २४, टी.पी.जी. ४१, कोकण गौरव, कोकण टपोरा या जातींचे बियाणे आकारानुसार हेक्‍टरी १२५ ते १५० किलो या प्रमाणात वापरावे.

भुईमूग ः
 रब्बी उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी शेताच्या पूर्वतयारीसाठी कामे हाती घ्यावीत. जमीन खोल नांगरून, ढेकळे फोडून घ्यावीत. हेक्‍टरी १० ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट मिसळून जमीन तयार करावी. पेरणीसाठी टी.जी. २६, टी.ए.जी. २४, टी.पी.जी. ४१, कोकण गौरव, कोकण टपोरा या जातींचे बियाणे आकारानुसार हेक्‍टरी १२५ ते १५० किलो या प्रमाणात वापरावे.

मोहरी ः
मोहरी पिकाच्या पेरणीसाठी सध्याचे हवामान योग्य आहे. पुसा बोल्ड किंवा वरुणा या जातीची लागवड करावी. पिकाची पेरणी ४५ x १० सें.मी. अंतरावर ३ ते ४ सें.मी. खोलीवर करावी. पेरणीपूर्वी प्रती गुंठ्यास १ किलो युरिया आणि ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट ओळीत पेरून द्यावे.

आंबा ः
आंबा बागांमध्ये तुडतुडे व भुरी रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
तुडतुडे नियंत्रण ः इमिडाक्‍लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.३ मिली
भुरी नियंत्रण ः हेक्‍झाकोनॅझोल (५ टक्के)०.५ मिली किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २ ग्रॅम.

काजू ः
काजूवर ढेकण्याचा (टी मॉस्किटो) प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ टक्के प्रवाही) ०.६ मिली - नवीन पालवी फुटण्याच्या वेळी फवारणी करावी.
(सदर नमूद केलेल्या कीटकनाशकाला लेबल क्‍लेम नाही.)

नारळ/सुपारी ः

 • नारळावरील गेंडाभुंगा या किडींच्या नियंत्रणासाठी
 • बागेमध्ये शेणखताच्या खड्ड्यात दर दोन महिन्यांनी शिफारशीत कीटकनाशकाची भुकटी मिसळावी.
 • नारळावरील सोंड्या भुंगा या किडीच्या नियंत्रणासाठी
  खोडावर १ मीटर उंचीवर गिरमिटाच्या साहाय्याने १५ ते २० सें.मी. खोल तिरपे छिद्र पाडावे. त्यामध्ये क्‍लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) नरसाळ्याने ओतावे. छिद्र सिमेंटच्या साह्याने बंद करावे.

भाजीपाला ः

 • वांगी, मिरची व टोमॅटोच्या रोपांचे जीवाणूजन्य मर या रोगांमुळे नुकसान होते. ते टाळण्यासाठी रोपवाटिकेत तयार केलेल्या गादीवाफ्यावर बिया पेरण्यापूर्वी कॉपर ऑक्‍झीक्‍लोराइडचे २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणांची फवारणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रति किलो ३ ग्रॅम थायरम चोळावे.
 • भाजीपाला (वांगी, टोमॅटो, मिरची व नवलकोल) पिकांमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर
  हेक्‍झाकोनॅझोल (५ टक्के) ०.५ मिली किंवा गंधक (८० टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम.

कलिंगड लागवड ः
जमीन नांगरून कुळवून लागवडीसाठी तयार करावी. लागवडीसाठी ४ मीटर अंतरावर पाट किंवा सऱ्या काढाव्यात. पाटाच्या दोन्ही बाजूस ९० सें.मी. अंतरावर ३० x ३० x ३० सें.मी. आकाराचे खड्डे करावेत. त्यात १ ते १.५ किलो चांगले कुजलेले शेणखत व शिफारशीनुसार कीटकनाशकाची भुकटी मिसळून खड्डा भरून घ्यावा. प्रत्येक खड्ड्यात ३-४ बिया एकमेकांपासून ४-५ सें.मी. अंतरावर व २ ते २.५ सें.मी. खोलीवर लावाव्यात. रुजवा झाल्यावर १५ दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी २ चांगली जोमदार रोपे ठेवावीत. या पिकाला प्रती हेक्‍टरी १५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश यांची मात्रा द्यावी. स्फुरद आणि पालाश यांची संपूर्ण मात्रा व नत्राची १/३ मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी. उर्वरीत नत्राची मात्रा सम प्रमाणात विभागून १ व २ महिन्यांनी लागवडीनंतर द्यावी.

दुभती जनावरे/शेळ्या ः

 • जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी.
 • किमान तापमान कमी होत असल्यामुळे गुरांच्या गोठ्यात तसेच कोंबड्यांच्या शेडमध्ये गरजेनुसार विजेचे बल्ब लावावेत. शेडभोवती पडदे गुंडाळावेत.

संपर्क ः ०२३५८- २८२३८७
(कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...